हाता पायाला मुंग्या येणे घरगुती उपाय व हाताला मुंग्या येणे उपचार आणि इलाज मराठी

हाता पायाला मुंग्या येणे घरगुती उपाय व हाताला मुंग्या येणे उपचार : जास्त वेळ बसणे किंवा विश्राम केल्याने हाता पायामध्ये मुंग्या येण्याची समस्या होऊ लागते. एक अथवा एकापेक्षा जास्त नसांवर येणाऱ्या दबावामुळे हात पाय सुन्न होऊन जातात. या मागे वेगवेगळी कारणे असू शकतात. परंतु आपण हाताला मुंग्या येणे उपचार म्हणून काही घरगुती उपाय करू शकतात. ज्यामुळे हाताला व पायाला मुंग्या येणे ही समस्या कायमची दूर करता येईल.

आजच्या या लेखात आपण हाताला मुंग्या येणे तसेच पायाला मुंग्या येणे यामागील कारणे, उपाय आणि उपचार पाहणार आहोत. तर चला सुरू करुया..

हाता पायाला मुंग्या येणे घरगुती उपाय आणि कारणे

हाता पायाला मुंग्या येण्याची कारणे

हाता पायामध्ये मुंग्या येण्याची समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकते. परंतु प्रश्न आहे की यामागील मुख्य कारणे कोणती आहेत. तर चला जाणून घेऊया यामागील कारणे.

  • एकाच स्थितीत दीर्घकाळापर्यंत बसणे अथवा उभे राहणे.
  • पाठीच्या माकड हाडावर जोर अथवा दबाव पडणे.
  • हर्निएटेड डीस्क (नसांवर दबाव पडणे)
  • मान अथवा कंबरेतील नसांमध्ये इजा होणे.
  • व्हिटॅमिन बी ची कमतरता.
  • डायबिटीस
  • शरीरात गाठी होणे.
  • एखाद्या विशिष्ट औषधी मुळे.
  • किडे अथवा प्राण्याच्या चावण्यामुळे.
  • जन्म दोषामुळे
  • शरीरातील कॅल्शियम, पोटॅशियम आणि सोडियम च्या असंतुलनामुळे.
  • डोकेदुखी मायग्रेन ची समस्या
  • थायरॉईड
  • स्त्रोक

हाता पायांमधील मुंग्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय

लव्हेंडर ऑईल

लव्हेंडर हे फूल सुवास आणि औषधी गुणधर्म दोन्हींसाठी ओळखले जाते. लव्हेंडर तेल मसाज शरीरातील अवयवांना येणार्या मुंग्या दूर करण्यासाठी सहाय्यक आहे. यासाठी अर्धा कप बदाम च्या तेलात 8 ते 10 थेंब लव्हेंडर तेल एकत्रित करावे आणि मुंग्या येत असलेल्या हात अथवा पायांना या तेलाने मसाज करावी. बदाम आणि लव्हेंडर च्या तेलात एंटी इनप्लेमेंटरी गुणधर्म असतात जे हातापायांमध्ये रक्तांच्या प्रवाह सुरळीत करतात आणि सुजनही दूर करतात. लव्हेंडर तेल >> खरेदी करा येथे

लसूण आणि सुंठ

जर तुम्हाला नेहमी हाता पायाला मुंग्या येण्याची समस्या होत असेल, तर हातापायाला मुंग्या येणे यावर घरगुती उपाय म्हणून सकाळी सकाळी सुंठाचे काही तुकडे आणि लसणाच्या दोन पाकळ्या चावून खाव्यात. असे केल्याने हाताला व पायल येणाऱ्या मुंग्यामध्ये नक्कीच आराम मिळेल. कारण या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. व हातापायांच्या मुंग्या येण्यामागील प्रमुख कारण अव्यवस्थित झालेला रक्तप्रवाह हेच आहे. म्हणून हा उपाय आपल्यासाठी प्रभावी ठरू शकतो.

पिंपळाची पाने

पिंपळाचे झाड हे फारच गुणकारी मानले जाते. या झाडाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे एंटीऑक्सीडेंट आणि मिनरल असतात. जर तुम्हाला नेहमी हाताला मुंग्या येणे ही समस्या होत असेल तर पिंपळाची तीन ते चार पाने मोहरीच्या तेलात गरम करून घ्या. थोडे थंड झाल्यावर जेथे तुम्हाला मुंग्या येत असतील त्या जागेवर तुम्ही हे तेल लावू शकता. मोहरीच्या या तेलात पिपळाच्या पानांमुळे अनेक एंटीऑक्सीडेंट गुणधर्म तयार झालेले असतात.

शेकणे

हाता पायाला येणाऱ्या मुंग्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून गरम पाण्याची शेक उपयोगी ठरू शकते. गरम शेक घेतल्याने त्या भागातील नसा मोकळ्या होतात आणि रक्तप्रवाह पुन्हा एकदा सुरळीत सुरू होतो. गरम पाण्याची शेक घेण्याकरिता तुम्ही हीटिंग बॅग चा उपयोग करू शकतात. याशिवाय पाण्याच्या बाटलीत सुद्धा कोमट पाणी टाकून आपण शेक घेऊ शकतात. उत्तम दर्जाची हीटिंग बॅग>> खरेदी करा येथे

जाड मीठ

  • हाताला मुंग्या येत असल्यास उपचार म्हणून पाण्याने भरलेल्या टब मध्ये एक कप जाड मीठ टाका. मिठाच्या या पाण्यात 20 ते 30 मिनिटे मुंग्या येत असलेला शरीराचा अवयव बुडवून ठेवा. तुम्ही टब मधील पाणी हलके कोमट देखील करू शकतात. हाता पायाला मुंग्या येत असल्यास हा उपाय आराम देतो.
  • जाड मिठाचे अनेक फायदे असतात. स्नायूंना आराम देण्यासोबतच यात एंटी इनप्लेमेंटरी गुणधर्म देखील असतात. जे शरीराची सूज कमी करतात. आपण कधी कधी आंघोळीच्या पाण्यातही जाड मीठ टाकून अंघोळ करू शकतात.

हाता पायाला मुंग्या येणे घरगुती उपाय

  • दीर्घकाळ एकच मुद्रेत बसणे अथवा उभे राहणे टाळावे.
  • कामाच्या मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा.
  • जेवणात पोष्टिक आहार सामील करावा.
  • धूम्रपान आणि दारूच्या व्यसनापासून दूर रहावे.
  • मान व हातांचे व्यायाम करावे.
  • दिनचर्या योग सामील करावे.
  • रात्री एकच पोझिशनमध्ये न झोपता बाजू बदलवत राहावे.
  • स्वतःला आराम द्यावा.

डॉक्टरांकडे केव्हा जावे ?

जर आपल्या हातापायांना मुंग्या येणे सोबतच शरीरात कमजोरी, हालचाल करण्यात परेशानी, मलमुत्र त्याग वर नियंत्रण नसणे, हातापायांची हालचाल न करता येणे, डोक्यात मुंग्या येणे यासारख्या समस्या निर्माण होत असतील तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तर मित्रांनो हे होते हातापायांना मुंग्या येणे उपचार म्हणून घरगुती उपाय. जर तुम्ही देखील हातापायांना मुंग्या येण्याच्या समस्येपासून त्रस्त असाल तर या लेखात देण्यात आलेले हाता पायाला मुंग्या येणे घरगुती उपाय करू शकतात. सोबतच हे देखील लक्षात ठेवा कि संपूर्ण शरीरात मुंग्या येणे किंवा एखाद्या विशिष्ट अवयवात दीर्घकाळापर्यंत मुंग्या येणे गंभीर रोगाची लक्षणे असू शकतात म्हणून डॉक्टरांची सल्ला घेण्यास कधीही मागेपुढे पाहू नका. ह्या लेखातील ही माहिती आपले नातेवाईक तसेच ओळखीचे जे लोक ह्या समस्यापासून त्रस्त असतील त्यांना नक्की पाठवा. धन्यवाद…

अधिक वाचा :

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *