लवंग खाण्याचे फायदे – lavang che fayde in marathi : घरात सहजरीत्या उपलब्ध होणारी लवंग ही आकाराने जरी लहान असली तरी तिचे फायदे खूप मोठे आहेत. लवंग मध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे सर्दी खोकल्यापासून तर मोठ मोठ्या आजारांपर्यंत तिचा वापर केला जातो. लवंग खाण्याचे नेमके फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात.
लवंग काय आहे ?
लवंग हे एक औषधी मसाला पदार्थ आहे, ज्याचा वापर फार पूर्वी काळापासून केला जातोय. लवंग चे झाड हे नेहमी फुललेले दिसून येते. अगदी पूर्वीपासून लवंगच्या सुक्या कळ्यांचा उपयोग करून घेण्यात येत आहे. भारतामध्ये याचा वापर हा मसाल्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आणि त्यासाठीच लवंग प्रचलित आहे. लवंग ला इंग्रजी भाषेत क्लोव (Clove) म्हटले जाते. याचे वैज्ञानिक नाव सिजीजियम अरोमॅटिक (Syzygium aromaticum) आहे. साधारणपणे 9 वर्षाने एका झाडाला लवंगेचे फूल येतात. हे फूल सुकवून लवंग तयार होते. लवंग ही अतिशय औषधीय असून अनेक वर्षांपासून याचा उपयोग केला जातो. यामध्ये अँटिमायक्रोबायल आणि अँटिऑक्सिडंट्सचा अधिक प्रभाव असतो. लवंगची चव गोड तिखट असते याचा वापर सुगंधित मसाला म्हणून केला जातो, लवंगचा वापर पारंपारिक औषधांमध्ये केला जात आहे.
लवंग खाण्याचे फायदे | lavang che fayde in marathi
लवंग ही अनेक रोग व उत्तम आरोग्यासाठी उपयोगात येते. लवंग चे फायदे पुढे देण्यात आलेत आहेत.
- तोंडासंबंधी रोग व तोंडाची दुर्गंधी
lavang che fayde : लवंग मध्ये अंटी बॅक्टेरियल व अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे तोंडातील सत्तर टक्क्यांहून अधिक जंतूंचा नाश लवंग द्वारे होत असतो. म्हणूनच बऱ्याचशा टूथपेस्ट मध्ये लवंग चा वापर केलेला असतो. सोबतच लवंग ही तोंडातील दुर्गंध देखील दूर करते, म्हणून ज्या लोकांना तोंडातील दुर्गंध चा त्रास होत असेल त्यांनी दर रोज सकाळ संध्याकाळ दोन ते तीन लवंग तोंडात चघळावेत. या उपायाने तोंडातून जंतू नाहीसे होतील आणि दुर्गंधी पासून मुक्ती मिळेल. या शिवाय तोंड आल्यावर घरगुती उपाय म्हणूनही आपण लवंग चा उपयोग करू शकतात. - सर्दी खोकल्यासाठी
लहानपणी आजी आजोबा सर्दी खोकल्यात लवंग खाण्याची सल्ला देत असत. खोकल्याने होणारी गळ्यातील खसखस लवंग खाल्याने दूर होते. याशिवाय लवंग सोबत अद्रक घालून काढा करून प्यायल्याने छाती मोकळी होऊन सर्दी खोकल्यावर आराम मिळतो. - पचनासाठी उपयुक्त
लवंग खाण्याचे फायदे अनेक आहेत त्यापैकीच एक म्हणजे लवंग खाल्याने अन्न पचन होण्यात सहाय्य होते. जेवणानंतर लवंग चे सेवन केल्याने पचन सुरळीत होते व याशिवाय ऍसिडिटी, पोट फुगणे या गोष्टींपासून देखील सुटका होते. - वजन कमी करण्यासाठी
जे लोक वजन कमी करू इच्छिता त्यांच्यासाठी लवंग अतिशय उत्तम पर्याय म्हणून कामी येते. एक ग्लास पाण्यात तीन ते चार लवंग टाकून दहा मिनिट उकळून घ्यावे. नंतर लवंग चे गुणधर्म मिश्रित ते पाणी गाळून प्यावे. या उपायाने वजन कमी होण्यास मदत होते. एक महिन्यापर्यंत सलग हा प्रयोग केल्याने नक्कीच वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी उपाय म्हणून Lavang che fayde in marathi मधील हा एक प्रभावीउपाय आहे. - गर्भावस्थेत देखील फायदेशीर
गर्भवती स्त्रियांना गर्भावस्थेत दरम्यान मळमळ व उलटी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी त्यांनी एक लहान लवंग तोंडात टाकली तर या समस्येपासून त्यांची सुटका होईल. गरोदर असल्याची लक्षणे <<येथे वाचा - पिंपल्स पासून सुटका
ज्या व्यक्तींना पिंपल्स जास्त होतात त्यांनी लवंगचे तेल किंवा लवंग चा लेप करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर होणारे पिंपल कमी होतात. तसेच पिंपल मुळे होणारे डाग देखील राहत नाही व चेहरा उजळून स्वच्छ होतो. - दम्यासाठी लवंग चा वापर
लवंगमध्ये असलेले युजेनॉल दम्याच्या समस्येत उपयोगी मानण्यात येते. एका शोधानुसार, हा घटक अँटिअस्थमेटिक असल्याने दम्याने त्रस्त असलेल्या लोकांना याची मदत मिळते. यामधील ब्रोन्कोडायलेटर आणि इम्यनोमॉड्युलेटरी गुणांमुळे दम्याच्या लोकांना फायदा मिळतो. लवंग तेलाचा सुगंध नाकातील नळी साफ करण्यास मदत करतो. तसेच दमा, खोकला, सर्दी, सायनस यासारख्या समस्याही लवंग ने बऱ्या होतात. - दाढ दुखत असल्यास
दाढ दुःखी च्या समस्येत दाताखाली लवंग ठेवल्याने दुखणे कमी होते. तसेच लवंग चे तेल कापसावर घेऊन त्या दातावर लावल्याने देखील दातदुखी कमी होते - मधुमेहा साठी लवंग चा वापर
मधुमेह झाल्यावर लवंग खाल्ल्याने मधुमेहावर देखील गुणकारी परिणाम दिसून येतो. लवंग हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यात सहाय्य करते ज्यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवणे सोपे होते. - गळ्यात सूज आल्यास
गळ्यात सूज आल्यावर लवंगचा चहा करून पिल्याने आराम मिळतो. याशिवाय पाण्यात लवंग टाकून उकळून प्यायल्याने देखील गळ्यातील सूज कमी होऊन गळा मोकळा होतो. - हाडांसाठी
नरम व ढिसूळ झालेली हाडे संधीशोथ (Arthritis) ची लक्षणे असतात. जगभरात करोडो लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत. लवंग खाल्याने हाडांचे मास वाढवण्यासाठी चे फायदे होऊ शकतात. - पित्त होणे
ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो, त्यांना लवंग खाल्ल्याने पित्ताच्या समस्येपासून मुक्ती मिळेल व त्यांचे आरोग्य चक्र व्यवस्थित चालेल.
लवंग मुळे होणारे नुकसान – lavang side effects in marathi
लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु प्रमाणाबाहेर लवंग खाल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अति लवंग खाल्याने पुढील लवंग खाण्याचे नुकसान / साईड इफेक्ट दिसू शकतात. lavang side effects in marathi
- रक्त पातळ होते
- पोटात जळजळ होते
- चेहऱ्यावर एलर्जी येते
- गडद पिवळ्या रंगाची लघवी होते तसेच लघवी करताना जळजळ होते
- बर्याचदा उलटी होते तसेच छातीत जळजळ देखील होऊ शकते.
तर मित्रहो ह्या लेखात आपण लवंग खाण्याचे फायदे काय आहेत (lavang che fayde in marathi) व लवंग तेलाचे फायदे आणि उपयोग याविषयी ची माहिती प्राप्त केली. आशा आहे ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. या माहितीला इतरांसोबतही नक्की शेअर करा.
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा