how to control blood pressure in marathi | ब्लड प्रेशर रक्तदाब कमी करण्याचे उपाय : मानवी हृदय हे नसांच्या माध्यमाने संपूर्ण शरीरात रक्त पाठवते. शरीरात वाहणारे रक्त सुरळीत कार्यरत राहण्यासाठी त्यावर एक निश्चित दबाव आवश्यक असतो. परंतु काही कारणांमुळे जेव्हा नसांमधील रक्ताचा दबाव अधिक वाढून जातो तेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. वाढलेला ब्लडप्रेशर एक गंभीर समस्या आहे, यामुळे हृदयाचे कार्य देखील थांबू शकते. म्हणून जर तुम्हाला देखील उच्च रक्तदाबाची समस्या होत असेल तर आजच्या लेखातील रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर कमी करण्याचे उपाय तुम्हाला उपयोगी ठरू शकतात. तर चला सुरू करुया…
उच्च रक्तदाब म्हणजे काय ?
जेव्हा व्यक्ती असंतुलित आहार सेवन करतो तेव्हा शरीरात कफ आणि मेद ची वाढ होते. यामुळे नसांमध्ये रक्त वाहण्यात काठिण्य निर्माण होते. आणि रक्तदाब वाढतो. वाढलेल्या रक्तदाबामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
Table of Contents
ब्लड प्रेशर वाढण्याची कारणे
रक्तदाब वाढण्याची कारणे माहीत असल्यास यापासून काही हद्दीपर्यंत वाचले जाऊ शकते. म्हणून आता आपण उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे पाहूया
- लठ्ठपणा
- शारीरिक श्रम न करणे
- जेवणात जास्त मीठ खाणे
- वाढते वय
- धूम्रपान
- दारू पिणे
- अधिक चिंता आणि तणाव करणे
- थायरॉईड
- अनुवंशिकता
- मधुमेह, हृदय रोग आणि किडनी संबंधी आजार
- फास्ट फूड खाणे
उच्च रक्तदाबाची लक्षणे (high BP symptoms in Marathi)
रक्तदाब वाढण्याची कारणे माहित केल्यानंतर आता आपण उच्चरक्तदाबाची लक्षणे काय आहेत – high bp symptoms in marathi याबद्दलची माहिती प्राप्त करुया. रक्तदाब वाढल्यावर व्यक्तीमध्ये पुढील लक्षणे दिसू लागतात.
- सतत डोके दुखणे
- चक्कर येणे
- थकल्यासारखे वाटणे
- घबराहट वाटणे
- छातीत दुखणे
- डोळ्यांची दृष्टी कमी होणे
- श्वास घेण्यात परेशानी होणे
- पाय अचानक सुन्न होणे
- नाकातून रक्त येणे
तर मित्रांनो ही होती high bp symptoms in marathi. जर आपल्याला ही लक्षणे दिसत असतील तर आपला रक्तदाब वाढला आहे असे समजावे. आता आपण जाणूया की विविध वयोगटातील लोकांसाठी रक्तदाब किती असावा.
रक्तदाब किती असावा
सामान्यपणे 120/80 mm Hg रक्तदाबाला नॉर्मल रक्तदाब मानले जाते. आरोग्य तज्ञ नुसार विविध वयोगटातील लोकांमधील नॉर्मल रक्तदाब पुढील प्रमाणे सांगण्यात येतो.
15 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये सामान्य रक्तदाब 117/77 mm Hg व मुलींमध्ये 120/85 असायला हवा.
19 ते 24 वयोगटातील मुलामुलींमध्ये रक्तदाब 120/79 mm Hg ला सामान्य मानले जाते.
25 ते 29 या वयोगटातील पुरुष आणि महिलांमध्ये रक्तदाब 120/80 mm Hg असायला हवा.
30 ते 40 वयोगटातील पुरुषांमध्ये रक्तदाब हा 122/81 mm Hg व महिलांमध्ये 123/82 mm Hg असायला हवा.
40 ते 50 वयोगटातील पुरुष आणि महिलांमध्ये रक्तदाब हा 124/84 mmHg असायला हवा.
रक्तदाब कमी करण्याचे घरगुती उपाय (how to control blood pressure in marathi)
आता आपण रक्तदाब कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत. परंतु लक्षात असुद्या जर रक्तदाब कमी करण्याचे उपाय करूनही हाय ब्लडप्रेशर ची समस्या नियंत्रणात येत नसेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करावा.
- लसुन
उच्च रक्तदाबाला नियंत्रणात करण्यासाठी रक्तदाब कमी करण्याचे उपाय मध्ये लसणाचा उपयोग फार प्रभावी आहे. ब्लडप्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ मधासोबत एक लसणाची पाकळी खावी. लसुन रक्तशुद्धी आणि रक्त पातळ करण्याचे कार्य करते. शरीरातील रक्तासाठी लसणाचे अनेक फायदे आहेत. हे फायदे आपण पुढील लिंक वर वाचू शकता: कच्चा लसूण खाण्याचे फायदे. - आवळा
हाय बीपी वर घरगुती इलाज म्हणून आवळ्याचा देखील वापर केला जातो. आवळ्यामध्ये हायपोलिपीडेमिक आणि एंन्टीहायपरेटिव गुणधर्म असतात. जे नसांमधील रक्तदाब नियंत्रणात करण्याचे कार्य करतात व नसांमध्ये केलेस्टॉल आणि अन्य पदार्थांची वाढ थांबवतात.
यासाठी एक ग्लास स्वच्छ पाण्यात दोन चमचे आवळ्याचा रस टाकावा. व दररोज सकाळी हे पाणी खाली पोट प्यावे. आवळ्याचा रस आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक तसेच किराणा स्टोअर वर मिळून जाईल. आवळ्याचा रस आपण ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा… - कांद्याचा रस
कांद्यामध्ये क्वेरसेटिंन नावाचा पदार्थ असतो. याला उच्च रक्तदाब नियंत्रणात करण्यासाठी खूप उपयोगी मानले गेले आहे. एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की कांद्याचे अर्क 6 आठवड्यापर्यंत नियमित सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर मध्ये आराम मिळतो. तुम्ही कांद्याचा रस मध मध्ये मिसळून देखील दिवसातून दोन वेळा सेवन करू शकतात. रक्तदाब कमी करण्याचे उपाय मध्ये हा उपाय फार प्रभावी आहे. - मुळा
एन सी बी आय द्वारे करण्यात आलेल्या शोधात लक्षात आले आहे की मुळ्याच्या पानांमध्ये एंन्टीहायपरटेन्सीव गुणधर्म असतात. जे उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी सहाय्यक आहेत. म्हणून जेवणाच्या वेळी ताज्या मुळाच्या पानांचा उपयोग सलाद म्हणून करावा. तुम्ही या पानांची भाजी देखील बनवून खाऊ शकतात. - लिंबू
वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबू रस टाकून दिवसातून तीन वेळा प्यावा. रक्तदाबाची लक्षणे कमी करण्यासाठी लिंबू चा उपयोग केला जातो. भारतासह अनेक देशांमध्ये बीपी नियंत्रणात करण्यासाठी हा उपाय प्रभावी मानला जातो. म्हणून आपण देखील रक्तदाबाच्या समस्येत हा उपाय करू शकतात.
ब्लड प्रेशर कमी करण्याचे इतर उपाय
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी लाईफस्टाईल मध्ये बदल करणे आवश्यक आहे. पुढे काही आवश्यक उपाय देण्यात आले आहेत ज्यांना तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला हवे.