कानातील मळ काढण्यासाठी उपाय | how to remove ear wax and clean ears in marathi

कानातील मळ काढण्यासाठी उपाय : कानात असलेल्या मळ मुळे बऱ्याचदा इन्फेक्शन होऊ शकते. कानात मळ जमा होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु बऱ्याचदा ही समस्या अधिक वाढू शकते आणि ज्यामुळे कमी ऐकू येणे तसेच कान बंद पडणे यासारख्या समस्या होऊ शकतात. म्हणून आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला कानातील मळ काढण्यासाठी उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय करून आपण आपले कान स्वच्छ ठेवू शकतात.

कानातील मळ काढण्यासाठी उपाय | how to remove ear wax in marathi

कानात मळ का येतो ?

कानात मळ जमा होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. कानात असलेल्या मळ बाहेरील बॅक्टेरिया व कीटक ला कानात आत जाण्यापासून रोखतो. ज्यामुळे बाह्य घटकांपासून कानाच्या आतील पडदे सुरक्षित राहतात. दररोज कानातील मळ काढणे कानाच्या आरोग्यासाठी चांगले नाही आहे. कानात कोणतीही टोकदार वस्तू तसेच काडी वैगरे घालू नये. असे करून कान साफ केल्यास कानात नियमित मळ साचायला लागतो. म्हणून नियमित कानात काहीतरी बाह्य वस्तू टाकून स्वच्छ करणे टाळावे.

जर आपल्याला कानातील मळ स्वच्छ करावेसे वाटत असेल तर आपण महिन्यातून एकदा कान स्वच्छ करू शकतात. कानातील मळ काढण्यासाठी चे सुरक्षित घरगुती उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

कानातील मळ काढण्यासाठी उपाय

नारळाचे तेल
एक चमचा नारळाचे तेल हलके गरम करावे. यानंतर एका ड्रॉपर च्या मदतीने या तेलाचे काही थेंब कानात टाकावे. ज्या कानात तेल टाकले आहे त्याला दहा मिनिटे वरच्या बाजूला करून झोपावे. दहा मिनिटानंतर प्रभावित कानाला खालच्या बाजूला करावे. व कानातील तेल बाहेर निघू द्यावे. असे केल्याने कानातील मळ नरम होऊन बाहेर येऊन जाईल.

कानातील मळ काढण्यासाठी औषध : हायड्रोजन पेरॉक्साइड
यालाच हायड्रोजन डाय-ऑक्साइड देखील म्हटले जाते. हे लिक्विड तुम्हाला कोणत्याही औषधाच्या दुकानावर मिळून जाईल. याचा उपयोग प्रामुख्याने कानातील मळ काढण्यासाठी केला जातो. हायड्रोजन पेरॉक्साइड चा वापर पुढील प्रमाणे करावा.

सर्वात आधी एका ड्रॉपर च्या मदतीने हायड्रोजन पेरॉक्साइड चे 3 ते 4 थेंब प्रभावित कानात टाकावे. हे लिक्विड कानात टाकल्यावर काही वेळ कानात बुडबुडे निर्माण होणे, खाज सुटणे व असहच वाटणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. परंतु घाबरण्याची गरज नाही. या उपायाने हायड्रोजन पेरॉक्साइड सोबत कानातील सर्व मळ बाहेर निघून येतो. आपण हायड्रोजन पेरॉक्साइड ची औषध कोणत्याही मेडिकल स्टोर वरून खरेदी करू शकतात याशिवाय ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा.

ग्लिसरीन
ग्लिसरीनचा मुख्य उपयोग त्वचेला मुलायम आणि सुंदर करण्यासाठी केला जातो. परंतु यामध्ये कानाला साफ करणारे गुणधर्म देखील असतात. यासाठी सर्वात आधी थोडे ग्लिसरीन घ्यावे. यानंतर एक चमचा पाण्यात हे ग्लिसरीन मिक्स करावे. आणि हे पाणी प्रभावित कानात टाकावे. 5-10 मिनिटे पाणी कानात राहिल्यानंतर कानाला उलटे करून सर्व पाणी बाहेर काढावे आणि मुलायम कापडाने कान पुसावा.

बेबी ऑइल
बेबी ऑइल म्हणजेच लहान बाळांचे तेल हे एक प्रकारचे मिनरल ऑइल असते. कानातील मळ बाहेर काढण्यासाठी बेबी होईल उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला एका ड्रॉपर च्या मदतीने बेबी ऑइल चे काही थेंब कानात टाकायचे आहे. यानंतर कानाला कापसाच्या तुकड्याने बंद करावे. कानात कापूस लावल्याने तेल कानातून बाहेर येणार नाही. कानातील मळ काढण्यासाठी उपाय म्हणून बेबी ऑइल वापरले जाते.

तर मित्रांनो ह्या लेखात आपण कानातील मळ काढण्यासाठी घरगुती उपाय पहिले. आम्ही आशा करतो की हे उपाय आपणास उपयोगी ठरले असतील. ह्या उपायांना इतरांसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या समस्येचे समाधान मिळेल. आपणास ही माहिती कशी वाटली कमेन्ट करून सांगा आणि जर आपले काही प्रश्न असतील तर ते देखील कमेन्ट मध्ये विचारा. धन्यवाद..

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *