लहान बाळांमध्ये सर्दी-खोकला सामान्यतः संक्रमणामुळे होतो. 6 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या लहान बाळाला कफ झाल्यास उपाय डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी न घेण्याची सल्ला दिली जाते. म्हणूनच या वयोगटातील लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यावर आई-वडील घरगुती उपायांनी त्यांचा सर्दी खोकला दूर करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी लहान मुलांना सर्दी खोकला होणे या वरील घरगुती उपाय व लहान बाळाला कफ झाल्यास उपाय घेऊन आलो आहोत. हे उपाय करून तुम्ही बाळाचा सामान्य सर्दी खोकला काही हद्दीपर्यंत नियंत्रणात आणू शकतात.
Table of Contents
लहान बाळांमध्ये सर्दी खोकला होण्याचे कारण
वातावरणातील बदलामुळे अनेक लोक सर्दी खोकल्याचे शिकार होतात. यामागील प्रमुख कारण त्यांची कमी रोगप्रतिकारक क्षमता असते. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी <<वाचा येथे.
लहान मुलांमध्ये सर्दी खोकला चे संक्रमण व्हायरसमुळे होऊ शकते. यामुळे बाळाला नाक बंद होणे, नाक वाहने, श्वास घेण्यास त्रास होणे आणि अस्वस्थ वाटणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते होते. सर्दी खोकला झालेला बाळ जेवण व्यवस्थित करत नाही. त्याला डोकेदुखी व शरीरात थकवा जाणवतो. कधीकधी सर्दी खोकला एक ते दोन आठवडे राहू शकतो. म्हणूनच बाळाला अधिक त्रास होऊ नये यासाठी लवकर इलाज करणे आवश्यक आहे.
लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय
लहान बाळाला सर्दी खोकला व कफ झाल्यास उपाय पुढील प्रमाणे आहेत.
लसूण आणि ओवा ची पुडी
लसूण आणि ओवा सर्दी खोकल्यासाठी शक्तिशाली इलाज आहे. यांच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटिव्हायरल गुणधर्म असतात. हे मिश्रण लहान मुलांच्या सर्दी खोकल्यासाठी देखील उपयोगी आहे.
यासाठी लसणाच्या 2 पाकळ्या आणि 1 चमचा ओवा घेऊन त्यांना तव्यावर भाजून घ्यावे. थंड झाल्यावर भाजलेले लसुन आणि ओवा एका कपड्यात बांधून घ्याव्यात. यानंतर ही पुडी बाळाच्या पाळण्यात त्याच्या नाकाजवळ ठेवावी. जेणेकरून ओवा आणि लसुन ची सुगंध बाळाच्या नाकाद्वारे आत जाईल. ह्या उपायाने बाळाची सर्दी नक्कीच कमी होईल.