कंडोम वापरण्याची पद्धत – How to use condom in marathi : संभोगा दरम्यान नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम चा उपयोग केला जातो. यासोबतच हे संभोग करणाऱ्यांना sexually transmitted disease जसे hiv aids पासून देखील सुरक्षित ठेवते.
परंतु आजही समाजातील अनेक पुरुषांना कंडोम काय आहे व कंडोम / निरोध चा उपयोग कसा करावा करावा याविषयीची माहिती नाही आहे. आजच्या या लेखात आम्ही आपल्या कंडोम बद्दल मराठी माहिती व कंडोम वापरण्याची पद्धत दाखवणार आहोत. तर चला सुरू करुया…
Table of Contents
कंडोम काय आहे ?
कंडोम (निरोध) चा उपयोग नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी केला जातो. याच्या उपयोगाने लैंगिक रोग जसे एड्स, एच आय व्ही, गोनोरिया, सिफलिस इत्यादी रोगांचे जोखीम कमी होते.
कंडोम काय आहे तर कंडोम एका रबर पासून बनलेले आवरण आहे ज्याला संभोगादर्म्यान पुरुष लिंगावर घातले जाते. कंडोम वापराचा प्रमुख उद्देश पुरुषाच्या शुक्राणूना स्त्री च्या गर्भाशयात प्रवेश करण्यापासून रोखणे आणि preganancy टाळणे हा असतो. कंडोम सक्रिय झालेल्या लिंगावर घातले जाते. लैंगिक संबंधाआधी कंडोम सरळ लिंगावर घातले गेले पाहिजे. कंडोम वापराने 87% – 98% पर्यंत गर्भावस्थेला रोखता येते.
कंडोम ला लेटेक्स पासून बनवण्यात येते. परंतु ज्यांना लेटेक्स ची ऍलर्जी असेल ते पोलीयुरेथिन पासून बनलेले कंडोम देखील वापरात घेऊ शकतात.
कंडोम वापरण्याची पद्धत
- एका कंडोम चा उपयोग एकचदा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी करावा. व नेहमी चांगल्या दर्जाचे कंडोम खरेदी करावे.
- कंडोम खरेदी करण्याआधी त्याची एक्सपायरी दिनांक व्यवस्थित चेक करावी व यासोबतच पॅकेट ची पॅकेजिंग देखील व्यवस्थित तपासावी.
- पॅकेट मधून कंडोम बाहेर काढताना कैची चा वापर करू नये असे केल्यास कंडोम खराब होऊ शकते.
- कंडोम ला नेहमी सक्रिय झालेल्या (erected) पेनिस वर लावायचे असते. म्हणून जर लिंग उठलेले नसेल तर आधी त्याला पूर्णपणे उठू द्यावे.
- कंडोम चा उचकलेला भाग पुढील बाजूस ठेवावा आणि लिंगावर हळुवार कंडोम चढवावे. बोटांच्या साहाय्याने कंडोम पेनिस वर वरपर्यंत न्यावे.
- संभोग झाल्यानंतर तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. Ejaculation च्या लगेच नंतर लिंग नरम होण्याआधी 1-2 मिनिटात तुम्हाला कंडोम काढायचा आहे.
- संभोगानंतर लवकर लिंग काढले नाही तर कंडोम तुमच्या पार्टनर च्या योनीत अटकु शकते ज्यामुळे वीर्य पसरून गर्भवती होण्याचा धोका होऊ शकतो.
- कंडोम काढल्यानंतर डस्टबीन मध्ये फेकावे.
कंडोम वापरा बाबत काही महत्त्वाच्या गोष्टी
- कंडोम फक्त योनी संभोग नव्हे तर oral sex आणि anal sex साठी देखील उपयोगात घ्यायला हवे.
- कंडोम चे रॅपर आधीच फाडून ठेवू नये याला वापरण्याच्या काही वेळ आधीच फाडावे.
- एक कंडोम एका पेक्षा जास्त वेळा वापरू नये.
- कंडोम लावल्यानंतर याकडे लक्ष असू द्या की तुमचे लिंग आणि कंडोम मध्ये हवा राहता कामा नये.
- एकासोबत दोन कंडोम लावू नये असे केल्यास दोन्ही फाटण्याची शक्यता असते.
- कंडोम कधीही जाळू नये त्याला गल्ली व रोडवर फेकू नये. वापरलेले कंडोम नेहमी कचऱ्यात टाकावे.
कंडोम पाकीट खरेदी
मित्रांनो प्रत्येक पुरुषाने संभोगा दरम्यान कंडोम वापरायला हवे. कंडोम वापरल्याने गर्भधारणा तर टाळता येतेच परंतु या सोबतच अनेक रोगांपासून देखील आपल्याला रक्षण होते. कंडोम तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअर वर सहज मिळून जाईल व याला खरेदी करण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची देखील आवश्यकता नसते. भारतात उपलब्ध असणाऱ्या काही उत्तम कंडोम brands मध्ये manforce, Skore timless dotte,, kamsutra, durex इत्यादी कंडोमस् चा समावेश होतो.