avocado in marathi : निरोगी शरीर आणि चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार मिळणे आवश्यक आहे. शरीराला पोषक आहार देण्यासाठी फळे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक समाविष्ट असतात. सुपर फूड म्हणून ओळखले जाणारे एवोकॅडो असेच एक फळ आहे. जगभरातील लोकप्रिय फळांमध्ये एवोकॅडो चा समावेश केला जातो. आजच्या लेखात आपण एवोकॅडो औषधी उपयोग व फायदे जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करुया…
avocado meaning in marathi – एवोकॅडो फळ कसे असते ?
एवोकॅडो फळाचा आकार नाशपती प्रमाणे असतो. आधीच्या काळात हे फळ फक्त पुएबला (Puebla) आणि मेक्सिको (Mexico) इत्यादी ठिकाणी उगवले जायचे. (avocado meaning in marathi) एवोकॅडो चे मराठी नाव ‘एवोकॅडो’ असेच आहे. हे फळ भारतीय नसल्याने ह्याला मराठी नाव देण्यात आले नाही आहे. आज जग जाहीर झालेल्या या फळाच्या औषधी उपयोगामुळे हे फळ अनेक देशांमध्ये देखील उगवले जात आहे. या फळाच्या आत एक मोठी बी असते. फळाच्या वरच्या Danabol Ds 10 BODY RESEARCH buy in Australia online भागावरील साल टणक असते. एवोकॅडो चा रंग पिवळा व हिरवा असतो. या फळाचा स्वाद हलका मेवेदार असतो, म्हणून सॅंडविच, सलाद आणि मिल्क शेक म्हणून याला वापरले जाते.
एवोकॅडो चे फायदे – avocado fruit benefits in marathi
शरीर आणि उत्तम आरोग्य सोबत त्वचेसाठी देखील एवोकॅडो चे अनेक लाभ आहेत. एवोकॅडोचे हे फायदे आपण एकेक करून पाहू या.
- पचन सुधारण्याकरिता एवोकॅडो चे फायदे
एवोकॅडो हे आतड्यासाठी खूप गुणकारी आहे. म्हणून पचन सुधारण्यासाठी ह्याचे अनेक लाभ आहेत. यामध्ये असलेले फायबर आतड्यांमध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया वाढवते. त्यामुळे पचन सुधारते व आरोग्य चांगले राहते. - बद्धकोष्ठते मध्ये एवोकॅडो चे लाभ
एवोकॅडो मध्ये उच्च प्रमाणात फायबर सामील असतात. ज्यामुळे पचन सुधारण्यात मदत मिळते. आणि शरीराची पचन व्यवस्थित झाले की मलत्याग देखील विनाकष्ट होतो. म्हणून ज्या लोकांना पोट साफ न होण्याची समस्या असेल त्यांनी एवोकॅडो चे सेवन करायला हवे.
पोट व संडास साफ होण्यासाठी उपाय <<वाचा येथे - हृदयासाठी एवोकॅडो चे फायदे
हृदयाचे स्वास्थ कायम ठेवण्यासाठी आणि हृदय रोग संबंधित जोखीम दूर करण्यासाठी एवोकॅडो चे सेवन उपयुक्त आहे. या गोष्टीचे प्रमाण एवोकॅडो वर करण्यात आलेल्या एका शोधातून लक्षात आले आहे. एवोकॅडो मध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि ब्लडप्रेशर कमी करणारे गुणधर्म असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. - त्वचा आणि केसांसाठी एवोकॅडो
एवोकॅडो मध्ये अनेक विटामिन आणि खनिजं असतात. जे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारतात. याला खाल्ल्याने तुमची कोरडी आणि क्षतिग्रस्त त्वचा सुधारेल. एवोकॅडो च्या या गुणधर्मामुळे याचा उपयोग अनेक सौंदर्य प्रसाधनात केला जातो.
एवोकॅडो मध्ये विटामिन ए, बी, बी 1, बी 2 आणि सी इत्यादी असतात. या सर्व तत्वांच्या असल्याने केसांचा विकास जलद होतो. म्हणून केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील एवोकॅडो उपयोगी ठरू शकते. यासाठी एवोकॅडो तेलाचा देखील उपयोग केला जातो.
उत्तम एवोकॅडो फळ कसे निवडावे?
- सारखे आणि डाग नसलेले वजनदार फळ निवडावेत. जे चारही बाजूंनी टणक असावेत.
- डाग नसलेले व हलके धब्बे असलेले एवोकॅडो फळ खरेदी करावे व नरम असलेले फळ घेऊ नये.
- योग्य निवड करण्यासाठी एवोकॅडो चे फळ हलवून पहावे. जर आतील भाग हलत असेल तर ते फळ घेऊ नये.
तर मित्रहो आजच्या ह्या लेखात आपण एवोकॅडो चे फायदे (avocado fruit benefits in marathi) व एवोकॅडो काय आहे (avocado in marathi) या बद्दलची मराठी माहिती प्राप्त केली. आशा करतो की ही मराठी माहिती आपणास उपयुक्त ठरली असेल. ह्या माहितीला आपले मित्र व कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद…
अधिक वाचा
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा