मधाचे फायदे व मध खाण्याचे फायदे | honey benefits in marathi

This article contains honey benefits in marathi and madhache fayde. all the information provided in this article will be helpful for you to cure diffrent diseases by honey.

मधाचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. मधाचे फायदे आणि मध खाण्याचे फायदे आयुर्वेदात देखील सांगण्यात आले आहेत. मध (honey) फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर केस आणि त्वचारोगांसह सौंदर्य वाढवण्यात देखील उपयुक्त आहे. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी benefits of honey in marathi अर्थात मध खाण्याचे फायदे घेऊन आलो आहोत. तर चला सुरू करुया…

honey benefits in marathi
honey benefits in marathi

मधाचे फायदे – honey benefits in marathi

मध हे मधमाशाद्वारे वेगवेगळ्या फुलातून एकत्रित केलेले पातळ पदार्थ असते. मधमाश्या खूप लांब प्रक्रियेतून मध तयार करतात. म्हणून हे मध खाण्याचे फायदे तर आहेत परंतु याशिवाय देखील honey benefits in marathi व इतर फायदे पुढील प्रमाणे आहेत.

वजन कमी करण्यासाठी मधाचे फायदे व गरम पाणी, लिंबू, मध पिण्याचे फायदे
जर आपण वाढते वजन आणि लठ्ठपणाच्या समस्येपासून त्रस्त असाल तर वजन कमी करण्यासाठी मधाचा वापर फार फार उपयोगी ठरू शकतो. अनेक शोध आणि आयुर्वेदिक उपायांद्वारे सिद्ध करण्यात आले आहे की मध जलद वजन कमी करण्याचे कार्य करते. वजन कमी करण्यासाठी मधाचा वापर पुढील पद्धतीने करावा –

दररोज सकाळी खाली पोट एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून प्यावे. आपण मधाच्या पाण्यात अर्धा लिंबू देखील टाकू शकतात. असे केल्याने यकृतात (liver) मध्ये असलेले विष्युक्त पदार्थ बाहेर निघतात आणि शरीरातील अत्याधिक चर्बी कमी होण्यास देखील सहाय्य मिळते. गरम पाणी आणि लिंबू सोबत मध पिल्याने वजन कमी होण्याचे फायदे शरीराला लाभतात.

आवळा आणि मध चे फायदे
एका भांड्यात अर्धे मध भरावे आणि यानंतर त्यात काही आवळे टाकून बंद करावे. काही दिवस हे भांडे असेच बंद राहू द्यावे. काही दिवसांनी मध आणि आवळा चा मुरब्बा तयार होऊन जाईल. आवळा आणि मध सेवन करण्याचे विविध फायदे (honey benefits in marathi) पुढीलप्रमाणे आहेत.

 • हे मिश्रण केसांना लावल्याने केस मऊ व मजबूत होतात. आपण हे मिश्रण कंडिशनर म्हणून देखील वापरू शकतात.
 • मध आणि आवळा मिश्रण नियमित सेवन केल्याने तुम्हाला सौंदर्यात देखील अनेक लाभ मिळतील चेहऱ्यावरील सुरकुत्या, fine line, काळे डाग आणि वांग कायमचे दूर होतील.
 • आवळा आणि मध सेवन केल्याने लिव्हरचे आरोग्य देखील सुधारते.
 • ऍसिडिटी आणि पचन व्यवस्थित होऊ लागते. यासोबतच भूक देखील वाढते.
 • एक मोठा चमचा मध आणि आवळा खाल्याने सर्दी खोकला आणि गळ्यातील खसखस दूर होते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मधाचे फायदे
मध मध्ये शरीराला आवश्यक असलेल्या antioxidant चे प्रमाण भरपूर असते. हे अँटिऑक्सिडंट अनेक प्रकारच्या रोगांशी लढण्याची शक्ती प्रदान करतात. सोबतच हृदय संबंधित रोग देखील कायमचे दूर राहतात. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दररोज रात्री एक चमचा मध हलक्या दुधासोबत प्यावे. असे केल्याने झोप देखील चांगली लागते.

जखम सुधारण्यासाठी मधाचे फायदे
बऱ्याचदा लहान मोठ्या अपघातामुळे मुक्का मार बसणे किंवा रक्त आल्याने शरीरावर जखम होऊन जाते. अशावेळी जखम भरून काढण्यासाठी मध उपयुक्त ठरू शकते. मधामध्ये जीवाणू विरोधी आणि फंगस व बॅक्टेरिया दूर करणारे गुणधर्म असतात. जे जखमेवरील बॅक्टेरियाचे संक्रमण थांबवतात आणि जखम लवकर भरून काढतात.

जर आपल्याला लहान जखम अथवा शरीरावर पोळले गेले असेल तर प्रभावित जागेवर कच्चे मध लावावे. काही वेळातच त्या जागेवरील खाज कमी होईल. हा उपाय नियमितपणे केल्याने जखम लवकर बरी होईल.

गळ्यात दुखणे (tonsils)
जर आपल्याला सर्दी खोकला मुळे गळ्यात दुखणे व खोकला येण्याची समस्या निर्माण झाली असेल तर आपण मधाचे सेवन करू शकतात. यासाठी एक चमचा अद्रक रस मध्ये एक ते दोन चमचे मध टाकावे आणि दिवसातून दोन वेळा याचे सेवन करावे. हा उपाय केल्याने देखील खोकला आणि गळ्यात दुखणे (tonsils) दूर होते.

सुंदर आणि नितळ त्वचेसाठी मधाचे फायदे
मधाचे फायदे (honey benefits in marathi) फक्त शरीर आणि रोगांपर्यंत मर्यादित नसून चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याकरिता देखील मध वापरले जाते. अनेक सौंदर्य क्रीम मध्ये मधाचा वापर केला जातो. म्हणून आता आपण जाणून घेऊया सौंदर्य वाढवण्यासाठी मधाचे फायदे.

ज्या लोकांची त्वचा कोरडी असेल, अथवा चेहऱ्यावर वांग, काळे डाग, सुरकुत्या, काळेपणा इत्यादी समस्या असतील त्यांनी दररोज चेहऱ्यावर 15-20 मिनिटे honey pack अर्थात मधाचा फेसपॅक लावावा. असे केल्याने चेहऱ्यावर ग्लो तर येईलच परंतु काळे डाग, मुरूम, वांग आणि सुरकुत्या कायमचे दूर होतील.

याशिवाय हिवाळ्याच्या दिवसात ओठ फुटण्याची समस्या होते. यासाठी रात्री झोपण्याआधी मध आणि शुद्ध देसी तूप एकमेकात मिक्स करून ओठांना लावावे. हा उपाय केल्याने फुटलेले ओठ चांगले आणि नरम होतील.

केसांसाठी मधाचे फायदे
मधात असलेले गुणधर्म केस आणि केसांच्या त्वचेसंबंधी असलेल्या समस्या दूर करते, सोबतच केसांचा विकास आणि वाढ देखील सुधारते.

 • यासाठी दही सोबत मध मिसळून केसांना लावावे. असे केल्याने खराब व निर्जीव झालेल्या केसांना बळ आणि पोषण मिळते.
 • मध आणि अंड्याच्या आतील भागापासून बनलेले हेयर मास्क केसांची चमक वाढवते.
 • मध आणि एलोवेरा (कोरफड) हे मिश्रण केसांची वाढ जलद करते.

मध कसे खावे

मध खाण्याचे फायदे तर अनेक लोकांना माहिती आहेत. परंतु मध कसे खावे याविषयी बर्‍याचदा त्यांच्या मनात अनेक शंका असतात. मधाचे सेवन करण्याची योग्य पद्धत पुढील प्रमाणे आहे.

 • आपण दररोज एक ते दोन चमचे मध सरळ सरळ खाऊ शकतात.
 • याशिवाय शांत झोप आणि रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्याकरिता दुधात मध घालून त्याचे सेवन देखील केले जाऊ शकते.
 • वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी मध, लिंबू आणि कोमट पाणी पिले जाते.

तर मित्रहो आजच्या या लेखात आपण मधाचे फायदे व मध खाण्याचे फायदे (honey benefits in marathi) काय आहेत या बद्दलची माहिती प्राप्त केली. आशा करतो की ही मराठी माहिती आपणास उपयुक्त ठरली असेल. ह्या माहितीला आपले मित्र व कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

I hope you like this article based on honey benefits in marathi and madhache fayde. all the information provided in this article is collected from internet and some experts of this field. Thanks for reading

अधिक वाचा

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *