काळी मिरी चे फायदे मराठी | black pepper in marathi | kali mirch in marathi

Black pepper in marathi : भारतीय मसाल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थात काळी मिरी चा समावेश प्रामुख्याने केला जातो. काली मिरी भोजनात स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी वापरली जाते. परंतु आपणास हे जाणून आश्चर्य होईल की तुमच्या भोजनाला स्वादिष्ट बनवणारी मिरी चांगल्या आरोग्यासाठी देखील खूप उपयोगी आहे. आज आपण आयुर्वेदात सांगितलेले काळी मिरी चे फायदे आणि विविध रोगांना चांगले करण्याकरिता काळी मिरी चे उपयोग पाहणार आहोत. तर चला सुरू करुया…

काळी मिरी चे फायदे मराठी | black pepper in marathi
black pepper in marathi

black pepper in marathi | काळी मिरी काय आहे ?

हिंदी भाषेत काली मिर्च (kali mirch) आणि इंग्रजीत black pepper म्हणून ओळखल्या जाणाऱ्या black pepper ला मराठी मध्ये “काळी मिरी” म्हटले जाते. काळी मिरी हा एक औषधीय पदार्थ आहे. काळी मिरी दिसण्यात लहान, गोल आणि काळ्या रंगाची असते. याचा स्वाद तिखट असतो हा पदार्थ दीर्घ काळापर्यंत जिवंत राहू शकतो. उत्कृष्ट दर्जाची काळी मिरी खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा…

काळी मिरी चे फायदे

तिखट स्वाद असणार्‍या काळीमिरी चे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

भूक वाढवणे
भोजनाचा स्वाद वाढविण्या सोबतच काळी मिरी ही भूक वाढवण्याचे देखील कार्य करते. आपला सुगंध आणि विशिष्ट औषधी गुणधर्मामुळे काळी मिरी व्यक्तीची भूक वाढवते. जर तुम्हालाही भूक न लागण्याची समस्या असेल किंवा भूक कमी लागत असेल, तर अर्धा चमचा काळी मिरी आणि गुड यांचे मिश्रण तयार करावे व हे मिश्रण सकाळ संध्याकाळ सेवन करावे. या उपायाने भूक वाढायला लागेल.

पचनशक्ती वाढवते
काळी मिरी पोटात हायड्रोक्‍लोरिक ऍसिड चा स्त्राव वाढवते. यामुळे व्यक्तीची पचनशक्ती वाढते. पचनशक्ती सुधारण्यासोबतच काळीमिरी पोटातील सूजन, पोट फुगणे, अपचन, पोटात गॅस तयार होणे आणि बद्धकोष्टता च्या समस्येपासून मुक्ती देते.

डोकेदुखी दूर करण्यात काळी मिरी चे फायदे
जर सारखी डोकेदुखी सुरू असेल तर गॅसवर तवा गरम करावा व गरम तव्यावर 2 ते 3 काळी मिरीचे दाणे टाकावे. यानंतर दाण्यातून निघणारा धूर नाकाद्वारे आत ओढावा. असे केल्याने डोकेदुखीत तर आराम मिळतोच परंतु जर उचक्या लागत असतील तर त्या देखील बंद होतात.

सर्दी खोकल्यात काळीमिरी चे सेवन
सर्दी खोकला ची समस्या असल्यास काळी मिरी चे 2 ग्राम चूर्ण गरम दूध सोबत प्यावे. यासोबत काळी मिरीचे 7 दाणे गिळून घ्यावेत. असे केल्याने सर्दी खोकला कमी होतो.

पोटात गॅसेस होत असल्यास काळी मिरी चे फायदे
काळीमिरी पोटातील गॅसेस नष्ट करण्यासाठी मदतगार आहे. जर तुम्ही देखील पोटातील गॅसेस चे शिकार असाल तर एक चमचा काळी मिरी पावडर व एक चमचा जिरे पावडर ताक मध्ये टाकून प्यावे. ह्या उपायाने पोटातील गॅस व अपचन ची समस्या कमी होईल. black pepper in marathi काळी मिरी चा हा उपाय खूप उपयोगी आहे. पोट साफ करण्यासाठी उपाय वाचा येथे

ताप कमी करण्यासाठी काळी मिरी चे उपयोग
ताप येत असल्यास एक चमचा काळी मिरी पावडरमध्ये अर्धा लिटर पाणी आणि 2 चमचे मिश्री टाकून चांगले उकळावे. यानंतर हा काढा सकाळ संध्याकाळ प्यावा. असे केल्यास दात मध्ये आराम मिळतो.

याशिवाय दुसरा उपाय 5 काळी मिरी दाण्यांचे पावडर, अर्धा चमचा ओवा पावडर, अर्धा चमचा गुळवेल इत्यादी गोष्टी घेऊन एक ग्लास पाण्यात टाकाव्यात व तापाने पीडित असलेल्या व्यक्तीला सकाळ-संध्याकाळ पिण्यास द्यावे.

काळी मिरी चे नुकसान

आवश्यकतापेक्षा जास्त उपयोग केल्याने काळी मिरी चे पुढील नुकसान होऊ शकता.

  • काळीमिरी स्वभावाने उष्म असते म्हणून जास्त सेवन केल्यास पोटात जलन व ॲसिडिटीची समस्या होऊ शकते.
  • जास्त काळी मिरी चा धूर नाकाद्वारे आत ओढल्याने अस्तमा, छातीत जलन होऊ शकते.
  • गर्भवती स्त्रियांनी काळी मिरी चे सेवन करू नये.
  • उन्हाळ्यात काळीमिरी चे सेवन नाकातून रक्त वाहण्याची समस्या निर्माण करू शकते.

तर मित्रांनो ह्या या लेखात आपण काळी मिरी चे फायदे (black pepper in marathi) व विविध रोगांमधील फायदे पाहिलेत. आपणास ही kali mirch in marathi माहिती कशी वाटली कमेन्ट करून नक्की सांगा आणि black pepper in marathi ह्या माहितीला आपले कुटुंबीय व मित्रमंडळीसोबत नक्की शेअर करा धन्यवाद…

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *