चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय : सुंदर, नितळ आणि तजेलदार त्वचा प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. परंतु सौंदर्य हे रातोरात येत नसते, आपल्या त्वचेवर योग्य परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप उपाय करावे लागतील. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन आयुर्वेदाच्या साहाय्याने सावळ्या त्वचेचा रंग गोरा करणे शक्य झाले आहे.
आजच्या लेखात देण्यात आलेले काही घरगुती उपाय वापरून आपण आपल्या चेहऱ्याचा रंग गोरा करू शकता. या लेखात देण्यात आलेले गोरे होण्याचे उपाय आणि सौंदर्य पद्धती आयुर्वेद आणि मेडिकल दोन्हींनी मान्य केल्या आहेत. तर चला चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय सुरू करुया.
Table of Contents
त्वचेचा सावळेपणाची कारणे
प्रत्येक जण आपला चेहरा गोरा आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो परंतु चेहऱ्यावरच अधिक लक्ष दिल्याने मान, हात, पाय इत्यादी अवयव काळे पडू लागतात. हार्मोन्स असंतुलन, लठ्ठपणा इत्यादी त्यामागील काही कारणे आहेत. वात पित्त आणि कफ चे असंतुलन झाल्याने शरीराचा रंग सावळा व्हायला लागतो आणि त्वचा निस्तेज दिसायला लागते.
चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय आयुर्वेदिक फेसपॅक
1) गोरे होण्यासाठी हळदीचा उपयोग
भारतीय आयुर्वेदात हळदीला एक जादुई पदार्थ म्हणून संबोधण्यात आले आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टरियल, अँटीफंगल आणि त्वचा उजडणारे विशेष घटक असतात. हळदीच्या उपयोगाने चेहऱ्यावरील काळेपणा दूर होऊन त्वचा गोरी व चमकदार बनते. हळद चेहऱ्यावरील पिंपल देखील कमी करण्यात सहाय्यक असते.
हळदीचा मास्क
एका वाटीत दोन चमचे दूध घ्या. या दुधात अर्धा चमचा हळद पावडर मिसळा.
आता दूध व हळद चांगल्या पद्धतीने एकामेकात एकत्रित करा.
यानंतर कापसाच्या एका स्वच्छ तुकड्याच्या मदतीने दूध व हळदीचे हे मिश्रण चेहरा आणि मानेला लावा.
15 ते 20 मिनिट फेसपॅक सुकू द्या.
नंतर कोमट पाण्याने साबण न लावता चेहरा धुवा.
हा फेसपॅक दररोज लावल्याने चेहऱ्यावरील काळपटपणा दूर होऊन त्वचा चमकदार होईल.
2) गोरे होण्यासाठी लिंबू आणि गुलाबजल चा उपयोग
लिंबू सिट्रिक एसिड असते जे त्वचेला हल्के करते तर गुलाब जल त्वचेला थंडावा प्रदान करते. यांना दोघांना मिसळून लावल्याने त्वचेवर उजळपणा येतो.
यासाठी सर्वात आधी एका वाटीत थोडे गुलाब जल टाकावे.
यानंतर गुलाब जल मध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यावा.
कोमल कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे.
नियमित पणे हा उपाय केल्याने चेहऱ्याचा काळेपणा दूर होतो आणि त्वचा ग्लो करायला लागते.
3) गोरे होण्यासाठी बटाट्याचा उपयोग
बटाटे ज्या पद्धतीने प्रत्येकाला खायला आवडतात त्याच पद्धतीने तुमच्या त्वचेला सुंदर करण्यासाठी देखील त्यांचा उपयोग आहे.
यासाठी सर्वात आधी एक बटाटा घेऊन त्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे.
बटाट्याचे हे मिश्रण पाणी टाकून पतले करावे.
यानंतर ह्या बारीक झालेल्या बटाट्याला चेहऱ्यावर मालिश करीत लावावे.
10 ते 15 मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.
4) गोरे होण्यासाठी मध चा उपयोग
मध (honey) त्वचेला मऊ करण्यासाठी उपयुक्त असते. लिंबू मध्ये सिट्रिक एसिड असते जे त्वचेवरील पिंपल्स तयार करणाऱ्या जंतूंना नष्ट करते. मध आणि लिंबू चे फेस पॅक बनवण्यासाठी पुढील पद्धती अनुसरा-
सर्वात आधी एक चमचा मध मध्ये दोन चमचे लिंबू रस मिसळा.
चमच्याच्या सहाय्याने दोन्ही पदार्थ एकामेकात एकत्रित करा.
यानंतर कापसाच्या एका स्वच्छ तुकड्याच्या मदतीने मध व लिंबू रस चे हे मिश्रण चेहरा आणि मानेला लावा.
15 ते 20 मिनिट फेसपॅक सुकू द्या.
नंतर कोमट पाण्याने साबण न लावता चेहरा धुवा.
हा फेसपॅक दररोज लावल्याने चेहऱ्यावरील काळपटपणा दूर होऊन त्वचा चमकदार होईल.
चेहरा उजळण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स
1) दररोज योग व व्यायाम करा
योग करण्याचे चमत्कारी परिणाम शरीराला तर होतातच परंतु तुमच्या त्वचेला देखील याचे अनेक फायदे आहेत. त्वचा सुंदर दिसावी म्हणून चेहरा आणि त्वचा संबंधी व्यायाम करावे. सुंदर त्वचेसाठी अधोमुखासान आणि सिंहासन हे काही उपयोगी योग आसान आहेत.
2) हेल्थी अन्न खा
आपल्या शरीरात जाणारे अन्न त्वचेवर खूप प्रभाव टाकते. विटामिन ए, ई आणि सी च्या कमतरतेमुळे चेहरा निस्तेज दिसायला लागतो. म्हणून हेल्थी त्वचा ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फळे आणि पालेभाज्या खाण्याची सवय लावा. पपई आणि गाजर ही एकमेव फळ आहे ज्यात विटामिन सी, ई आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. म्हणून पपई व गाजराचे सेवन आरोग्य आणि त्वचेसाठी खूप उपयोगी आहे.
याशिवाय फास्ट फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने त्वचेवरील किटाणू वाढायला लागतात ज्यामुळे पुळ्या आणि पिंपल ची समस्या होते.
3) सूर्यापासून स्वतःचे रक्षण करा
उन्हाळ्याच्या काळात सूर्याची किरणे अधिक प्रखर असतात. सूर्याची अल्ट्रावायलेट किरणे गोऱ्या आणि सुंदर त्वचेसाठी एक शत्रु आहेत. जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचेचा रंग सावळा व्हायला लागतो. म्हणून घरातून बाहेर पडताना रूमाल तसेच टोपी घालून स्वतःचे आणि आपल्या त्वचेचे चे रक्षण करायला विसरू नका. याशिवाय घरातून निघण्याच्या 20 मिनिटे आधी चेहरा, मान आणि हातांना सनक्रीम लोशन लावा. सनक्रीम सूर्याच्या UV किरणांपासून त्वचेचे रक्षण करते.
4) धूम्रपान करणे थांबवा
जर आपण धूम्रपान करीत असाल तर 90 टक्के खात्री आहे की तुमच्या त्वचेवर सुरकुत्या, काळेपणा आणि पुटकुळ्या निर्माण होतील. सिगरेट ओढल्याणे शरीरातील रक्तवाहिन्या चा प्रवाह बाधित होतो. ज्यामुळे त्वचेचा बाहेरील भाग सावळा आणि सुरकुत्या युक्त होतो. शरीरात पाण्याची कमतरता होऊन त्वचा सुखलेली दिसायला लागते.
5) उष्ण पाण्याने अंघोळ करणे थांबवा
काही लोकांना उन्हाळ्यातही गरम अथवा कोमट पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. परंतु नित्य गरम पाण्याने स्नान केल्याने शरीरावरील ओलावा कमी व्हायला लागतो. ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडू लागते. म्हणून बरेच स्कीन एक्स्पर्ट गरम पाण्याने अंघोळ टाळण्याची सल्ला देतात. थंड पाण्याने शॉवर व अंघोळ केल्याने शरीर व मन दोघी ताजे होतात.
6) नेहमी पाणी पीत रहा
दिवसभरात पुरेसे पाणी न पिल्याने शरीर आणि त्वचा रफ व कोरडी होऊ लागते. तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल की दररोज 7-8 ग्लास पाणी प्यायला हवे. म्हणून शक्य होईल तेवढे पाणी पीत रहा आणि दिवसभरातून एकदा तरी थोडे कोमट पाणी प्या. असे केल्याने तुमचे शरीरातील रक्त शुद्ध होईल आणि त्वचा हायड्रेट व चमकदार होईल.
7) झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा
दिवसभराच्या प्रदूषणामुळे चेहऱ्यावर धुळीचे कण आणि डस्ट साचून राहते व रात्री चेहरा न धुता झोपी गेल्यास हे धूलिकण चेहऱ्यावरील बारीक छिद्रांना बंद करतात. ज्यामुळे पिंपल व पुटकुळ्या होतात. म्हणून दररोज रात्री झोपण्याआधी चेहरा फेस वॉश अथवा गुलाब जल ने स्वच्छ धुवावा.
8) पुरेशी झोप घ्या
रात्री उशिरापर्यंत जगणे सकाळी उशिरा उठणे किंवा कमी वेळ झोप घेणे इत्यादी सवयी देखील त्वचेच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. कमी झोपल्याने डोळ्याखाली काळे वर्तुळ तयार होते. म्हणून रात्री 10 वाजेच्या आत झोप अन् सकाळी 6 वाजायच्या आधी उठा.
चेहरा उजळण्यासाठी काय खावे
आपण चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय पाहिले परंतु ग्लोविंग चेहरा मिळवण्यासाठी हेल्दी अन्न खाणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता आपण जाणून घेऊया की चेहरा उजळण्यासाठी काय खावे ?
चेहरा उजळण्यासाठी पुढील गोष्टी नियमीपणे खायला हव्यात-
- पालक
खूप काम करणे, थकवा येणे आणि पुरेशी झोप न घेणे इत्यादी कारणांमुळे डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल निर्माण होतात. हे डार्क सर्कल घालवण्यासाठी व चेहरा उजळून काढण्यासाठी पालक तसेच हिरव्या पालेभाज्या आहारात सामील करणे अत्यंत आवश्यक आहे. - लसूण
लसूण हृदयासाठी अत्यंत उपयोगी घरगुती औषध आहे. परंतु याशिवाय देखील चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम आणि सुरकुत्या घालवण्याकरीता लसणाचे उपयोग केला जातो. लसुन रक्ताला शुद्ध करते. म्हणून दररोज सकाळी एक ते दोन लसणाच्या पाकळ्या चावून खायला हव्यात. याशिवाय अजून काही लसणाचे फायदे येथे वाचा. - टमाटा
टमाटे विटामिन ए, विटामिन सी आणि पोटॅशियम ने भरपूर असतात. म्हणून जर चेहरा उजळण्यासाठी काय खावे असा आपला प्रश्न असेल तर, त्वचेला हेल्दी आणि सुंदर बनवण्यासाठी टमाटा खायला हवा. - गाजर
गाजर त्वचेच्या बाह्य आवरणाला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्याचे कार्य करते. गाजर खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी करता येतात. - अंडे
अंड्या मध्ये विटामिन बी 7 भरपूर प्रमाणात असते. अंडे प्रोटीन चा खूप चांगला स्त्रोत आहेत. म्हणून दररोज एक अंडे तरी खायला हवे. अधिक चांगले परिणाम मिळवण्यासाठी बोईल केलेल्या अंड्याच्या वरील भाग खावा. लवकर परिणाम हवे असतील तर अंड्याच्या आतील पिवळा भाग खाणे टाळावे.
तर हे होते चेहरा सुंदर करण्यासाठी खाण्याचे पदार्थ आशा आहे की आपल्याला चेहरा उजळण्यासाठी काय खावे ? या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.
तर मित्रहो हे होते काही महत्वाचे चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय. आम्ही आशा करतो की ह्या मराठी टिप्स आपल्याला उपयुक्त ठरल्या असतील. आपले मत आम्हास कमेन्ट करून सांगा. धन्यवाद.
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा