पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त उर्जेची आवश्यकता असते, कारण पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त शारीरिक श्रम घेत असतात. थंडीच्या काळात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक बदल करतो. खरे तर पुरुषांनी थंडीच्या वातावरणात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काही पदार्थांची यादी घेऊन आलेलो आहोत. ज्यांना प्रत्येक पुरुषाने आपल्या आहारात सामील करायला हवे
1) ग्रीन टी
पुरुषांनी आपल्या दिवसाची सुरुवात ग्रीन टी ने करावी. जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही दिवसभरात २-३ कप ग्रीन टीचे सेवन करू शकता. शरीर निरोगी ठेवण्यासोबतच ग्रीन टी एनर्जीनेही परिपूर्ण असते, म्हणून हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आपण ग्रीन टी चे सेवन करू शकतात.
2) बदाम-
बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तुम्हाला सांगू इच्छितो की बदाम हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट युक्त असतात. एवढेच नाही तर यामध्ये प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन ई देखील चांगल्या प्रमाणात आढळते. आहारात बदामाचा समावेश केल्यास हृदय आणि पचनसंस्था निरोगी राहते. यासाठी आपण भिजवलेले बदाम चे सेवन करू शकतात. याबद्दल ची माहिती वाचा येथे>> भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे.
3) अंडी-
पुरुषांना प्रथिनांची फार गरज असते. अशा परिस्थितीत आपल्या शरीरातील प्रथिनांच्या पुरवठ्यासाठी आपण अंडी खाऊ शकतात. अंड्यांमध्ये अमिनो अॅसिड आढळते, जे स्नायूंच्या वाढीसाठी फायदेशीर ठरू शकते. म्हणून थंडीच्या दिवसात आठवड्यातून 3-4 वेळा अंडीचे सेवन केले जाऊ शकते.