जल हेच जीवन आहे असे मानले जाते. शरीराला पुरेसे पाणी मिळाल्याने अनेक रोग दूर ठेवून निरोगी शरीर प्राप्त करता येते. पाणी फक्त व्यक्तीची तहान भागवत नसून, पचन दुरुस्त करणे, मेंदू वर चांगला प्रभाव टाकणे व शरीराला hydrated ठेवणे इत्यादी कार्य ते करीत असते. अनेक शारीरिक समस्या पुष्कळ पाणी पिल्याने दूर होऊन जातात म्हणूनच दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिले जाते.
आजच्या या लेखात आपण पुरेशा प्रमाणात योग्य पद्धतीने पाणी पिण्याचे फायदे, पाणी पिण्याचे नियम व गरम पाणी पिण्याचे फायदे कोणते आहेत याबद्दलची माहिती प्राप्त करणार आहोत.
Table of Contents
पाणी पिण्याचे फायदे
सर्वात आधी आपण जाणून घेऊया की पाणी पिल्याने शरीरासोबत त्वचा आणि केसांना कोणकोणते फायदे होतात.
- शरीरातील तरल संतुलनात राहते
आपल्या शरीरात जवळपास 60% पाणी असते. म्हणून शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. पाणी पिल्याने शरीरातील पचन तंत्र, लाळ, गॅस्ट्रिक ज्यूस, अंडाशय मधील रस, पित्ता मधील रस, सलाईवा इत्यादींचे प्रमाण वाढते आणि नियंत्रणात येते. शरीरात पाण्याची कमी झाल्यास शरीरातील अवयवांचे कार्य बिघडते आणि थांबते. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे. - पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते.
अनेकदा पोट साफ न होण्याच्या समस्ये मागील प्रमुख कारण पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे असते. शरीरातील किडनी ला योग्य प्रमाणे कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. शरीरातील पाण्याची मात्रा कमी झाल्यास शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर टाकणे कठीण होते. अशा परिस्थितीत भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. पाणी पिण्याचे फायदे माफहिल प्रमुख फायदा म्हणजे पाणी पिल्याने किडनी निरोगी राहते आणि पचन सुधारते. जर आपणास बद्धकोष्टतेची समस्या असेल तर भरपूर पाणी प्यावे. याशिवाय आपण गरम पाणी देखील पिऊ शकतात. - वजन कमी करण्यासाठी पाण्याचे उपयोग
वाढलेले वजन व अनावश्यक चरबी घालवण्यासाठी पाणी पिण्याचे फायदे अनेक आहेत व या समसयेत पाणी अत्यंत उपयोगी साधन आहे. पाणी हे फक्त चरबी घालवण्यासाठी उपयुक्त नसून ते शरीराचे वजन देखील कमी करते. जेवणाआधी पाणी पिल्याने व्यक्तीला अधिक भूक लागत नाही व त्याचे जेवण आपोआप कमी होते.
याशिवाय जर आपण गरम पाण्याच्या उपयोगाने वजन कमी करू इच्छिता, तर वजन कमी करण्यासाठी गरम पाण्याचे फायदे म्हणून आपण रोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मध टाकून प्यावे. हा उपाय केल्याने जलद गतीने वजन आणि चरबी कमी होऊ लागते. - चेहऱ्यावर येते तेज आणि नवेपणा
जर तुमच्या चेहऱ्यावर डाग, पुटकुळ्या, सुरकुत्या यासारख्या त्वचे संबंधित समस्या निर्माण होत असतील, तर अशा परिस्थितीत डॉक्टर देखील भरपूर पाणी पिण्याची सल्ला देतात. पाणी पिल्याने चेहऱ्याच्या रंगात नवेपणा येतो. पाणी पिल्याने शरीरातील Toxins आणि विषारी पदार्थ बाहेर निघतात. ज्यामुळे त्वचा टवटवीत दिसू लागते.
अनेकदा हिवाळ्याच्या दिवसात त्वचा फुटणे यासारख्या समस्या निर्माण होतात. यामागील प्रमुख कारण देखील शरीरातील पाण्याची कमतरता हेच आहे. जर आपण फूटलेल्या त्वचेला पूर्ववत करू इच्छिता, तर भरपूर पाणी पिण्याची सवय आजच लावून घ्या. - रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि ऊर्जा निर्माण होते
भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. पाणी पिल्याने शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर निघतात ज्यामुळे शरीरात चांगल्या पेशींची वाढ होते. भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने शरीरात अधिक ऊर्जा निर्माण होते.
पाणी पिण्याचे फायदे आपण जाणून घेतले परंतु घरात येणाऱ्या पाण्याला सर्वात आधी शुद्ध करणे आवश्यक असते. अशुद्ध पाणी प्यायल्याने शरीराला फायदे होण्याऐवजी नुकसान होऊ शकतात. म्हणून पाण्याला नेहमी शुद्ध करून प्यावे. पाणी शुद्ध करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.
पाणी शुद्ध करण्याची पद्धत
पाण्याला शुद्ध करण्यासाठी त्याला उकळून घेणे अतिशय सोपी पद्धत आहे. जर आपण पाणी शुद्ध करू इच्छिता तर 10 ते 15 मिनिटांपर्यंत पाण्याला उकळावे व यानंतर त्याला पिण्यास घ्यावे.
पाण्याला शुद्ध करण्यासाठी तुरटी देखील उपयोगी आहे. तुरटीचे फायदे जल शुद्धीकरणात तुरटीचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात आहे. तुरटीच्या उपयोगाने पाणी शुद्ध करण्यासाठी पुढील पद्धत वापरावी.