हाता पायाला मुंग्या येणे घरगुती उपाय व हाताला मुंग्या येणे उपचार : जास्त वेळ बसणे किंवा विश्राम केल्याने हाता पायामध्ये मुंग्या येण्याची समस्या होऊ लागते. एक अथवा एकापेक्षा जास्त नसांवर येणाऱ्या दबावामुळे हात पाय सुन्न होऊन जातात. या मागे वेगवेगळी कारणे असू शकतात. परंतु आपण हाताला मुंग्या येणे उपचार म्हणून काही घरगुती उपाय करू शकतात. ज्यामुळे हाताला व पायाला मुंग्या येणे ही समस्या कायमची दूर करता येईल.
आजच्या या लेखात आपण हाताला मुंग्या येणे तसेच पायाला मुंग्या येणे यामागील कारणे, उपाय आणि उपचार पाहणार आहोत. तर चला सुरू करुया..
Table of Contents
हाता पायाला मुंग्या येण्याची कारणे
हाता पायामध्ये मुंग्या येण्याची समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकते. परंतु प्रश्न आहे की यामागील मुख्य कारणे कोणती आहेत. तर चला जाणून घेऊया यामागील कारणे.
- एकाच स्थितीत दीर्घकाळापर्यंत बसणे अथवा उभे राहणे.
- पाठीच्या माकड हाडावर जोर अथवा दबाव पडणे.
- हर्निएटेड डीस्क (नसांवर दबाव पडणे)
- मान अथवा कंबरेतील नसांमध्ये इजा होणे.
- व्हिटॅमिन बी ची कमतरता.
- डायबिटीस
- शरीरात गाठी होणे.
- एखाद्या विशिष्ट औषधी मुळे.
- किडे अथवा प्राण्याच्या चावण्यामुळे.
- जन्म दोषामुळे
- शरीरातील कॅल्शियम, पोटॅशियम आणि सोडियम च्या असंतुलनामुळे.
- डोकेदुखी मायग्रेन ची समस्या
- थायरॉईड
- स्त्रोक
हाता पायांमधील मुंग्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय
लव्हेंडर ऑईल
लव्हेंडर हे फूल सुवास आणि औषधी गुणधर्म दोन्हींसाठी ओळखले जाते. लव्हेंडर तेल मसाज शरीरातील अवयवांना येणार्या मुंग्या दूर करण्यासाठी सहाय्यक आहे. यासाठी अर्धा कप बदाम च्या तेलात 8 ते 10 थेंब लव्हेंडर तेल एकत्रित करावे आणि मुंग्या येत असलेल्या हात अथवा पायांना या तेलाने मसाज करावी. बदाम आणि लव्हेंडर च्या तेलात एंटी इनप्लेमेंटरी गुणधर्म असतात जे हातापायांमध्ये रक्तांच्या प्रवाह सुरळीत करतात आणि सुजनही दूर करतात. लव्हेंडर तेल >> खरेदी करा येथे
लसूण आणि सुंठ
जर तुम्हाला नेहमी हाता पायाला मुंग्या येण्याची समस्या होत असेल, तर हातापायाला मुंग्या येणे यावर घरगुती उपाय म्हणून सकाळी सकाळी सुंठाचे काही तुकडे आणि लसणाच्या दोन पाकळ्या चावून खाव्यात. असे केल्याने हाताला व पायल येणाऱ्या मुंग्यामध्ये नक्कीच आराम मिळेल. कारण या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. व हातापायांच्या मुंग्या येण्यामागील प्रमुख कारण अव्यवस्थित झालेला रक्तप्रवाह हेच आहे. म्हणून हा उपाय आपल्यासाठी प्रभावी ठरू शकतो.
पिंपळाची पाने
पिंपळाचे झाड हे फारच गुणकारी मानले जाते. या झाडाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे एंटीऑक्सीडेंट आणि मिनरल असतात. जर तुम्हाला नेहमी हाताला मुंग्या येणे ही समस्या होत असेल तर पिंपळाची तीन ते चार पाने मोहरीच्या तेलात गरम करून घ्या. थोडे थंड झाल्यावर जेथे तुम्हाला मुंग्या येत असतील त्या जागेवर तुम्ही हे तेल लावू शकता. मोहरीच्या या तेलात पिपळाच्या पानांमुळे अनेक एंटीऑक्सीडेंट गुणधर्म तयार झालेले असतात.