बदाम कसे खावे योग्य पद्धती व भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे : ड्राय फ्रुट्स मध्ये सामील असलेले बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेकदा शरीरातील प्रोटीन्स ची कमतरता भरून काढण्यासाठी बदाम खाण्याची सल्ला दिली जाते. बदाम मध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट असते. परंतु अनेकांना बदाम खाण्याची योग्य पद्धत व बदाम कसे खावे याविषयी माहित नसते, ज्यामुळे बदाम खाण्याचे संपूर्ण फायदे शरीराला मिळत नाहीत.

आजच्या या लेखात आम्ही आपल्याला बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे व बदाम कसे खावे याविषयीची माहिती देणार आहोत. याशिवाय व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने बदाम खाल्यास शरीराला कोण कोणते फायदे होतात याविषयीची देखील आपण जाणून घेऊया…

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

बदाम कसे खावे ?

मंडळी सर्वात आधी आपण जाणून घेऊया की बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे.

तर बदाम चे संपूर्ण फायदे मिळवण्यासाठी रात्रभर भिजवून ठेवलेले बदाम खाण्याची सल्ला दिली जाते. यासाठी बदाम रात्री एक कप पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी सात वाजता काहीही न खाता त्यांचे सेवन करावे. आपण बदाम खण्याआधी त्यावर असलेली साल काढून घ्यावी. याशिवाय शक्य झाल्यास आपण एक कप दुधासोबत या बदामचे सेवन करू शकतात. अशा पद्धतीने दररोज सकाळी बदाम खाल्ल्याने शारीरिक क्षमता आणि बुद्धी तल्लख व्हायला मदत होते व याशिवायही इतर अनेक फायदे होतात.

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

सकाळी उपाशीपोटी भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत…

  1. पचन सुधारते
    सुक्या बदमांच्या तुलनेत भिजवलेले बदाम शरीरात एंजाइमची निर्मिती करण्यास मदत करतात. यामुळे पचनप्रक्रिया सुधारते. परंतु आपणास भिजवलेल्या बदाम वरील साल काढूनच बदाम चे सेवन करायचे आहे. जर आपण सालीसह बदाम खात असाल तर असे केल्याने आपले पाचन मंदावू शकते.

  2. स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता वाढते
    बदाम खाल्ल्याने बुद्धी वाढते असे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. बदाम मध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि अँटी ऑक्साईडंट असतात. ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि गोष्टी दीर्घकाळापर्यंत स्मरणात ठेवण्यात मदत होते. याशिवाय बदाम च्या सेवनाने बौद्धिक विकास होतो, व्यक्तीची विचार करण्याचे क्षमता वाढते.

  3. वजन नियंत्रणात राहते
    भिजवलेल्या बदामामध्ये ‘व्हिटॅमिन ई’ अँटी-ऑक्सिडेंटच्या स्वरुपात कार्य करते. बदामामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन वाढत नाही. परंतु दैनंदिन आहारात एकाचवेळी भरपूर बदाम खायचे नाहीत. दोन जेवणाच्या वेळांमध्ये आपण बदाम चे सेवन करू शकतात. बदाम सेवनाने अधिक भूक लागत नाही आणि भुकेवर नियंत्रण आल्याने वजन देखील वाढत नाही. अशा पद्धतीने भजन कमी करण्यासाठी आपण जेवणाच्या 2-3 तास आधी काही प्रमाणात बदाम सेवन करू शकतात.

वाचा> उत्तम आरोग्यासाठी पाणी पिण्याचे काही नियम

मित्रांनो हे होते भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे इत्यादी फायद्या व्यतिरिक्त भिजवलेले बदाम पचनाला हलके असतात. बदामात पेशी, स्नायू आणि हाडांना आवश्यक असलेले कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम हे धातूदेखील असतात. आपल्या डाएटमध्ये बदामाचा समावेश केला तर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारांसह अन्य गंभीर स्वरूपाचे आजार दूर राहण्यास मदत होते. त्वचेसंबंधी समस्या जसे मुरुम, त्यांचे डाग, सुरकुत्या इत्यादी दूर राहतात.

तर मंडळी वाट कसली पाहता आताच बदाम भिजत घाला. घरात बदाम नसतील तर आजच खरेदी करा. कारण शेवटी आरोग्य हीच धनसंपदा. आपण ऑनलाईन देखील उत्तम कंपनीचे बदाम खरेदी करू शकता. ॲमेझॉन वरून ऑनलाईन 1kg उत्तम ब्रॅंड चे बदाम खरेदी ची लिंक आम्ही आपणास पुढे देत आहोत.

तर मित्रहो या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत बदाम कसे खावे व भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत या विषयी ची माहिती शेअर केली. आशा आहे आपणास ही माहिती उपयोगी ठरली असेल. हा लेख आपले कुटुंबीय आणि मित्र मंडळी सोबतही नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांनाही या विषयी चे ज्ञान होईल. धन्यवाद

Read More

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा