गुडघे दुखी वर घरगुती उपचार – knee pain home remedy in marathi : वाढत्या वयासोबत गुडघे व शरीराचे इतर सांधे दुखी सुरू होते. शरीरातील सांधे असे अवयव असतात जेथे दोन किंवा त्यापेक्षा जास्त हाडे एकमेकांना जुळलेले असतात. गुडघे हे देखील शरीराचे सांधे आहेत. परंतु आजकाल वाढत्या वयासोबत अनेक लोकांमध्ये गुडघेदुखीची समस्या निर्माण होत आहे.
या लेखात गुडघेदुखीवर रामबाण उपाय आयुर्वेदिक व घरगुती उपचार आणि गुडघेदुखी साठी व्यायाम देण्यात आले आहेत. जर आपणही गुडघे दुखण्यावर उपाय शोधत असाल तर हे उपाय आपण एकदा जरूर करून पहावे ही विनंती..
Table of Contents
गुडघे दुखी ची कारणे
इजा होणे अथवा मार बसणे
गुडघेदुखी चे प्रमुख कारण मार बसणे किंवा गुडघ्याला इजा होने असू शकते. कारण गुडघ्यावर मार बसल्याने गुडघ्यातील लिगामेंट्स, टेंडन और तरल पदार्थाला नुकसान पोहोचते.
लूज बॉडीज
गुडघ्यात लिगामेंट हाडाचे लहान लहान भाग असतात. जे गुडघ्यात मोकळेपणाने फिरत असतात. परंतु गुडघ्यातील यांचा प्रवाह थांबल्याने गुडघेदुखी सुरू होते. याशिवाय ऑस्टियोआर्थराइटिस, ऑस्टियोमायइलिटिस, टेन्डीनिस, बेकर्स सिस्ट, घासलेला लिगामेंट, घासला गेलेला कार्टिलेज इत्यादी गुडघे दुखी ची कारणे असू शकतात.
गुडघे दुखी वर घरगुती उपचार – knee pain home remedy in marathi
गुडघेदुखी पासून वाचण्यासाठी व गुडघे दुखीवरील घरगुती उपाय म्हणून पुढील गोष्टी नेहमी लक्षात असू द्या-
- रात्रीच्या वेळी हलके अन्न खावे.
- रात्रीच्या वेळी हरभरे, भेंडी, बटाटे, काकडी, मुळा, दही इत्यादींचे सेवन चुकूनही करू नका.
- गुडघेदुखी असणार्यांना रात्रीच्या वेळी दूध किंवा दाळ खाणे हानिकारक आहे.
- जास्त करून लोकांमध्ये गुडघेदुखीची समस्या मार लागल्याने सुरू होते, म्हणून गुडघ्यांना मार लागण्यापासून वाचवावे. जर आपण एखाद्या खेळ खेळत असाल तर गुडघ्यांवर सेफ्टी पँड जरूर वापरा.
- गतिशील राहा : नेहमी कार्यरत व गतिशील राहिल्याने गुडघ्यांचा योग्य पद्धतीने व्यायाम होतो. जो व्यक्ती नियमित व्यायाम, चालणे व खेळ खेळणे इत्यादी गोष्टी करतो त्याला गुडघेदुखीची समस्या कधीही होत नाही.
- वजन नियंत्रणात ठेवा : जर तुमचे शारीरिक वजन नियंत्रणात असेल तर गुडघे व पायांवर अधिक दबाव येणार नाही. शरीराचे अत्याधिक वजन कंबर आणि पायांवर दबाव टाकते ज्यामुळे तुमच्या शरीराचे कार्टिलेज तुटण्याचा धोका असतो. म्हणूनच आपल्याला आपले वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
गुडघेदुखीवर रामबाण उपाय
हळदीचा लेप
गुडघेदुखीवर रामबाण उपाय म्हणजेच हळद आणि चुना होय. हळद आणि चुना गुडघ्याचे दुखणे दूर करण्यात खूप सहाय्यक आहे. यासाठी तुम्हाला हळद आणि चुना मोहरीच्या तेलात मिसळून गरम करून घ्यायचे आहे. यानंतर हा कोमट झालेला लेप गुडघ्यांवर लावा. हा उपाय केल्याने गुडघेदुखी नक्कीच कमी होईल.
बर्फ उपचार
जर हात लावताच गुडघे दुखत असतील व गुडघ्यांमध्ये सुजन आलेली असेल तर गुडघेदुखीवर उपचार म्हणून आईस थेरेपी गुडघ्याचे दुखणे व सुजन कमी करण्यात सहाय्यक आहे. गुडघेदुखी होत असल्यास एका पॅकेट मध्ये बर्फ टाकून गुडघे शेकावे. यामुळे सुजन कमी होण्यात मदत मिळेल. यासोबतच आपण हाताने गुडघ्याला हळूवार मसाज करु शकतात.
गुडघे दुखी साठी व्यायाम
योग आणि व्यायाम अशी पद्धती आहे जिच्या मदतीने अनेक कठीण रोग चांगले केले जाऊ शकतात. व्यायाम आणि योग हे गुडघे दुखी साठी आयुर्वेदिक औषध सिद्ध होऊ शकते. म्हणून पुढे आपणास गुडघे दुखी साठी व्यायाम देत आहोत.
बद्धकोनासान
गुडघे दुखी साठी व्यायाम व योग मधील पहिले आसन आहे बद्धकोनासान. हे एक अतिशय सोपे आसन आहे. आणि याला कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतात. चित्रात दाखवल्याप्रमाणे हे जांघ आणि मांडीच्या नसांना ताण देते. सोबतच कुल्ले, पाय, ताच आणि गुडघ्यांसाठी उपयुक्त आसन आहे.
पाद पश्चिमोत्तानासन
गुडघे व पायांच्या दुखिवर अत्यंत उपयुक्त असे आसन आहे. हे आसन करण्यासाठी तुम्हाला चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या हातांनी पायांच्या अंगठा धरण्याचा प्रयत्न करायचा आहे. 10-15 वेळा हे आसन केल्याने पायांचा चांगला व्यायाम होतो व गुडघेदुखी दूर पडते.
वीरासन
वीरासन करण्यासाठी चटई टाकून गुडघे वाकून बसावे. हातांना चित्रात दाखवल्याप्रमाणे मागील बाजूला नेऊन एकमेकांना जोडावे. या आसनाचा कालावधी 30 सेकंदापासून सुरू करून 2 मिनिटापर्यंत वाढवावा.
स्क्वाट
स्क्वाट अर्थात उठबश्या हा व्यायाम केल्याने पाय, कंबर, गुडघे व संपूर्ण शरीराचे सांधे ताणले जातात. ज्यामुळे लवचिकता वाढते. गुडघ्यांसाठी हा व्यायाम अतिशय उपयुक्त आहे. परंतु गुडघेदुखी अति असेल तर हा व्यायाम जास्त वेळा करू नका व योग्य योग ट्रेनर चा सल्ला घ्या.
तर मंडळी हे होते गुडघेदुखीवर रामबाण उपाय आणि गुडघे दुखी साठी व्यायाम वर संगीतल्याप्रमाणे नियमित सराव केल्याने आपली गुडघे दुखी कमी होण्यास नक्की सहाय्य होईल. आम्हास आशा आहे की हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल ही माहिती आपले कुटुंबीय आणि मित्र मंडळी सोबतही शेअर करा. आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या डॉक्टर समूहाला कमेन्ट द्वारे विचारू शकतात. धन्यवाद…
READ MORE :
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा