weight loss diet plan in marathi : वाढते शारीरिक वजन तुमची पर्सनॅलिटी तर कमी करतेच, परंतु वाढत्या वजनामुळे हृदय संबंधी आजार होण्याची भीती अधिक असते. लठ्ठपणा तुमच्या मेंदूला नुकसान पोहोचवतो, सोबतच उच्च रक्तदाब आणि मधुमेह इत्यादी रोगांना आमंत्रण देतो. वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता अर्थात weight loss diet plan ला नियमित उपयोगात आणणे आवश्यक आहे.
आजच्या या लेखात आपण वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि आहार तक्ता अर्थात एक आदर्श डाइट प्लान मराठी कसा असायला हवा याबद्दलची माहिती प्राप्त करूया…
Table of Contents
वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता | weight loss diet plan in marathi
पुढे आम्ही आपल्याला 150 कॅलरी वाला डाइट प्लान देत आहोत. या चार्ट मध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू सामील करण्यात आल्या आहेत. वजन कमी करण्यासाठी हा डाइट प्लान एक महिन्याचा असेल आणि प्रत्येक आठवड्याला प्लान मध्ये बदल केला जाईल. पुढे महिन्यातील चार आठवड्यांचे वेगवेगळे आहार तक्ते देत आहोत.
पहिला आठवडा
सकाळी उठताच (सकाळी 6:30 ते 7:30 च्या आत) | एक कप मेथीचे पाणी आणि हलके कोमट पाणी. |
नाश्ता (सकाळी 7:30 ते 8:30 च्या आत) | 4 इडली, एक कप सांभर, पाव कप नारळाची चटणी, 1 कप ग्रीन टी आणि चार बदाम. |
मध्य सकाळ- ब्रंच (सकाळी 10 ते 10:30 च्या आत) | एक कप दूध किंवा फळांचा ज्यूस |
दुपारचे जेवण- लंच (दुपारी 12:30 ते 1:00 च्या आत) | तीन चपाती, एक वाटी भात, एक वाटी डाळ, अर्धी वाटी मिक्स भाज्या किंवा चिकन सूप आणि एक वाटी सलाद. जेवणाच्या 15 मिनिटानंतर एक कप ताक प्यावे. |
संध्याकाळचा नाश्ता (दुपारी 3:30 ते 4:30 च्या आत) | 1 कप अंकुरित मूंग, दहा ते पंधरा शेंगदाणे आणि काकडी गाजर व टमाट्याचे सलाद. |
रात्रीचे जेवण (संध्याकाळी 7 ते 7:30 च्या आत) | दोन ते तीन चपाती, अर्धा वाटी हरभऱ्याची किंवा मास्याची भाजी आणि थोडे सलाद. झोपण्याआधी एक कप दुधात चुटकी भर हळद टाकून प्यावे. |
दूसरा आठवडा
सकाळी उठताच (सकाळी 6:30 ते 7:30 च्या आत) | एक कप मेथीचे पाणी |
नाश्ता (सकाळी 7:30 ते 8:30 च्या आत) | थोडीशी मूंग डाळ, 1 कप ग्रीन टी आणि चार बदाम. |
मध्य सकाळ- ब्रंच (सकाळी 10 ते 10:30 च्या आत) | एक वाटी कोणतेही मोसमी फळ |
दुपारचे जेवण- लंच (दुपारी 12:30 ते 1:00 च्या आत) | तीन चपाती, थोडासा भात, एक वाटी भाजी, सलाद आणि एक वाटी दही. |
संध्याकाळचा नाश्ता (दुपारी 3:30 ते 4:30 च्या आत) | एक कप नारळाचे पाणी, अर्धी वाटी द्राक्ष किंवा कापलेले टरबूज. |
रात्रीचे जेवण (संध्याकाळी 7 ते 7:30 च्या आत) | दोन चपात्या, अर्धा कप उकळलेले पालक किंवा चिकन सूप. झोपण्याआधी एक कप दुधात चुटकिभर हळद टाकून प्यावे. |
तिसरा आठवडा
सकाळी उठताच (सकाळी 6:30 ते 7:30 च्या आत) | एक कप पाण्यात अर्धा लिंबू रस टाकून प्यावे. |
नाश्ता (सकाळी 7:30 ते 8:30 च्या आत) | एक वाटी ओटस, 1 कप ग्रीन टी आणि चार बदाम. |
मध्य सकाळ- ब्रंच (सकाळी 10 ते 10:30 च्या आत | एक उकळलेले अंडे किंवा एक कप ताज्या फळांचा रस. |
दुपारचे जेवण- लंच (दुपारी 12:30 ते 1:00 च्या आत) | एक ते दीड कटोरी भात, एक चपाती, एक वाटी भाजी, एक वाटी सलाद आणि एक वाटी ताक. |
संध्याकाळचा नाश्ता (दुपारी 3:30 ते 4:30 च्या आत) | एक कप ग्रीन टी आणि बिस्कीट. |
रात्रीचे जेवण (संध्याकाळी 7 ते 7:30 च्या आत) | तीन चपात्या, अर्धा वाटी डाळ, एक वाटी भाजी, अर्धी वाटी सलाद, एक डार्क चॉकलेटचे तुकडे. झोपण्याआधी एक कप दुधात चुटकिभर हळद टाकून प्यावे. |
खूपच छान माहिती आहे माझ्यासाठी .. खूप खूप धन्यवाद ज्याने पण लिहिलं आहे त्यांच्यासाठी