केस वाढीसाठी आणि दाट होण्यासाठी घरगुती उपाय | how to grow hair faster in marathi

केस वाढीसाठी उपाय : केसांना डोक्याचे मुकुट म्हटले जाते. केस हेच स्त्री व पुरुष दोघांच्या सौंदर्यात वृद्धि करीत असतात. परंतु आजकाल अनेक वयस्क तसेच तरुण मंडळी मध्ये देखील केस गळती ची समस्या निर्माण झाली आहे. प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याचे केस लांब, दाट आणि चमकदार असावेत. म्हणून जर आपणही आपले केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर आजच्या लेखात आम्ही आपल्यासाठी केस वाढीसाठी आणि दाट होण्यासाठी घरगुती उपाय अर्थात kes vadhavnyache upay घेऊन आलो आहे. तर चला सुरु करूया…

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

केस वाढीसाठी आणि दाट होण्यासाठी घरगुती उपाय

कांदा :
कांद्याच्या रसात सल्फर असते जे केसांमध्ये कोलोजन चे उत्पादन वाढवते. ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारून त्यांचा विकास होऊ लागतो.

 • सर्वात आधी कांद्याला कापून त्याचा रस मिक्सर च्या मदतीने एका वाटीत काढून घ्या.
 • आता कांद्याच्या रसात कापसाचा तुकडा बुडवून केसांवर लावा.
 • कांद्याचा रस केसांना लावण्याच्या पंधरा मिनिटानंतर शाम्पू ने केस स्वच्छ धुवा.

अधिक चांगले परिणाम मिळवण्यासाठी हा उपाय आठवड्यातून दोनदा तरी करावा.

आवळ्याचे पावडर:
आवळ्यात antioxident गुणधर्म असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाणही जास्त असते. जे केसांच्या आरोग्यासाठी फार गुणकारी असते.

 • यासाठी सर्वात आधी 2 चमचे आवळा पावडर घ्यावे.
 • या आवळा पावडर मध्ये एक लिंबू चा रस मिसळा.
 • आता हे मिश्रण आपल्या केसांमध्ये लावावे.
 • अर्ध्या पाऊण तासानंतर केसांना स्वच्छ धुवून घ्यावे.

मध :
मधात पौष्टिक अँटी हाइड्रेंन्ट गुणधर्म असतात. जे केसांना मऊ मुलायम बनवण्यासाठी फार उपयुक्त असतात. याशिवाय केसांना नुकसान पोहचवण्यार्या कणांनाही ते दूर करते.
यासाठी जेव्हाही तुम्ही आपले केस धुणार असाल तेव्हा आपल्या शाम्पू मध्ये एक चमचा मध मिसळा व या मिश्रणाने केस स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करावा यामुळे तुमचे केस मऊ आणि मजबूत होतील.

तांदळाचे पाणी :
तांदळाचे पाणी झाडांना वाढण्यासाठी उपयोगी असते. परंतु याशिवाय केसांनाही ते अत्यंत उपयुक्त आहे. तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी 6 असते. जे केसांच्या मुळांना पोषण देते.

 • यासाठी काही तांदूळ 15 मिनिटांसाठी पाण्यात भिजून ठेवावे.
 • आता पाण्यातून तांदूळ बाहेर काढा आणि तांदळाचे पाणी केसात लावा.
 • तांदळाचे पाणी केसात लाऊन मसाज करा व 15 मिनिटे असेच राहू द्या.
 • 15 मिनिटानंतर केसांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

अद्रक :
अद्रक केसांच्या मुळांमध्ये रक्ताचे संचारण व्यवस्थित करते. ज्यामुळे केस निरोगी आणि घट्ट होतात.

 • यासाठी सर्वात आधी अद्रकाच्या वरील भाग काढून घ्या. व हे अद्रक मिक्सर मध्ये बारीक करून त्याचा रस काढा.
 • आता हे अद्रक केसांच्या त्या भागात लावा जेथे केस कमी आहेत.
 • अर्ध्या तासानंतर केसांना स्वच्छ पाण्याने धुवावे.

अंडे :
अंडे केसांच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. अंड्यात प्रोटीन, लोह, सल्फर, फाँस्फरस इत्यादी घटक असतात. याशिवाय अंड्यात असणाऱ्या पेप्टाइड मुळे केसांची वाढ जलद होते व टक्कल असणाऱ्या ठिकाणीही केस उगू लागतात. म्हणून महिन्यात एकदा तरी संपूर्ण केसांमध्ये अंड्याचे पेस्ट लावावे.

तर मंडळी हे होते केस वाढीसाठी आणि दाट होण्यासाठी घरगुती उपाय. हे घरगुती प्रयोग करून केसांचे आरोग्य निश्चितच सुधारता येते . म्हणून या पैकी शक्य होईल ते उपाय करण्याचा प्रयत्न नक्की करा धन्यवाद..

READ MORE :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *