हात दुखणे व मनगट दुखणे कारणे आणि घरगुती उपाय | wrist pain remedy in marathi

हात व मनगट दुखणे उपाय : हात दुखणे अथवा मनगटातील दुखणे हे अचानक लागलेला मुक्का मार किंवा फ्रॅक्चर मुळे होऊ लागते. परंतु दीर्घकाळापर्यंत होणारा दबाव व इतर कारणे देखील या दुखण्याला कारणीभूत असू शकत. आजच्या या लेखात हात दुखणे घरगुती उपाय व हाताचे मनगट दुखणे उपाय यावर घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत.

हाताचे मनगट दुखणे घरगुती उपाय

हात अथवा मनगटावर झालेल्या इजेच्या आधारे दुखणे वेगवेगळे असू शकते आणि या दुखण्यासोबतच पुढील लक्षणे देखील निर्माण होऊ शकतात :

 • वस्तू उचलण्यात त्रास होणे. कमीत कमी वजन असलेली वस्तू थोडा वेळही न धरू शकणे.
 • मनगटात सोबत हाताच्या बोटामध्ये जखडल्यासारखे वाटणे.
 • मनगट फिरवल्यावर कट कट आवाज येणे.
 • मनगटात सुजन येणे.
 • मूठ बनवण्यात त्रास होणे.

मनगटातील दुखण्याचे सुरुवाती लक्षण हलके असू शकतात परंतु काही काळानंतर ही समस्या अधिक बिकट होऊ शकते. म्हणून या दुखण्यावर लवकरात लवकर घरगुती उपाय करायला हवेत.

हाताचे मनगट दुखणे कारणे

 • मुक्का मार बसणे
  एखाद्या वेळेस पुढील बाजूला हातांवर पडल्याने मनगटात इजा होऊन जाते. यामध्ये मोच, मनगटातील तान आणि फ्रॅक्चर या समस्या असू शकतात.

 • पुन्हा पुन्हा दबाव तयार होणे
  एखादे काम करीत असताना मनगटावर परत परत दबाव पडणे हे देखील मनगट दुखण्याचे प्रमुख कारण असू शकते. जसे अनेक लोकांना कॉम्प्युटर वर टायपिंग करण्याचे काम करावे लागते. हे कार्य करतांना मनगटावर दबाव पडतो. ज्यामुळे मनगटाचे हाड सरकणे अथवा त्यात सुजन येणे ह्या समस्या निर्माण होतात.

हात दुखणे व मनगट दुखणे घरगुती उपाय

जर मनगटात दीर्घकाळापासून दुखत असेल तर पुढे देण्यात आलेले घरगुती उपाय आपण एकदा नक्की करून पहा.

 • कॅल्शियम चे सेवन करावे :
  हाडांना मजबूत करण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात कॅलशिअमची आवश्यकता आहे. 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्या वयस्क लोकांनी आपल्या अन्नात 1200 मिली ग्राम पर्यंत तर 50 पेक्षा कमी वय असणाऱ्या तरुणांनी 1000 मिली ग्राम पर्यंत कॅल्शियम घ्यावीत. डाळी आणि पालेभाज्या, दूध, ताज्या फळांचा रस इत्यादी गोष्टी आपल्या आहारात सामील कराव्यात.

 • अधिक काम करणे टाळा :
  जर तुम्ही दीर्घकाळापर्यंत कीबोर्ड वर टाईप करणे किंवा इतर मनगटाचा उपयोग होईल अशी कामे करीत असाल तर दर अर्ध्या तासाने थोडा वेळ विश्रांती घ्यावी. व मनगटाची थोडी हालचाल आणि व्यायाम करावा.

 • अद्रक
  अद्रक मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीरावर असलेली सुजन दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जर मनगटात दुखत असेल तर अद्रक ची चहा बनवून प्यायली जाऊ शकते. याशिवाय अद्रक चा अर्क देखील आपण सेवन करू शकता. यासाठी एक वाटी अद्रक ला मिक्सर मध्ये बारीक करावे आणि यात मध मिसळून सकाळ-संध्याकाळ प्यावे.

 • ऑलिव्ह ऑईल
  ऑलिव ऑइल हृदयासाठी तर चांगले असतेच परंतु आयुर्वेदातही सुजन दूर करण्यासाठी याचे महत्त्व सांगितले आहे. ऑलिव ऑइल ने मसाज केल्याने सुजन कमी होते आणि दुखणे दूर पडते.

 • लसूण
  लसूण मध्ये सल्फर असते जे सुजन दूर करण्यात उपयोगी आहे. याशिवाय लसणात सेलेनियम नावाचा घटक असतो. मनगटाचे दुखणे दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात लसणाच्या काही पाकळ्या गरम कराव्यात आणि यानंतर हे तेल संपूर्ण मनगटावर लावावे असे केल्याने मनगटातील दुखणे दूर होईल. लसूण खाण्याचे फायदे <<वाचा येथे

 • झोपताना मनगट वरच्या बाजूला ठेवावे
  ज्यांना मनगटातील दुखण्याचा त्रास कायमस्वरूपी असेल त्यांनी झोपतांना आपले मनगट शरीरापासून थोड्या उंचीवर ठेवावे. यासाठी तुम्ही उशीचा उपयोग करू शकतात. झोपताना आपला हात आणि मनगट उशीवर ठेवावे. व मनगटाला जास्तीत जास्त आराम द्यावा.

 • बेल्ट वापरावा
  मनगटातील दुखणे दूर करण्यासाठी मनगटाचा बेल्ट वापरला जाऊ शकतो. जर आपल्याकडे बेल्ट उपलब्ध नसेल तर तुम्ही रूमाल अथवा कपडा देखील बांधू शकतात. रूमाल व कापड बांधल्याने त्या जागी गरमास निर्माण होते.

 • आईस पॅक
  बर्फ सुजन उतरवण्यासाठी उपयोगी असतो. म्हणून मनगटात झालेली सूजन कमी करण्यासाठी तुम्ही आईस पॅक चा देखील उपयोग करू शकतात आणि मनगटाला बर्फाने शेकु शकतात.

मनगटाचे दुखणे दूर करण्यासाठी व्यायाम आणि योगासन

मुठ वाळून फिरवणे
सर्वात आधी आपल्या दोन्ही हातांना समोर ताठ धरावे. यानंतर दोन हातांच्या मुठ वाळून मनगटापासून मुठ गोल गोल फिरवावी. उजवी कडून डावीकडे आणि डाव्याकडून उजवीकडे दोन्ही बाजूंना मुठ फिरवावी. हा व्यायाम दिवसातून 3 ते 4 वेळा करावा.

हात दुखणे घरगुती उपाय

गोमुखासन
हे आसन करीत असताना शरीराची मुद्रा गाई प्रमाणे होते. म्हणून याला गोमुखासन म्हटले गेले आहे. हे आसन करण्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे बसावे व आपल्या दोन्ही हातांना पाठीमागे एकमेकांना जोडावे. या अवस्थेत 30 सेकंद ते एक मिनिटापर्यंत थांबण्याच्या प्रयत्न करावा.

तर मित्रांनो ह्या लेखात आपण मनगट दुखणे घरगुती उपाय पाहिले. आशा करतो की मनगट दुखीवरील हे उपाय आपण नक्की कराल आणि आपले wrist pain दूर पळवून लावणार. परंतु लक्षात असुदया की जर आपल्याला मोठ्या अपघातात मनगट इजा झाली असेल किंवा मनगटात फ्रॅक्चर झाला असेल तर एकदा डॉक्टरांची सल्ला नक्की घ्यावी. कारण अश्या दुखण्यात केलेली दिरंगाई आपणास महागात पडू शकते. धन्यवाद..

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *