Είναι δύσκολο να βρει κανείς το φάρμακο σε κάποιο φυσικό φαρμακείο στην Ελλάδα αγορά Cenforce online. Αγορά του Cenforce 25, 50, 100 online για άνδρες.
Beneficiezi de dobândă cu până la 2% mai mică dacă optezi pentru asigurare împrumut cu dobândă 0. Vezi aici toate beneficiile. Continuă. Perioadă de creditare: 48 luni.

जलद केस वाढवण्याचे 9 घरगुती उपाय | Fast Hair Growth tips in Marathi

केस वाढवण्याचे सोपे उपायHair growth tips in Marathi : प्रत्येक स्त्रीला वाटते कि,तिचे केस सुंदर, लांब व दाट असावेत. कारण सुंदर केसांवरच स्त्रीचे व्यक्तिमत्त्व आणि सौंदर्य हे खुलून दिसत असते. व यामुळेच प्रत्येक स्त्री ही आपल्या केसांची योग्य पद्धतीने निगा राखत असते. परंतु बऱ्याचदा चुकीचे लाइफस्टाईल आणि केसांकडील दुर्लक्षामुळे त्यांची वाढ थांबते.

म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही आपल्याकरिता केस वाढवण्याचे घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. हे आयुर्वेदीक उपाय व hair growth tips in marathi फॉलो करून आपण आपल्या केसांचे आरोग्य सुधारून त्यांना नक्कीच वाढवू शकतात.

केस वाढवण्याचे उपाय - hair growth tips in marathi
केस वाढवण्याचे उपाय

केस वाढण्यासाठी घरगुती उपाय – Fast hair growth tips in marathi

तेलाने मसाज करणे

आपली डोक्याची त्वचा ही अतिशय नाजूक असते तसेच जर ती कोरडी राहिली तर तिच्यावर कोंडा होण्याची शक्यता असते त्यामुळे दररोज रात्री तेलाने केसांची मसाज केल्यास केसांची वाढ तर होतेच परंतु, त्यासोबतच केसात कोंडा होण्याचे प्रमाण देखील कमी होईल. याशिवाय केसांना तेल लावून मालीश केल्याने मन देखील शांत राहते आणि शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

समतोल आहार

hair growth tips in marathi मध्ये आहार जर संतुलित नसेल अथवा त्यात पोषक तत्वांची कमी असेल तर त्याचा परिणाम हा शरीरासोबत केसांवर देखील होतो.त्यामुळे आपल्या आहारात डाळ, फळ भाज्या , फळे इत्यादीचा समावेश महत्त्वाचा असतो. काही फळे जशी केळी, सफरचंद, आवळा यात प्रथिने आणि जीवनसत्वे (अ, क) हे जास्त प्रमाणात असतात त्यामुळे केस तसेच त्वचा टवटवीत राहण्यात मदत होते. फळांसोबतच रोजच्या जेवणात दही चा समावेश करणे देखील केसांसाठी अतिशय महत्वाचे आहे

झोप

जसे पुरेशी झोप शरीराला उत्तम बनवण्यासाठी मदत करत असते, तसेच आपल्या केसांना मजबूत व केसांच्या वाढीसाठी देखील झोप आवश्यक आहे म्हणून कमीत कमी आठ तासांची झोप घेणे महत्वाचे आहे. hair growth tips in marathi पैकी झोप ही महत्वाची टीप आहे.

कोरफड चा वापर

केस वाढवण्याचे उपाय मध्ये आज घराघरात उपलब्ध असणारे कोरफड हे अतिशय सोपे आणि सहजगत्या मिळणारे मॉइश्चरायझर आहे. सुंदर आणि मुलायम केसांसाठी कोरफडचा गर काढून तो केसांना तसेच केसाच्या मुळांना लावल्यास व दहा ते पंधरा मिनिटानंतर केस स्वच्छ पाण्याने धुतल्यास केसांची वाढ व्यवस्थित आणि दाट होते. याशिवाय केसांची मॉइश्चरायझिंग देखील कोरफड मुळे होत असते. ज्यामुळे टाळूवर कोरडेपणा राहत नाही व कोंडा होण्याची समस्या देखील उत्पन्न होत नाही.

अंड्याच्या वापर

  • अंड्याचा वापर देखील केसांना मालिश करण्यासाठी केला जातो,अंड्यातील पिवळ्या भागात प्रथिने,जीवनसत्व क व अ हे भरपूर प्रमाणात असतात.
  • अंड्यातील पांढरा बलक काढून व्यवस्थित रित्या मिक्स करून केसांच्या मुळांशी लावून दहा मिनिटांनंतर स्वच्छ शाम्पूने केस धुतल्यास केस मुलायम होतात

चहा पावडर

  • दैनंदिन जीवनात वापरले जाणारे चहापावडर हे देखील आपली केस नरम, मुलायम करून त्यांची वाढ करण्यासाठी एक वेगळीच भूमिका बजावते.
  • एक चमचा चहा पावडर पाण्यात टाकून ते पाणी चांगल्या पद्धतीने उकळून घ्यावे व नंतर थंड झाल्यावर चाळणीने चहा पावडर वेगळे करून गळलेल्या पाण्याने केस धुतल्यास केसांना चकाकी येते.

दही चा वापर

  • दही मध्ये बॅक्टेरिया जास्त प्रमाणात असल्यामुळे ते केसांच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे असते.
  • एक वाटीत दही व अर्धे केळ कुस्करून ते मिश्रण केसांना लावल्याने देखील केसांची वाढ झपाट्याने होते.
  • दही हे कंडीशनिंग चे काम करत असते त्यामुळे ताजे दही आपली केसांवर लावल्याने केसांची त्वचा नरम मुलायम राहते.

बदामाचे तेल

hair growth tips in marathi मधून बदामाच्या तेलाचा वापर केसांच्या मजबुतीसाठी तसेच केसांच्या वाढीसाठी कारगर उपाय ठरला आहे. रोज रात्री झोपताना केसांच्या मुळाशी बदाम तेल लावल्याने केसांची वाढ लवकर होते. बदाम तेलात दोन लसूण पाकळ्या उकडून घ्याव्यात नंतर हे तेल कोमट झाल्यावर कापसाने केसांच्या मुळाशी लावल्यास देखील केसांना मजबुती येऊन चकाकी प्राप्त होते.

नारळाचे पाणी

नारळाच्या तेलाने केसांची वाढ होते हे तर जगजाहीर आहे. परंतु नारळाच्या पाण्याने देखील केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. केस वाढवण्याचे उपाय म्हणून देवळात फोडले जाणारे नारळ हे अत्यंत उपयुक्त ठरते, नारळाच्या पाण्याने केसांना पाच ते सहा दिवसांपर्यंत मसाज केल्यास त्यांची वाढ चांगली होती. तसेच डोक्यावरची त्वचा देखील मऊ होते.

कांद्याची पेस्ट

कांद्याचे बारीक काप करून मिक्सरमध्ये पेस्ट करून ते मिश्रण केसांना लावल्यास व अर्ध्या तासानंतर केस धुवून घेतल्यास केसांच्या वाढीसाठी ते फायदेशीर ठरते.

केस वाढवण्याचे सोपे उपाय – hair growth tips in marathi

आता आपण केस वाढवण्याचे सोपे उपाय म्हणून काही टिप्स पाहुयात. हे उपाय आपण रोजच्या दैनंदिन जीवनात अमलात आणू शकतात.

  1. नियमितपणे दर पाच ते सहा दिवसांनी केस व्यवस्थित रित्या शाम्पूने धुऊन घ्यावेत.
  2. केस धुण्याच्या आदल्या रात्री त्यांना कोणत्याही एका तेलाने मसाज करावा त्यात केसांच्या मुळापासून तर केसाच्या टोकापर्यंत पूर्ण व्यवस्थित मसाज करावी.
  3. जे आपण केसांना इलेक्ट्रॉनिक रित्या स्ट्रेटनिंग व कलरिंग या सर्व गोष्टी करत असतो त्या कमीत कमी कराव्यात नेहमी नेहमी या गोष्टींमुळे केसांची चमक जाऊन केस रुक्ष होतात.
  4. केसांच्या तळाशी जी फाटे फुटत असतात (दुभंगली जातात) त्यांना वेळोवेळी कात्रीने कापत राहावे. केसांना एका सरळ रेषेत कापल्याने फाटे फुटण्याची समस्या दूर होते.
  5. बाजारातील केमिकल युक्त कंडिशनर वापरण्यापेक्षा दर पंधरा दिवसांनी केसांना दही व अंड्याने मसाज करावी. असे केल्याने केसांना कंडिशनर सारखा नरम पणा घरच्या घरी येतो व डोक्याची त्वचा देखील निरोगी राहते.
  6. केसांना अति उष्ण पाण्याने धुऊ नये ,थोडं कोमट पाणी वापरल्यास केस रुक्ष होत नाहीत.
  7. शाम्पू वापरण्यापेक्षा शिकेकाई, रिठा यांनी केस धुतल्यास केस पांढरे होण्याच्या समस्या दूर होतात.
  8. रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश करावा आवळ्याचे ज्यूस किंवा आवळ्याचे लोणचं असं काही जेवणात समाविष्ट केल्याने केसांना पुरेशया प्रमाणात सी विटामीन मिळते व त्यांची वाढ लवकर होते.
  9. बाहेर निघताना डोक्यावर रुमाल किंवा ओढणी बांधून घेतल्याने प्रदूषणाचा केसांवर परिणाम होणार नाही.

केस वाढण्यासाठी व्यायाम व योगासन

दररोज व्यायाम केल्याने आपले शरीर सुदृढ, बळकट आणि मजबूत बनते. शरीरातील प्रत्येक भागावर व्यायामाचा काहीन काही परिणाम होत असतो. म्हणून व्यायामाद्वारे केसांचे देखील आरोग्य सुधारता येते. आपण केसांची वाढीसाठी पुढील आसने करू शकतात.

  • वज्रासन
  • उष्‍ट्रासन
  • सर्वागासन
  • पवनमुक्‍तासन
  • अधोमुखासन

नोट : कृपया वर देण्यात आलेले कोणतेही केस वाढण्यासाठी घरगुती उपाय केल्यास आपणास केस अथवा शरीराच्या इतर भागात काही साइड एफफेक्टस जसे एलर्जि वैगरे दिसत असेल तर तत्काल तो उपाय करणे थांबवून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तर मित्रहो हे होते केस वाढण्यासाठी घरगुती उपाय – hair growth tips in marathi. आशा आहे आपणास हे उपाय उपयोगी ठरतील. हा लेख आपले मित्र मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर नक्की करा. जर आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हास कमेन्ट मध्ये विचारू शकतात. विविध विषयांवरील माहितीपर लेख वाचण्यासाठी भेट द्या https://majhikalaji.com/ ला. धन्यवाद.

इतर लेख :

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Levitra, vardenafil original contrareembolso en España, levitra sin receta online. Cialis es efectiva aproximadamente durante 24 horas.
Viagra opprinnelig pris uten resept på apoteket Original Viagra i Norge uten resept. Mange lurer på om det er verdt å kjøpe Viagra for den neste erobringen og elleville natten.