अंजीर खाण्याचे फायदे – anjeer benefits in marathi : काही फळे अशी असतात जी फळाच्या रुपांत तर स्वादिष्ट लागतातच परंतु सुकल्यानंतर ही आरोग्यासाठी गुणकारी सिद्ध होतात. अंजीर हे त्याच फळांपैकी एक ड्रायफ्रूट आहे. माझी काळजी च्या आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला सुके अंजीर खाण्याचे फायदे (anjeer benefits in marathi) आणि अंजीर कसे खावे या बद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तर चला सुरू करूया…
Table of Contents
अंजीर काय आहे | what is figs in Marathi
अंजीर हे काजू, बदाम, किस्मिस यासारखेच ड्रायफ्रूट आहे. अंजीर मध्ये शरीराला फायदा पोहोचवणारे अनेक घटक असतात. जगभरात अंजीर चा उपयोग केला जातो. इंग्रजी भाषेत याला फिग म्हटले जाते. अंजीर च्या झाडाची साल चिकणी आणि पांढऱ्या रंगाची असते. हे झाड मुख्यतः सुक्या आणि ऊन असलेल्या जागी वाढते. या झाडाची उंची 7-10 मीटरपर्यंत असते.
अंजीर चा उपयोग शरीरासाठी अत्यंत फायदेमंद आहे. बद्धकोष्ठता, सर्दी खोकला आणि श्वसन संबंधी रोगांमध्ये अंजीर लाभकारी आहे. अनेक लोकांना अंजीर खाण्याचे फायदे व अंजीर चे उपयोग माहीत नसतात. तर चला अंजीर खाण्याचे फायदे जाणूया..
सुके अंजीर खाण्याचे फायदे | dry fig fruit benefits in marathi
अंजीर मध्ये भरपूर प्रमाणात खनिज, जीवनसत्व, फायबर व विटामीन असते. पचन सुधारणे, हाडे बळकट होणे, हृदयाच्या समस्या दूर होणे, मूळव्याध कमी होणे इत्यादि अंजीर खाण्याचे फायदे आहेत. याशिवाय अंजीर खाण्याचे फायदे आणखी कोणकोणते आहेत याविषयी पुढे माहिती देत आहोत.
पचन आणि बद्धकोष्टता साठी अंजीर चे फायदे
अंजीर चे सेवन पचन तंत्राला अधिक सशक्त करते. अंजीर च्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर करता येते. पचन संस्था सशक्त करण्यासाठी रात्री झोपण्याआधी दोन-तीन अंजीर पाण्यात भिजून ठेवावे व सकाळी दूध अथवा मध सोबत खावे. पचन तंत्र मजबूत करून बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी शरीरात फायबर ची आवश्यकता असते. अंजीर मध्ये प्रचुर प्रमाणात फायबर असते. अंजीर मध्ये असलेले फायबर शरीरातील मल एकत्र करून शरीरा बाहेर काढण्याचे काम करते.
हाडांसाठी अंजीर
अंजीर मध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम प्रचुर प्रमाणात असते. जे हाडांना मजबूत करण्याचे कार्य करते. अंजीर च्या नियमित सेवनाने ऑस्टियोपोरोसिस सारख्या रोगांमध्ये संरक्षण प्राप्त होते.