बाळाचे पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय इंटरनेट वर मोठ्याप्रमाणात सर्च केले जाते. परंतु बाळाची शी होण्यासाठी उपाय (Balachi Shi Honyasathi Upay) काय करावेत याविषयी अजूनही अनेकांच्या मनात संभ्रहाचे वातावरण आहे.
घरातील लहान मूल हा घरातील सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. परंतु ज्यावेळी बाळ कारण नसतांना रडू लागते तेव्हा काय करावे हे आईवडिलांना लक्षात येत नाही. बऱ्याचदा बाळाचे पोट दुखत असते पण त्याचे पोट का दुखत आहे हे आपल्याला कळत नाही. पोट दुखण्यामागील एक कारण बाळाचे पोट साफ न होणे हे देखील असू शकते. आज आपण बाळाच्या पचनसंस्थेची काळजी कशी घ्यावी व बाळाचे पोट साफ होत नसेल तर बाळाचे पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय काय करावे या विषयी माहिती घेणार आहोत.
बाळाचे पोट साफ न होणे यामागील कारणे
लहान बाळ अचानक रडायला लागले तर सहसा त्यामागे पोटदुखी हे कारण असते. लहान मुलांना पोटदुखीची समस्या सतावणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण त्यामुळे त्या बाळाला खूप जास्त त्रास होतो. पोटदुखीची कारणे तशी अनेक आहेत आणि अनेक घटक त्याला कारणीभूत असतात.
लहान मुलांचे पोट अत्यंत लहान आणि नाजूक असते. ते सहज खराब होऊ शकते. तसेच बाळाच्या आतड्यांचा सुद्धा संपूर्ण विकास झालेला नसतो ज्यामुळे त्यांना सतत पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा ते तोंडातून अन्ननलिकेत जाते, नंतर पोटात व त्यानंतर छोट्या आतडयामध्ये जाते. छोट्या आतडयामध्ये जाईपर्यंत बऱ्याच अन्नाचे पचन झालेले असते. त्यांनंतर अन्न मोठ्या आतडयामध्ये जाते. मोठ्या आतडयामध्ये या न पचलेल्या अन्नातील पाण्याचा अंश शोषून घेतला जातो. जितका जास्त काळ हे न पचलेले अन्न मोठ्या आतडयामध्ये साठून राहते तेवढा त्यातील पाण्याचा अंश कमी होत जातो व पोट साफ होण्यात समस्या निर्माण होतात.
हे पण वाचा> बाळ गुटगुटीत होण्यासाठी घरगुती उपाय
बाळाचे पोट साफ न होण्याची लक्षणे | Balala shi n hone Lakshane
- आठवड्यातून 3 किवा त्यापेक्षा कमी वेळा पोट साफ होणे
- पोटात दुखणे, पोट कडक लागणे, पोट फुगणे
- शौच खूप कडक आणि कोरडे असणे
- खूप जोर लावावा लागणे
- एकावेळी पोट नीट साफ न होणे
- वारंवार जावे लागणे
- भूक कमी होणे, वजन कमी होणे
- शौचाद्वारे रक्त पडणे
ही काही लक्षणे आहेत ज्यावरून आपल्याला समजू शकते की बाळाला पोट साफ न होण्याची समस्या निर्माण झाली आहे. ही लक्षणे लक्षात येताच त्यावर लवकर उपाय केले पाहिजेत. आपण घरच्याघरी काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करून लहान मुलांना असणारी ही समस्या सोडवू शकतो.
हे पण वाचा> लहान बाळाचा सर्दी खोकला घरगुती उपाय
बाळाचे पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय | Balachi Shi Honyasathi Upay
पुढे आम्ही आपणास काही आवश्यक आणि प्रभावी असे बाळाचे पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय देत आहोत. आपण हे उपाय नक्की करून पाहवेत.
हळुवार व्यायाम करवावा
बाळाचे पोट साफ होत नसल्यास त्याच्या पायांना हळुवार वर खाली व आजूबाजूला करावे. अश्या पद्धतीने त्याचा व्यायाम करावा. पायांना सायकल प्रमाणे गोल गोल करावे. असे केल्याने बाळाचा चांगला व्यायाम होतो. व व्यायाम झाल्यावर पोट लवकर साफ होण्याची शक्यता वाढते.
याशिवाय आपण बाळाच्या पोटाच्या खालील बाजूस मसाज देखील करू शकतात. ही मसाज केल्याने देखील अडकलेली संडास बाहेर पडते.
कोमट पाण्याने अंघोळ घालावी
बाळाची अंघोळ कोमट पाण्याने घातल्यास त्याच्या शरीराच्या मांसपेशीचा व्यायाम होतो. ज्यामुळे पोट आणि पचन अवयव देखील चांगल्या पद्धतीने कार्य करू लागतात.
नारळ तेलाचा उपयोग
जर बाळ 6 महिन्यापेक्षा लहान असेल तर तुम्ही बाळाचे पोट साफ होण्यासाठी नारळ तेलाचा उपयोग करू शकतात. यासाठी नारळाचे तेल बाळाच्या संडास होण्याच्या जागी लावावे. यामुळे अडकलेली संडास लवकर बाहेर पडते.
आहारात बदल
लहान बाळांमद्धे पोट साफ न होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार. आहारात फायबरचे प्रमाण कमी असणे तसेच पाण्याचे प्रमाण कमी असणे, जंक फूडचा अतिरेक, तसेच पॅकेज फूड म्हणजेच बिस्किटे, ब्रेड, चिप्स, नूडल्स यांचे अधिक प्रमाणात सेवन करणे. ही पोट साफ न होण्याची काही कारणे आहेत. जर मूल एकाच जागी बसून राहत असेल तर यामुळे देखील पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
लहान मुलांचे पोट साफ होण्यासाठी उपाय
- सकस आहार घेणे.
- दररोज २ वेळ भाज्या खाणे.
- १ ताजे फळ खाणे.
- पुरेसे पाणी पिणे.
- रोज सकाळी उठल्यावर ७-८ काळे मणूके आणि २-३ अंजिराचे तुकडे भिजवून मुलांना द्यावेत.
- लहान मुलांना चीज, पनीर, केळी, दही, बिस्कीट, पिझ्झा-पास्ता यासारखे पदार्थ देणे शक्य तितके टाळावे.
- कडधान्य, सुकी फळे, ब्रोकली, स्प्राऊट्स, कोबी, फ्लॉवर, ओटमिल, नासपती, सफरचंद, आंबट फळे, मका, आणि कांदा या व अशा सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये शुगर आणि कार्बोहाइड्रेट असते जे बाळाला पचत नाही म्हणून हे पदार्थ देणे टाळावे.
- दुधाचे अतिरिक्त सेवन टाळावे.
- बाळ ६ महिन्यांपेक्षा मोठे असेल तर आहारात थोडया प्रमाणात घरच्या साजूक तुपाचा समावेश करणे उत्तम असते.
- चिमूटभर हिंग नाभीभोवती लावण्यानेही पोट दुखणे बंद होण्यास मदत मिळते.
- मुलांना शारीरिक हालचाली वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
- पोटाला कोमट तेलाने मसाज करावा.
हे छोटे छोटे उपाय करून आपण लहान मुलांमधील पोट साफ न होण्याची समस्या नक्कीच कमी करू शकतो.
डॉक्टरांची मदत केव्हा घ्यायची?
- २ आठवड्यापेक्षा जास्त काळ ही समस्या राहिल्यास
- ताप आला तर
- पोट दुखत असेल किंवा फुगत असेल तर
- शौचातून रक्त पडत असेल तर
- मुलांचा आहार कमी झाला. वजन कमी झाले तर
तर या लेखात आपण लहान बाळांमधील पोट साफ न होण्याच्या समस्या बद्दल माहिती घेतली. व बाळाचे पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय काय करावेत या विषयी ची माहिती प्राप्त केली.आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल व हे Balachi Shi Honyasathi Upay आपल्या उपयोगात नक्की येतील. आपल्या बाळाचे पोट साफ होण्यासाठी हे उपाय नक्की करून पहा या उपायांमुळे तुमच्या बाळाला लवकरात लवकर संडास होईल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद..
अधिक लेख वाचा