Είναι δύσκολο να βρει κανείς το φάρμακο σε κάποιο φυσικό φαρμακείο στην Ελλάδα αγορά Cenforce online. Αγορά του Cenforce 25, 50, 100 online για άνδρες.
Beneficiezi de dobândă cu până la 2% mai mică dacă optezi pentru asigurare împrumut cu dobândă 0. Vezi aici toate beneficiile. Continuă. Perioadă de creditare: 48 luni.

कोणत्याच कामात चित्त लागत नाही आणि नेहमी मूड खराब असतो; तर करा हे सोपे उपाय

राग आणि तणाव कोणत्याही व्यक्तीच्या जीवनासाठी हानिकारक असतात. अनेकदा असे घडते की छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचा मूड खराब होतो. तुमच्या अशा वागण्याचा परिणाम आजूबाजूच्या वातावरणावरही होतो. तुमच्या आशा वागण्याने तुम्ही कुटुंब, जोडीदार आणि मित्रांपासून दूर जाऊ लागतात. वाईट मूडची अनेक लक्षणे आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटत नाही. घरी किंवा ऑफिसमध्ये राहवेसे वाटत नाही. नेहमी आळस येतो. तर अशा परिस्थितीत तुम्ही लोक एकटे राहणे पसंत करता. ना कोणाशी बोलायचं ना वेळ घालवायचा.

तणाव किंवा नैराश्यात मेंदू काम करणे थांबवतो. जे तुमच्या जीवनासाठी हानिकारक ठरते. यातूनच अनेकदा लोक आत्महत्या सारखे गंभीर निर्णय घेतात. जर तुम्हालाही ही लक्षणे जाणवत असतील तर कोणत्या उपायांनी तुम्ही यापासून आराम मिळवू शकता याबद्दल जाणून घेऊया..

तुमचा मूड सुधारण्याचे मार्ग

1) आहार

प्रोटीन युक्त पदार्थ कोणते

सर्व प्रथम तुमचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करा. यासाठी जर तुम्ही तुमच्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश केला तर ते आरोग्य आणि मन दोन्हीसाठी फायदेशीर आहे. सॅल्मन, अक्रोड इत्यादी जास्त खा. याशिवाय सुका मेवा, मासे आणि भाज्या इत्यादींचे सेवन करावे. केळी आणि माशांचा आहारात समावेश करता येईल. हे सर्व पदार्थ high प्रोटीन युक्त असल्याने आरोग्यासाठी फार लाभदायक आहेत. वाचा> सर्वाधिक प्रोटीन असलेले खाद्य पदार्थ

बहुतेक लोक नैराश्याच्या अवस्थेत दारू आणि सिगारेटचे सेवन करू लागतात. परंतु औषधे तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढत नाहीत, तर त्या स्थितीकडे अधिक ढकलतात. त्यामुळे मूड खराब असताना दारूचे सेवन अजिबात करू नका. या अवस्थेत अल्कोहोलचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

तुमचा मूड सुधारण्यासाठी ध्यान करा. योग आणि ध्यान हे मन आणि शरीर दोन्ही हलके करतात. तुमचा मूड खराब करणाऱ्या गोष्टींपासून मुक्त होण्यासाठी ध्यान करा. ध्यान कसे करावे? <<येथे वाचा

2) केस मालीश करा

केस धुणे व त्यांना तेलाने मालीश करणे हे स्ट्रेस डिफ्यूझर म्हणून काम करते. जे त्वरित तुमचा मूड सुधारते. केसांची मालीश तुमच्या स्नायूंना आराम देते, मन शांत करते आणि झोपेला प्रोत्साहन देते. चंपी केल्याने, तुम्ही कमी वेळेत तणावमुक्त होता. म्हणून लिंबू किंवा संत्रा, पुदीना, गुलाब आणि लॅव्हेंडर सारख्या लिंबूवर्गीय फळांपासून बनवलेल्या आवश्यक तेलांनी केस धुवावे व यानंतर तेलाने केसांची मालीश करावी.

3) मुलांबरोबर खेळा

लहान मुलांसोबत खेळल्याने तुमच्या शरीरात ऑक्सीटोसिन हार्मोन निर्माण होते. अभ्यासक ल्यूक कॉन्टिनो म्हणतात की ऑक्सीटोसिन तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते. लहान मुलांसोबत जेव्हा आपण खेळता तेव्हा त्या काळात तुम्ही चिंता आणि नैराश्याबद्दल विसरता. तुम्ही तुमच्या काही आनंदी आठवणींमध्ये बुडता ज्यामुळे तुमचा मूड सुधारण्यास मदत होते. म्हणून जर घरात लहान मुले असतील तर आपण त्यांच्या सोबत खेळू शकतात किंवा त्यांना बाहेर फिरायला नेऊ शकतात.

4) तुमचे आवडते गाणे ऐका

नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सने नुकत्याच केलेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की संगीत ऐकल्याने आपल्या शरीरात डोपामाइन हार्मोन बाहेर पडतो. डोपामाइन हा आपला फील-गुड हार्मोन आहे, जो आपल्याला आनंदी असण्याचा अनुभव देतो. तुमचे आवडते संगीत तुमचा खराब मूड सुधारू शकते. परंतु sad म्युझिक ऐकणे टाळावे.

तर मित्रहो माझी काळजी.कॉम च्या या लेखात तुमचं मूड ठीक करून तुमचे कामात मन लागावे यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. आपणास ही माहिती कशी वाटली कमेन्ट द्वारे नक्की कळवा. आणि हा लेख आपले कुटुंबीय आणि मित्र मंडळी सोबत शेअर करून त्यांनाही या माहितीचा लाभ द्या. माझी काळजी चे लेख नियमित प्राप्त करीत राहण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा. धन्यवाद..

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Levitra, vardenafil original contrareembolso en España, levitra sin receta online. Cialis es efectiva aproximadamente durante 24 horas.
Viagra opprinnelig pris uten resept på apoteket Original Viagra i Norge uten resept. Mange lurer på om det er verdt å kjøpe Viagra for den neste erobringen og elleville natten.