लवकर झोप येण्यासाठी काय करावे: आजकाल तरुण तसेच वयस्क वर्गात रात्री लवकर झोप न येण्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. हे लोक रात्रभर इकडून तिकडे पालटत राहतात. पण त्यांना झोप येण्याचे नाव घेत नाही.
परंतु काही लोक असेही असतात ज्यांना अंथरुणावर पडता बरोबर झोप लागते तर या उलट काही लोक असे आहेत ज्यांना अंथरुणात शिरण्याचा अनेक तासांनंतरही झोप येत नाही. आजकाल च्या धावपळीच्या जीवनात झोप न येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे.
निद्रानाश ची ही समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. हे लवकर झोप येण्यासाठीचे उपाय तज्ञ मंडळी द्वारे सांगण्यात आले असून मागील काही काळात यांच्या नियमित उपयोगाने अनेकांनी आपली झोप न येण्याची समस्या सोडवली आहे. तर चला सुरू करुया…
झोप येण्यासाठी घरगुती उपाय
- झोपण्याआधी पायांना स्वच्छ धुवावे, शक्य होईल तर कोमट पाण्याने पाय स्वच्छ करावेत. यानंतर पायाच्या तळव्यांना खोबरेल तेलाने मालिश करावी.
- झोपताना जास्त टाईट कपडे परिधान करू नये. शक्य होईल तेवढे कमी कपडे अंगावर ठेवावेत.
- झोपण्याचा एक तास आधी मोबाईल, टीव्ही व इतर कोणतीही स्क्रीन पाहू नये. शांत झोप हवी असेल तर झोपण्याआधी मोबाईल ला अजिबात हात लावू नये.
- झोपताना आपले पाय उत्तरेकडे करून झोपावे. दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नये. याशिवाय देवी-देवतांच्या मूर्ती, फोटो व प्रतीमेकडे देखील पाय करू नयेत.
- आयुर्वेदानुसार दुपारी झोपल्याने शरीरात कफ वाढतात. जर रात्री शांत झोप हवी असेल तर दुपारी झोपणे टाळावे.
- 40 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या 305 लोकांवर केल्या गेलेल्या एका संशोधनानुसार, “सकाळ तसेच संध्याकाळी योग आणि व्यायाम करणाऱ्या लोकांना रात्री झोप येण्यास अडचण होत नाही.” म्हणून दररोज नियमित व्यायाम करायला हवा. आणि 2-3 किलोमीटर पायी चालायला हवे.
- पुस्तक वाचन हा एक चांगला छंद असण्यासोबतच तो आपल्या मेंदूला शांती प्रदान करतो. म्हणून जर रात्री झोप येत नसेल तर तुम्ही कोणतेही एक पुस्तक वाचू शकतात. परंतु मोबाईल मध्ये ebook वाचणे टाळावे.
मराठी भाषेत अनेक सुंदर पुस्तके आणि कादंबरी आहेत काही उत्तम कादंबऱ्या पुढील प्रमाणे आहेत. मराठी कादंबरी यादी - झोपण्याआधी कोमट पाण्याने केलीली अंघोळ शांत झोप येण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. जर अंघोळ करणे शक्य नसेल तर आपण कोमट पाण्याने हात पाय धू शकतात.
- झोपताना डोक्याखाली उशी घेणे प्रत्येकालाच आवडते. उशी घेतल्याने मानेला आराम देखील मिळतो. परंतु जर तुम्हाला शांत झोप येत नसेल तर तुम्ही उशी शिवाय झोपण्याचा प्रयत्न देखील करून पाहू शकता.
- झोप येण्यासाठी 30 सेकंद वाला फॉर्म्युला:
झोप येण्यासाठी हा उपयुक्त फॉर्म्युला आहे. याच्या नियमित अभ्यासाने लोक 30 सेकंदातच झोपू शकतात. यासाठी सर्वात आधी शरीराला पूर्णपणे रिलॅक्स करा. आता हुश्श आवाज करत हळुवार तोंडाने श्वास आत भरा. 7 सेकादांपर्यंत श्वास आत ठेवा. नंतर तोंड बंद करून नाकाने हळुवार श्वास बाहेर सोडा. आता नाकाने श्वास आत घ्या 7 सेकंद थांबून तोंडाने सोडा. या पद्धतीला 3 वेळा करा.
तर वाट कसली पाहताय आज रात्रीच झोप येण्यासाठी घरगुती उपाय या सर्व टिप्स उपयोगात आणून शांत झोपेचा आनंद मिळवा. धन्यवाद.
READ MORE
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा
पोस्टमध्ये झोपेच्या समस्यांवर छान उपाय आहेत.