dandruff remedies at home in marathi : आज-काल प्रदूषण आणि धावपळीच्या लाइफस्टाइल मध्ये केसांची योग्य काळजी घेणे जमत नाही. परिणामी केसांमध्ये कोंडा म्हणजेच डेंड्रफ ची समस्या होऊ लागते. केसांमध्ये असलेला कोंडा अनेकदा खांद्यावर येऊन पडतो आणि खांद्यावर असलेला हा कोंडा लोकांमध्ये शरमेने मान खाली घालण्यास लावू शकतो. अश्यामध्ये डोक्यात कोंडा झाल्यावर काय करावे हा प्रश्न प्रत्येकाच्या पुढे उभा राहतो.
आजच्या लेखात आपण केसातील कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय (dandruff remedies at home in Marathi) जाणून घेणार आहोत. या लेखातील घरेलू उपाय करून तुम्ही दहा मिनिटात केसातील डँड्रफ काढू शकतात व या उपायांचे काहीही साईड इफेक्ट नाही आहेत. तर चला सुरु करूया…
Table of Contents
डेंड्रफ म्हणजे काय ? (Dandruff in Marathi)
डेंड्रफ अर्थात कोंडा हा केसातील मृत त्वचेपासून बनलेला असतो. केसात कोंडा होणे हा डोक्याच्या त्वचेसंबंधी एक विकार आहे. केसातील डँड्रफ मुळे डोक्यात खाज येणे, पांढऱ्या रंगाच्या कोंडा खाली पडणे व असहज वाटू लागणे इत्यादी समस्या निर्माण होतात. केसात कोंडा होऊ नये ही सामान्य समस्या आहे असे मानले जाते की जगभरातील 50 टक्के लोकसंख्या केसातील कोंडाच्या समस्यांनी त्रस्त आहे. केसातील कोंडयामुळे केस गळती ची समस्या निर्माण होऊ शकते. केस गळतीवर घरगुती उपाय <<वाचा येथे
केसात कोंडा होण्याची कारणे
कोंडा होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. काही प्रमुख केसात कोंडा होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
- कोरडी त्वचा : केसातील कोंडा च्या समस्याचे प्रमुख कारण कोरडी त्वचा हेच आहे. खासकरून हिवाळ्यात जेव्हा संपूर्ण शरीराची त्वचा कोरडी होऊ लागते तेव्हा डेंड्रफ ची समस्या देखील वाढते. जर शरीरावरील इतर अवयवांची त्वचा कोरडी असेल तर अशा व्यक्तीला केसातील कोंडा होऊ लागतो.
- मानसिक तणाव : आज काल अनेक लोक डिप्रेशनमध्ये जगत आहेत. ज्यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. यामुळे देखील केसांमध्ये कोंडा वाढायला लागतो.
- अन हेल्दी पदार्थ खाणे
शरीरासाठी अन हेल्थी असलेले पदार्थ खाल्ल्याने देखील केसांमध्ये कोंडा वाढू लागतो. आईस क्रीम, पिझ्झा, कोल्ड्रिंक, बर्गर, समोसा, कचोरी यासारख्या फास्ट फूड मुळे शरीराची रोग प्रतिरोधक क्षमता कमी होते. ज्यामुळे हार्मोनल असंतुलन तयार होते. व यामुळे केसांमध्ये मृत पेशी वाढू लागतात. - केमिकल युक्त हेअर प्रॉडक्ट वापरणे
अनेकदा केस कलर करण्यासाठी लोक अमोनिया युक्त हेअर कलर चा वापर करतात. दीर्घ काळापर्यंत याचा वापर केल्याने केसांची त्वचा कोरडी होऊ लागते. याशिवाय केमिकलयुक्त तेल केसांमध्ये 9लावल्याने देखील कोंडा वाढू शकतो.
केसात कोंडा झाल्यावर काय करावे | dandruff remedies at home in marathi
निंबाच्या झाडाचे तेल
निंब हा अनेक औषधीयुक्त गुणकारी वृक्ष आहे. याचे एक एक पान विविध शारीरिक रोगांना दूर करण्याची क्षमता ठेवते. Dandruff remedies at home in marathi केसतील कोंडा जाण्यासाठीचा घरगुती उपाय म्हणून 15 ते 20 कडुलिंबाची पाने तोडून एक कप पाण्यात चांगल्या उकडून घ्याव्यात. आता या पानांचे पेस्ट बनवून त्याला संपूर्ण केसांच्या आतील त्वचेवर लावावे. तीस मिनिटानंतर शाम्पू आणि कंडिशनर लावून केस धुवावे. या उपायाने केसांमधील कोंडा निघून जातो.
लिंबाचे तेल ऑनलाइन खरेदी साठी येथे क्लिक करा