सर्दीवर घरगुती उपाय : ऋतुमानातील बदलामुळे सर्दी आणि खोकलाची समस्या होणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. ही समस्या कोणालाही होऊ शकते. हिवाळ्यात सर्दी मुळे नाक वाहने सुरू होते. सर्दी ची ही समस्या 5-7 दिवसात ठीक होऊन जाते. परंतु बऱ्याचदा दीर्घकाळापर्यंत सर्दी राहू शकते. याशिवाय काही लोक जुनाट सर्दी ने त्रस्त असतात. म्हणून आजच्या या लेखात आपण सर्दी वर घरगुती उपाय पाहणार आहोत. यामध्ये वारंवार सर्दी होण्याची कारणे आणि जुनाट सर्दी वर घरगुती उपाय देखील देण्यात आले आहेत. तर चला सुरू करुया…
सर्दी होण्याची कारणे
सर्दी होण्याची अनेक कारणे असू शकतात यामधील प्रमुख कारण वातावरणातील बदल हेच आहे. इतर काही कारणे पुढीलप्रमाणे आहे-
- सर्दी ने संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या जवळ येणे.
- संक्रमित व्यक्तीच्या शिकल्याने वातावरणात विषाणू पसरणे व ते विषाणू नाकाद्वारे तुमच्या शरीरात जाणे.
- वातावरणात बदल होणे व अधिक थंडी वाढणे.
- रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे.
- थंडी वाजणे किंवा पाण्यात भिजणे.
- कोरोनाव्हायरस ने संक्रमित होने.
अधिक वाचा>> रोगप्रतिकार शक्ति कशी वाढवावी
सर्दीवर व जुनाट सर्दीवर घरगुती उपाय
सर्दीवर घरगुती उपाय करून आराम मिळवला जाऊ शकतो. बऱ्याचदा सामान्य सर्दी मध्ये डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता राहत नाही. आपण घरच्या घरी काही घरगुती उपाय करून सर्दीला चांगले करू शकतात.
अद्रक ज्यूस
सर्दी झाल्यावर अद्रक चे सेवन केल्याने आराम मिळू शकतो. शास्त्रीय शोध तसेच आयुर्वेदातही अद्रकला गुणकारी औषध मानले गेले आहे. अद्रक ची चहा पिल्याने शरीरात उष्णता वाढते व सर्दीत आराम मिळतो. याशिवाय तुम्ही अद्रकचा काढा देखील बनवू शकता. अद्रकचा काढा बनवण्याकरीता पुढील स्टेप फॉलो करा.
- सर्वात आधी अद्रक कुटून घ्यावे.
- यानंतर त्याला एक कप पाण्यात काही वेळ उकळून घ्यावे.
- ह्या नंतर पाणी गाळून त्यामध्ये एक चमचा मध मध्ये टाकावे.
- आता अद्रक चा हा काढा प्यावा.
- हा उपाय दिवसातून दोन वेळा करावा.
हळदीचे दूध
आयुर्वेदात हळदीच्या दुधाला अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त म्हटले गेले आहे. हळद आणि दूध यांचे मिश्रण सेवन केल्याने सर्दी मध्ये आराम मिळतो. यामध्ये असलेले एन्टीमायक्रोबियल गुणधर्म सर्दी चे इन्फेक्शन कमी करतात. म्हणून सर्दी झाली असल्यास सर्दीवर घरगुती उपाय म्हणून रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट हळदीचे दूध प्यावे.
तुळशीची पाने आणि मीठ
जर तुम्हाला सर्दी तसेच खोकल्याची समस्या असेल तर तुळशीची पाने काळ्या मिठासोबत नियमित सेवन करावे. असे केल्याने लवकरात लवकर सर्दीची समस्या कमी होईल.