हात गोरे होण्यासाठी उपाय | home remedies for whitening hands in marathi

हात गोरे होण्यासाठी उपाय – hat gore karnyache upay : अनेक लोकांना समस्या असते की त्यांच्या चेहऱ्याच्या रंगापेक्षा हाताचा रंग हा सावळा असतो. ही समस्या जास्त करून शर्टच्या बाह्या पासून खाली असलेल्या हातांवर दिसते. उन्हात हात मोकळे ठेवून फिरणे ही त्यामागील प्रमुख कारणे असू शकतात. हातांचा हा काळेपणा चारचौघांमध्ये आपल्याला शरमेने मान खाली घालाया लावू शकतो. म्हणून आजच्या या लेखात हात गोरे करण्यासाठी घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत.

हात गोरे होण्यासाठी उपाय

हात काळे पडण्याची कारणे

चेहर्‍यापेक्षा हात जास्त काळे होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत

  • गंदगी, धूळ आणि प्रदूषण
  • सूर्याची अल्ट्रावायलेट किरणे
  • हातातील त्वचेत ओलाव्याची कमतरता
  • त्वचेची व्यवस्थित स्वच्छता न ठेवणे
  • हायपर पिग्मेंटेशन किंवा मेलेनिन मुळे त्वचा काळी होते

हात गोरे होण्यासाठी उपाय

  • हात गोरे होण्यासाठी उपाय म्हणून नियमित पद्धतीने आंघोळीला जाण्याआधी हात आणि पायांना स्वच्छ कपड्याने चोळून घ्यावा. असे केल्याने त्वचेवर असलेल्या सर्व मृत कोशिका निघून जातात.
  • आंघोळीच्या अर्धा तास आधी नारळाचे तेल हात आणि कोपरावर लावावे.
  • दररोज अंघोळ करतांना हात व शरीरावरील सर्व अवयवांना जाळी आणि साबणाने स्वच्छ करावे.
  • हातांचा काळेपणा उन्हामध्ये काम केल्याने किंवा जास्त वेळ बाहेर फिरल्याने होतो. म्हणून उन्हात बाहेर जाण्याआधी हातांना व्यवस्थित झाकावे. याशिवाय तुम्ही सन क्रीम चा वापर देखील करू शकता.

पुढे हात गोरे होण्यासाठी उपाय म्हणून काही घरगुती आयुर्वेदिक पॅक्स देण्यात आले आहेत-

दुधाची मलाई आणि लिंबू पॅक

हात गोरे होण्यासाठी उपाय म्हणून आपण दूध मलई आणि लिंबू चा उपयोग करू शकतात. हातांना गोरे करण्यासाठी दररोज रात्री झोपण्याआधी दुधाच्या मलाई मध्ये थोडा लिंबू पिळून घ्यावा या मिश्रणात दोन ग्लिसरीन थेंब टाका व हे मिश्रण हातांना लावा.

ऑलिव्ह ऑइल आणि साखर

सौंदर्यप्रसाधनात ऑलिव्ह ऑईल चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. ऑलिव्ह ऑइल हातावरील काळेपणा दूर करण्यासाठी उपयोगी आहे. याचे जास्त फायदे मिळवण्यासाठी 3 चमचे ऑलिव्ह ऑईल मध्ये कुटलेली साखर मिसळून याला दोन्ही हातांवर लावा. याच्या 20 मिनिटानंतर थंडगार पाण्याने हात धुवून घ्या.

हळद, नारळाचे तेल आणि कोरफड

हळद ही जखमेवर अतिशय प्रभावी औषध आहे परंतु तिचा उपयोग सौंदर्यप्रसाधनात केले मोठ्या प्रमाणात केला जातो. कोरफड च्या जेल मध्ये ऑंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.

हळद, नारळ तेल आणि कोरफड चे पॅक बनवण्यासाठी. दोन ते तीन चमचे हळद वाटीभर उकळलेल्या पाण्यात टाका. आता यात 2 चमचे एलोवेरा (कोरफड) जेल आणि तीन मोठे चमचे नारळाचे तेल टाका. यानंतर हा लेप दोन्ही हातांना लावा. आपण हा लेप गुडघे आणि पायांवर ही लावू शकता. लेप सुकल्याच्या एक तासानंतर थंड पाण्याने धुवून घ्या.

दूध आणि संत्रीची साल

संत्र्याच्या सालीत ब्लीचिंग गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचेवरील काळेपणा दूर करून तिला चमक प्रदान करतात. यासाठी तुम्हाला संत्र्याची सुकलेली साल मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे, सालीच्या या पाऊडर मध्ये दूध मिसळून हातांना लावून 20 मिनिटांनी हात धुवून काढल्याने याचे त्वचेवर अनेक लाभ होतात.

तर हे होते हात गोरे होण्यासाठी उपाय, वरील उपयांच्या नियमित वापरणे आपण आपल्या हातांचा रंग आधी पेक्षा नक्कीच सुधारू शकतात. याशिवाय चेहरा उजळण्यासाठी उपाय << आपण येथे वाचू शकतात आणि हेल्थ व सौन्दर्य या विषयांवरील लेख वाचण्यासाठी आमची वेबसाइट https://majhikalaji.com/ ला भेट देत रहा.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *