हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यात आपल्या त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होतो. त्यामुळे हिवाळा असो की उन्हाळा, आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. कोरड्या त्वचेचा सर्वाधिक त्रास हिवाळ्यात होतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे हे सामान्य आहे. कारण याच ऋतूत त्वचे मधील ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडते
हिवाळ्याच्या सीजन मध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण उबदार कपड्यांचा वापर करून स्वतःचे संरक्षण करतो, परंतु अनेकदा आपण आपल्या त्वचेची योग्य काळजी घेत नाहीत. परिणामी त्वचेची चमक कमी होऊ लागते. थंड वारे त्वचेची आर्द्रता पूर्णपणे काढून घेतात, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. परंतु आता या हिवाळ्यात आपल्या त्वचेला थंडीपासून वाचवण्यासाठी आपण या लेखातील सोपे घरगुती उपाय करू शकतात.
Table of Contents
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे उपाय
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याची समस्या आपल्याला सतावत असेल तर पुढे काही उपयुक्त टिप्स देण्यात आलेले आहेत. ज्यांचा उपयोग करून आपण कोरड्या त्वचेपासून मुक्ती मिळवू शकतात.
त्वचेला मॉइश्चरायझ करा
हिवाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझ करणे सर्वात महत्वाचे असते कारण या ऋतूत त्वचा सर्वात जास्त कोरडी होते. मॉइश्चरायझर आपल्या त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते आणि हात व गाल फुटणे टाळते.
आपल्या संपूर्ण शरीराला मॉइश्चरायझिंग करत राहायला हवे. कारण हिवाळ्यात आपल्या हात आणि पायांची त्वचा देखील कोरडी होते. हिवाळा आणि उन्हाळा अशा दोन्ही ऋतूंसाठी बाजारात मॉइश्चरायझर्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या त्वचेनुसार कोणतेही उत्पादन वापरू शकता.
हिवाळ्यातही सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. चेहऱ्याचा ओलावा राखण्यासाठी तुम्ही कोरफड, खोबरे, शिया बटर आणि हर्बल तेल वापरू शकता. यासोबतच त्वचा मुलायम ठेवण्यासाठी तुम्ही घरी देखील मॉइश्चरायझिंग पॅक तयार करू शकता. यासाठी दोन चमचे दुधात एक चमचा बदाम पावडर मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर दहा मिनिटे राहू द्या. त्यानंतर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा पॅक रोज रात्री झोपण्यापूर्वी लावावा.
ओठांची काळजी
कोरड्या वार्याचा सर्वाधिक परिणाम मऊ आणि कोमल ओठांवर होतो. त्यामुळे ओठ फुटू लागतात आणि कोरडे होतात. या हिवाळ्यातही ओठांना मॉइश्चराईझ ठेवायचे असेल तर पेट्रोलियम जेली आणि व्हिटॅमिन-ई असलेले लिप बाम ओठांवर लावा.
ओठांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नाभीत देशी तूप लावा. ओठांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठीही हा उपाय खूप प्रभावी आहे. जर तुमचे ओठ खूप क्रॅक होत असतील तर काही दिवस लिपस्टिक लावू नका. तसेच हिवाळ्यात मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी आणि लिपस्टिक लावल्यानंतर ओठांना मॉइश्चरायझ करायला विसरू नका.
हाताची काळजी
हातावरील त्वचा ही आपल्या शरीरातील सर्वात पातळ त्वचा असते. त्यामुळे हातांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी व्हिटॅमिन-ई असलेली क्रीम वापरावी. हँड क्रीम दिवसातून दोन ते चार वेळा वापरा. जर खूप थंडी वाजत असेल तर हातमोजे घालून बाहेर जा.
पायाची काळजी
हिवाळ्यात पायांचे रक्षण करण्यासाठी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझरऐवजी ऑइल बेस्ड मॉइश्चरायझर लावा. तेल-आधारित मॉइश्चरायझर्स पायांच्या त्वचेवर एक मजबूत थर तयार करतात, जे कोणत्याही सामान्य क्रीमपेक्षा त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी अधिक प्रभावी असतात. पायासोबतच तळपायची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. टाचांना मऊ आणि सुंदर बनवण्यासाठी पेट्रोलियम जेली किंवा ग्लिसरीन असलेले लोशन लावा. वेळोवेळी पाय घासायला विसरू नका.
तर मित्रहो या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे यावर काय उपाय करायला हवेत आणि हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी ची उपयुक्त माहिती शेअर केली. आशा आहे की आपणास ही माहिती आवडली असेल. हा लेख इतरांसोबतही नक्की शेअर करा. जेणेकरून प्रत्येकाला याविषयी चे ज्ञान होईल. धन्यवाद..
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा