केस काढण्याचे घरगुती उपाय – चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी उपाय : सुंदर चेहरा प्रत्येकालाच प्रिय असतो. स्त्रियांमध्ये तर सुंदरता ही अधिकच महत्त्वाची असते. परंतु चेहऱ्यावर येणारे नको असलेले केस या सौंदर्याला क्षती पोचवतात. चेहऱ्यावरील केस व ओठावरील केस काढणे हे केस काढण्यासाठी थ्रेडिंग, ब्लिच, क्रीम इत्यादींचा वापर केला जातो. यामुळे केस तर स्वच्छ होतात परंतु बऱ्याचदा असे करणे पीडादायक आणि त्वचेच्या आरोग्यासाठी हानिकारक असते.
आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी चेहऱ्यावरील केस काढण्याचे घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. केस काढण्याचे हे उपाय वापरुन आपण पार्लर न जाता घरीच चेहरा केसमुक्त आणि स्वच्छ करू शकतात. तर चला सुरू करूया….
Table of Contents
ओठांवरील / चेहऱ्यावरील केस काढण्याचे घरगुती उपाय
महिलांच्या चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस येण्याच्या समस्येला हिर्सुटिस्म (hirsutism) म्हटले जाते. हे केस गाल आणि ओठावर येऊ शकतात. आपल्या किचन मध्ये असणाऱ्या काही घरगुती वस्तूंच्या मदतीने केस काढण्याचे फेस पॅक बनवता येतात. हे घरगुती फेसपॅक वापरुन चेहऱ्यावरील केस व ओठावरील केस काढणे शक्य आहे. या बद्दल ची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
1) मध, साखर आणि लिंबू
आवश्यक सामुग्री
- दोन चमचे साखर
- दोन चमचे लिंबुचा रस
- दोन चमचे मध
- पाणी आवश्यकतेनुसार
- वॅक्सीन स्ट्रीप (यासाठी जाड जीन्स चा कापड देखील वापरला जाऊ शकतो)
- चेहऱ्याला लावण्याचे पावडर
उपाय
- नको असलेले केस काढून टाकण्यासाठी एका तव्यात साखर, मध आणि लिंबूचा रस मिक्स करा. हलक्या गॅस वर हे सर्व गरम करून घ्या.
- एका लाकडाच्या चमच्याने हे मिश्रण उलटे -पालटे करत रहा. याला चिटकू देऊ नका. जर पेस्ट जास्तच घट्ट होत असेल तर त्यात पाणी मिसळत रहा.
- हळू हळू याचा रंग भुरा आणि सोनेरी होऊ लागेल.
- यानंतर गॅस बंद करून वॅक्स थंडे होऊ द्या.
- थोड्या वेळाने चेहऱ्याच्या ज्या भागावरील केस काढायचे आहेत तेथे पावडर लावा. यानंतर हलके हलके गरम वॅक्स चेहऱ्याच्या त्वचेवर लावावे. आणि वॅक्स स्ट्रीप लाऊन 10-15 सेकंदात केस उगण्याच्या विरुद्ध दिशेने जोरात ओढावी.
- नको असलेले केस काढण्याचा हा उपाय केल्याने केस निघण्यासोबतच त्वचा देखील उजळते.
2) हळद
भारतात सौंदर्य वाढविण्यासाठी हळदीचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात आहे. हळदीमध्ये एँन्टीसेप्टीक गुणधर्म असतात जे शरीरावर झालेल्या जखमांना देखील भरून काढतात. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी हळदीचा उपयोग पुढीलप्रमाणे करता येऊ शकतो.
1 ते 2 चमचे हळद पाणी अथवा दूध मध्ये मिक्स करा. हे पेस्ट जास्त पातळ होऊ देऊ नका. यानंतर हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्यावर ही हळद लावा.15-20 मिनिट सुकू दिल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. हळदीचा हा उपाय नियमित आठवडाभर केल्याने चेहऱ्यावरील नको असलेले केस निघून जातात.
चेहऱ्यावरील केस जाण्यासाठी ब्युटि पार्लर चे उपाय
आजकाल जवळपास प्रत्येक स्त्री ब्युटी पार्लर जाते. हेअर कट, वॅक्सिंग,आयब्रो, मसाज असे एक न अनेक ब्युटी ट्रीटमेंट पार्लर मध्ये केले जातात. परंतु चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी काही प्रमुख प्रक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
- थ्रेडिंग: वॅक्सिंग प्रमाणेच थ्रेडिंग देखील चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी उपयोगी पद्धत आहे. अनेक महिला आयब्रो करीत असताना वरील ओठाचे थ्रेडिंग देखील करतात. केस काढण्याची ही पद्धत थोडी पीडादायक असते. या पद्धतीत दोन धारदार धाग्यांच्या मदतीने नको असलेले केस काढले जातात.
- ब्लिचिंग : अनेक महिला थ्रेडिंग तसेच वॅक्सिंग करायला घाबरतात. अशा महिलांसाठी ब्लिचिंग ही केस काढण्याची प्रभावी पद्धत असू शकते. या पद्धतीत केस निघत नाही परंतु त्यांना त्वचेवरच झाकले जाते. या पद्धतीत विशिष्ट प्रकारच्या क्रीम्स चे मिश्रण चेहऱ्यावर लावले जाते. हे मिश्रण चेहऱ्यावरील केसांना त्वचेसारखा रंग देते ज्यामुळे दुरून पाहिल्यावर केस दिसत नाहीत.
- प्लकिंग : चेहऱ्याचे केस काढण्यासाठी बऱ्याचदा प्लकर चा वापर केला जातो. प्लकर च्या मदतीने घरच्या घरीच चेहऱ्यावरील नको असलेले केस काढता येऊ शकतात. प्लकिंग करण्यासाठी सर्वात आधी चेहऱ्याला गरम पाण्याने स्वच्छ धुवावे. यानंतर चिमट्याच्या मदतीने आहे नको असलेले केस प्लक करून काढावेत. या पद्धतीत केस काढतांना थोडी पीडा होऊ शकते.
तर हे होते पार्लर न जाता चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी घरगुती उपाय. यासोबतच आम्ही आपल्याला पार्लर मध्ये केस काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती देखील सांगितल्या आहेत. हे उपाय एकदा नक्की करून पहा. व आपले अनुभव आम्हाला कमेन्ट करून सांगा.. धन्यवाद..
READ MORE :
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा