हात गोरे होण्यासाठी उपाय – hat gore karnyache upay : अनेक लोकांना समस्या असते की त्यांच्या चेहऱ्याच्या रंगापेक्षा हाताचा रंग हा सावळा असतो. ही समस्या जास्त करून शर्टच्या बाह्या पासून खाली असलेल्या हातांवर दिसते. उन्हात हात मोकळे ठेवून फिरणे ही त्यामागील प्रमुख कारणे असू शकतात. हातांचा हा काळेपणा चारचौघांमध्ये आपल्याला शरमेने मान खाली घालाया लावू शकतो. म्हणून आजच्या या लेखात हात गोरे करण्यासाठी घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत.
Table of Contents
हात काळे पडण्याची कारणे
चेहर्यापेक्षा हात जास्त काळे होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत
- गंदगी, धूळ आणि प्रदूषण
- सूर्याची अल्ट्रावायलेट किरणे
- हातातील त्वचेत ओलाव्याची कमतरता
- त्वचेची व्यवस्थित स्वच्छता न ठेवणे
- हायपर पिग्मेंटेशन किंवा मेलेनिन मुळे त्वचा काळी होते
हात गोरे होण्यासाठी उपाय
- हात गोरे होण्यासाठी उपाय म्हणून नियमित पद्धतीने आंघोळीला जाण्याआधी हात आणि पायांना स्वच्छ कपड्याने चोळून घ्यावा. असे केल्याने त्वचेवर असलेल्या सर्व मृत कोशिका निघून जातात.
- आंघोळीच्या अर्धा तास आधी नारळाचे तेल हात आणि कोपरावर लावावे.
- दररोज अंघोळ करतांना हात व शरीरावरील सर्व अवयवांना जाळी आणि साबणाने स्वच्छ करावे.
- हातांचा काळेपणा उन्हामध्ये काम केल्याने किंवा जास्त वेळ बाहेर फिरल्याने होतो. म्हणून उन्हात बाहेर जाण्याआधी हातांना व्यवस्थित झाकावे. याशिवाय तुम्ही सन क्रीम चा वापर देखील करू शकता.
पुढे हात गोरे होण्यासाठी उपाय म्हणून काही घरगुती आयुर्वेदिक पॅक्स देण्यात आले आहेत-
दुधाची मलाई आणि लिंबू पॅक
हात गोरे होण्यासाठी उपाय म्हणून आपण दूध मलई आणि लिंबू चा उपयोग करू शकतात. हातांना गोरे करण्यासाठी दररोज रात्री झोपण्याआधी दुधाच्या मलाई मध्ये थोडा लिंबू पिळून घ्यावा या मिश्रणात दोन ग्लिसरीन थेंब टाका व हे मिश्रण हातांना लावा.
ऑलिव्ह ऑइल आणि साखर
सौंदर्यप्रसाधनात ऑलिव्ह ऑईल चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. ऑलिव्ह ऑइल हातावरील काळेपणा दूर करण्यासाठी उपयोगी आहे. याचे जास्त फायदे मिळवण्यासाठी 3 चमचे ऑलिव्ह ऑईल मध्ये कुटलेली साखर मिसळून याला दोन्ही हातांवर लावा. याच्या 20 मिनिटानंतर थंडगार पाण्याने हात धुवून घ्या.
हळद, नारळाचे तेल आणि कोरफड
हळद ही जखमेवर अतिशय प्रभावी औषध आहे परंतु तिचा उपयोग सौंदर्यप्रसाधनात केले मोठ्या प्रमाणात केला जातो. कोरफड च्या जेल मध्ये ऑंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.