dulhan makeup list in marathi : लग्न ही आयुष्यातील अत्यंत आनंदाची आणि दोन जीवांना जोडणारी घटना असते. लग्न करणाऱ्या प्रत्येक नवरीची इच्छा असते की ती खूप सुंदर दिसावी. म्हणून लग्नाच्या आधी तासनतास हजार रुपये खर्च करून ब्युटी पार्लर मध्ये मेकअप केला जातो. परंतु आपण घरच्या घरी नवरीचा मेकअप सामान आणून नवरीला सजवू शकता.
आजच्या या लेखात dulhan makeup list in Marathi अर्थात नवरीचा मेकअप सामान दाखवला आहे . आपण पुढील मेकअप सामान यादी मधुन आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी खरेदी करू शकतात आणि नवरीला सजवू शकतात.
मेकअप सामान विकत घेण्याआधी
बाजारात जाऊन कोणतेही मेकअप सामान खरेदी करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. टीव्ही मध्ये जाहिरात पाहून अथवा दुकानदाराकडून एखाद्या वस्तूची प्रशंसा ऐकून कोणतीही वस्तू खरेदी करू नये. कारण टीव्हीत दाखवली गेलेली प्रत्येक क्रीम तुमच्या चेहऱ्याला सूट करेलच असे नाही. कारण बऱ्याचदा केमिकलयुक्त क्रीम सूट न झाल्याने चेहऱ्यावर ऍलर्जी व इतर समस्या होऊ शकतात.
कोणताही प्रोडक्ट खरेदी करण्याआधी त्याची क्वालिटी पहावी. निर्मिती (manufacture) व समाप्ती (expiry) मुदत तपासूनच प्रॉडक्ट ची खरेदी करावी. नुकताच निर्मीत झालेलाच मेकअप सामान खरेदी करावा. आपल्या चेहऱ्याच्या टोन नुसार योग्य क्रीम घ्यावी. चला आता पाहूया नवरीचा मेकअप साठी लागणाऱ्या कॉस्मेटिक सामान ची लिस्ट.
नोट : पुढे देण्यात आलेला सर्व नवरीचा मेकअप समान आपण पुढील लिंक वरून खरेदी करू शकतात. खरेदीसाठी येथे क्लिक करा…
नवरीचा मेकअप सामान (navricha makeup/ dulhan makeup list in Marathi)
प्रायमर (primer)
जर तुम्हाला आपल्या चेहऱ्यावरील मेकअप दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवायचे असेल तर मेकअप सामान चा लिस्टमध्ये प्रायमर सर्वात पहिले असायला हवे. एक चांगल्या क्वालिटीचे प्रायमर तुमच्या चेहऱ्याला नुकसान पोहोचू देत नाही आणि मेकअप देखील दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवते.