केस वाढवण्याचे सोपे उपाय – Hair growth tips in Marathi : प्रत्येक स्त्रीला वाटते कि,तिचे केस सुंदर, लांब व दाट असावेत. कारण सुंदर केसांवरच स्त्रीचे व्यक्तिमत्त्व आणि सौंदर्य हे खुलून दिसत असते. व यामुळेच प्रत्येक स्त्री ही आपल्या केसांची योग्य पद्धतीने निगा राखत असते. परंतु बऱ्याचदा चुकीचे लाइफस्टाईल आणि केसांकडील दुर्लक्षामुळे त्यांची वाढ थांबते.
म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही आपल्याकरिता केस वाढवण्याचे घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. हे आयुर्वेदीक उपाय व hair growth tips in marathi फॉलो करून आपण आपल्या केसांचे आरोग्य सुधारून त्यांना नक्कीच वाढवू शकतात.

Table of Contents
केस वाढण्यासाठी घरगुती उपाय – Fast hair growth tips in marathi
तेलाने मसाज करणे
आपली डोक्याची त्वचा ही अतिशय नाजूक असते तसेच जर ती कोरडी राहिली तर तिच्यावर कोंडा होण्याची शक्यता असते त्यामुळे दररोज रात्री तेलाने केसांची मसाज केल्यास केसांची वाढ तर होतेच परंतु, त्यासोबतच केसात कोंडा होण्याचे प्रमाण देखील कमी होईल. याशिवाय केसांना तेल लावून मालीश केल्याने मन देखील शांत राहते आणि शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
समतोल आहार
hair growth tips in marathi मध्ये आहार जर संतुलित नसेल अथवा त्यात पोषक तत्वांची कमी असेल तर त्याचा परिणाम हा शरीरासोबत केसांवर देखील होतो.त्यामुळे आपल्या आहारात डाळ, फळ भाज्या , फळे इत्यादीचा समावेश महत्त्वाचा असतो. काही फळे जशी केळी, सफरचंद, आवळा यात प्रथिने आणि जीवनसत्वे (अ, क) हे जास्त प्रमाणात असतात त्यामुळे केस तसेच त्वचा टवटवीत राहण्यात मदत होते. फळांसोबतच रोजच्या जेवणात दही चा समावेश करणे देखील केसांसाठी अतिशय महत्वाचे आहे
झोप
जसे पुरेशी झोप शरीराला उत्तम बनवण्यासाठी मदत करत असते, तसेच आपल्या केसांना मजबूत व केसांच्या वाढीसाठी देखील झोप आवश्यक आहे म्हणून कमीत कमी आठ तासांची झोप घेणे महत्वाचे आहे. hair growth tips in marathi पैकी झोप ही महत्वाची टीप आहे.
कोरफड चा वापर
केस वाढवण्याचे उपाय मध्ये आज घराघरात उपलब्ध असणारे कोरफड हे अतिशय सोपे आणि सहजगत्या मिळणारे मॉइश्चरायझर आहे. सुंदर आणि मुलायम केसांसाठी कोरफडचा गर काढून तो केसांना तसेच केसाच्या मुळांना लावल्यास व दहा ते पंधरा मिनिटानंतर केस स्वच्छ पाण्याने धुतल्यास केसांची वाढ व्यवस्थित आणि दाट होते. याशिवाय केसांची मॉइश्चरायझिंग देखील कोरफड मुळे होत असते. ज्यामुळे टाळूवर कोरडेपणा राहत नाही व कोंडा होण्याची समस्या देखील उत्पन्न होत नाही.