वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता | weight loss diet plan in marathi

weight loss diet plan in marathi : वाढते शारीरिक वजन तुमची पर्सनॅलिटी तर कमी करतेच, परंतु वाढत्या वजनामुळे हृदय संबंधी आजार होण्याची भीती अधिक असते. लठ्ठपणा तुमच्या मेंदूला नुकसान पोहोचवतो, सोबतच उच्च रक्तदाब आणि मधुमेह इत्यादी रोगांना आमंत्रण देतो. वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता अर्थात weight loss diet plan ला नियमित उपयोगात आणणे आवश्यक आहे.

आजच्या या लेखात आपण वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि आहार तक्ता अर्थात एक आदर्श डाइट प्लान मराठी कसा असायला हवा याबद्दलची माहिती प्राप्त करूया…

वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता | weight loss diet plan in marathi
weight loss diet plan in marathi

वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता | weight loss diet plan in marathi

पुढे आम्ही आपल्याला 150 कॅलरी वाला डाइट प्लान देत आहोत. या चार्ट मध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू सामील करण्यात आल्या आहेत. वजन कमी करण्यासाठी हा डाइट प्लान एक महिन्याचा असेल आणि प्रत्येक आठवड्याला प्लान मध्ये बदल केला जाईल. पुढे महिन्यातील चार आठवड्यांचे वेगवेगळे आहार तक्ते देत आहोत.

पहिला आठवडा

सकाळी उठताच
(सकाळी 6:30 ते 7:30 च्या आत)
एक कप मेथीचे पाणी आणि हलके कोमट पाणी.
नाश्ता
(सकाळी 7:30 ते 8:30 च्या आत)
4 इडली, एक कप सांभर, पाव कप नारळाची चटणी, 1 कप ग्रीन टी आणि चार बदाम.
मध्य सकाळ- ब्रंच
(सकाळी 10 ते 10:30 च्या आत)
एक कप दूध किंवा फळांचा ज्यूस
दुपारचे जेवण- लंच
(दुपारी 12:30 ते 1:00 च्या आत)
तीन चपाती, एक वाटी भात, एक वाटी डाळ, अर्धी वाटी मिक्स भाज्या किंवा चिकन सूप आणि एक वाटी सलाद. जेवणाच्या 15 मिनिटानंतर एक कप ताक प्यावे.
संध्याकाळचा नाश्ता
(दुपारी 3:30 ते 4:30 च्या आत)
1 कप अंकुरित मूंग, दहा ते पंधरा शेंगदाणे आणि काकडी गाजर व टमाट्याचे सलाद.
रात्रीचे जेवण
(संध्याकाळी 7 ते 7:30 च्या आत)
दोन ते तीन चपाती, अर्धा वाटी हरभऱ्याची किंवा मास्याची भाजी आणि थोडे सलाद. झोपण्याआधी एक कप दुधात चुटकी भर हळद टाकून प्यावे.

दूसरा आठवडा

सकाळी उठताच
(सकाळी 6:30 ते 7:30 च्या आत)
एक कप मेथीचे पाणी
नाश्ता
(सकाळी 7:30 ते 8:30 च्या आत)
थोडीशी मूंग डाळ, 1 कप ग्रीन टी आणि चार बदाम.
मध्य सकाळ- ब्रंच
(सकाळी 10 ते 10:30 च्या आत)
एक वाटी कोणतेही मोसमी फळ
दुपारचे जेवण- लंच
(दुपारी 12:30 ते 1:00 च्या आत)
तीन चपाती, थोडासा भात, एक वाटी भाजी, सलाद आणि एक वाटी दही.
संध्याकाळचा नाश्ता
(दुपारी 3:30 ते 4:30 च्या आत)
एक कप नारळाचे पाणी, अर्धी वाटी द्राक्ष किंवा कापलेले टरबूज.
रात्रीचे जेवण
(संध्याकाळी 7 ते 7:30 च्या आत)
दोन चपात्या, अर्धा कप उकळलेले पालक किंवा चिकन सूप. झोपण्याआधी एक कप दुधात चुटकिभर हळद टाकून प्यावे.

तिसरा आठवडा

सकाळी उठताच
(सकाळी 6:30 ते 7:30 च्या आत)
एक कप पाण्यात अर्धा लिंबू रस टाकून प्यावे.
नाश्ता
(सकाळी 7:30 ते 8:30 च्या आत)
एक वाटी ओटस, 1 कप ग्रीन टी आणि चार बदाम.
मध्य सकाळ- ब्रंच
(सकाळी 10 ते 10:30 च्या आत
एक उकळलेले अंडे किंवा एक कप ताज्या फळांचा रस.
दुपारचे जेवण- लंच
(दुपारी 12:30 ते 1:00 च्या आत)
एक ते दीड कटोरी भात, एक चपाती, एक वाटी भाजी, एक वाटी सलाद आणि एक वाटी ताक.
संध्याकाळचा नाश्ता
(दुपारी 3:30 ते 4:30 च्या आत)
एक कप ग्रीन टी आणि बिस्कीट.
रात्रीचे जेवण
(संध्याकाळी 7 ते 7:30 च्या आत)
तीन चपात्या, अर्धा वाटी डाळ, एक वाटी भाजी, अर्धी वाटी सलाद, एक डार्क चॉकलेटचे तुकडे. झोपण्याआधी एक कप दुधात चुटकिभर हळद टाकून प्यावे.

चौथा आठवडा

सकाळी उठताच
(सकाळी 6:30 ते 7:30 च्या आत)
एक कप पाण्यात अर्धा लिंबू रस टाकून प्यावे.
नाश्ता
(सकाळी 7:30 ते 8:30 च्या आत)
अर्धी वाटी उपमा, एक कप दूध आणि दोन बदाम
मध्य सकाळ- ब्रंच
(सकाळी 10 ते 10:30 च्या आत
एक वाटी मोसमी फळ
दुपारचे जेवण- लंच
(दुपारी 12:30 ते 1:00 च्या आत)
तीन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी मसूर डाळ किंवा इतर कोणतीही डाळ, अर्धी वाटी सलाद आणि एक कटोरी दही.
संध्याकाळचा नाश्ता
(दुपारी 3:30 ते 4:30 च्या आत)
एक कप नारळाचे पाणी किंवा इतर कोणत्याही फळाचा रस.
रात्रीचे जेवण
(संध्याकाळी 7 ते 7:30 च्या आत)
एक चपाती, एक कप ब्राऊन राइस, एक वाटी डाळ अर्धी वाटी उकळलेली भाजी. झोपण्याआधी एक कप दुधात चुटकिभर हळद टाकून प्यावे.

वरील प्रकारे महिनाभर आहार तक्ता (diet plan) अनुसरल्यास पचन क्रियेत सुधार, गॅसेस पासून मुक्ती, अत्यधिक चरबी पासून सुटका आणि शरीरात नवीन उर्जेचा संचार होईल. हा आहार तक्ता शरीराचे वजन कमी करेल आणि शरीराला आवश्यक घटक उपलब्ध करून देइल. याशिवाय व्यायाम न करता पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय आपण येथे क्लिक करून वाचू शकतात. आजच्या या लेखात देण्यात आलेला वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता (weight loss diet plan in marathi) आपणास कसा वाटला कमेन्ट करून नक्की सांगा धन्यवाद..

अधिक वाचा>> वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि योगासन

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

1 thought on “वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता | weight loss diet plan in marathi”

  1. खूपच छान माहिती आहे माझ्यासाठी .. खूप खूप धन्यवाद ज्याने पण लिहिलं आहे त्यांच्यासाठी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *