डोळे लाल होण्याची कारणे & घरगुती उपाय मराठी | eye redness problem in marathi

डोळे लाल होणे घरगुती उपाय : डोळे लाल होण्याची कारणे डोळ्यात असलेल्या रक्तवाहिन्या जेव्हा सुजून प्रसरण पावतात तेव्हा डोळे लाल होतात. डोळे लाल होण्याची समस्या जास्त करून बाहेरील धूळ अथवा कचरा डोळ्यात गेल्याने उत्पन्न होते. आजच्या या लेखात डोळे लाल होण्याची कारणे आणि त्यावर उपाय देण्यात आले आहेत. तर चला dole lal hone upay in marathi सुरू करूया…

डोळे लाल होणे घरगुती उपाय व डोळे लाल होण्याची कारणे dole lal hone upay
डोळे लाल होणे / dole lal hone upay

डोळे लाल होण्याची कारणे

डोळे लाल होण्याचे प्रमुख कारण डोळ्यातील रक्तवाहिन्या मध्ये आलेली सुजन असते. अनेक उत्तेजक पदार्थ यासाठी कारणीभूत असू शकतात जसे-

 • कोरडे केस
 • उन्हात फिरणे
 • धूळ माती
 • सर्दी खोकला
 • एलर्जी
 • व्हायरस बॅक्टेरिया
 • डोळ्यात क्लोरिन जाणे (स्विमिंग पूल मध्ये आंघोळ केल्याने हे होते)
 • कमी झोप
 • डोळे चोळणे
 • धूम्रपान किंवा दारू पिणे
 • डोळ्याला इजा होणे
 • डोळे येणे
 • जास्त वेळ मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरणे

वरील कारणांमध्ये डोळे लाल होण्यासोबतच डोळ्यांची खाज, सुजन, जलन, डोळ्यातील कोरेडेपणा, अश्रू वाहणे, अंधुक दिसणे इत्यादी समस्या देखील उदभवू शकतात. पुढे आम्ही काही टिप्स व घरेलू उपाय देत आहोत ज्यांच्या मदतीने आपण डोळे लाल होणे ही समस्या कमी करू शकता.

डोळे लाल होणे घरगुती उपाय | dole lal hone upay in marathi

 • जेव्हा डोळे लाल होण्याची समस्या होत असेल, तेव्हा ब्युटी आणि मेकअप प्रोडक्ट चा वापर थांबवा. कारण या प्रॉडक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असते ज्यामुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते.
 • डोळ्यांना थंड पाण्याने शेकायला हवे. असे केल्याने डोळ्यांना थंडावा व आराम मिळतो.
 • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यांचे ड्रॉप खरेदी करा. व त्याचा नियमित वापर करा.
 • मोबाईल फोन, टीव्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर यांचा उपयोग कमीत कमी करा.
 • बाहेर निघताना सनग्लास वापरा व धूळ आणि घाण असलेल्या ठिकाणी जाणे टाळा.
 • जर आपण दिवसभर कॉम्प्युटरवर काम करत असाल तर या गोष्टीची खात्री करून घ्या की आपल्या रूम मध्ये योग्य आणि पुरेसा प्रकाश असायला हवा. याशिवाय नसतांना ही डोळ्यांचा अँगल सरळ राहील असेच बसावे. संगणकाचा वापर करीत असताना अर्ध्या अर्ध्या तासानंतर एक ब्रेक घ्यावा आणि स्क्रीनवरून डोळे सरकवून दूरवर पहावे.
 • जर तुम्ही स्मोकिंग करीत असाल तर लवकरात लवकर ही सवय सोडा. कारण जास्त प्रमाणात स्मोकिंग केल्याने डोळे कोरडे होतात.
 • एलोवेरा जेल डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. यात एल्कलाइन आणि एंटीइंफ्लामेटरी गुणधर्म असतात. जे डोळ्यांचा कोरडेपणा दूर करून त्यांना ओलावा प्रदान करतात. यासाठी दररोज एलोवेरा जेल पाच ते दहा मिनिटे डोळ्यांवर लावावे व नंतर डोळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी.
 • गुलाब जल डोळ्यांना थंडावा प्रदान करते. आपण याचा देखील उपयोग करू शकतात.
 • काजळ अथवा सुरमा डोळ्यांवर ताण आणते म्हणून यांचा उपयोग न केलेलेच चांगले.
 • जेवणात काही बदल करून डोळ्यांचे आरोग्य सुधारले जाऊ शकते. यासाठी नेहमी जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
 • डोळे लाल होणे घरगुती उपाय म्हणून आपण पाणी आणि मीठ उपचार करू शकतात. यासाठी सर्वात आधी एक भांड्यात पाणी उकळावे, पाणी उकळल्यानंतर थंड करा. त्यात थोडे मीठ टाकून, हे मीठ-पाणी कापसाने डोळ्यांवर लावा.
 • काकडी : काकडी मध्ये Anti-Irritation गुणधर्म असतात. काकडी ही थंड असल्याने तिला कापून डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांतील खाज , सूज , जळजळ दूर होते आणि डोळे लाल होणे या समसयेपासून सुटका होते.

मुळात लाल डोळे होणे यात फार जास्त घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण प्रवास आणि लहान मोठे इन्फेक्शन मुळे ही समस्या उद्भवू शकते. परंतु जर आपल्याला डोळे लाल होण्यासोबत अत्यधिक वेदना, डोकेदुखी, अंधुक दिसणे सारख्या समस्या होत असतील तर सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मगच पुढील उपचार करावेत.

या लेखात आम्ही आपल्यासाठी डोळे लाल होणे घरगुती उपाय आणि कारणे याची माहिती दिली आहे. जर dole lal hone upay in marathi याविषयी आपले काही प्रश्न असतील तर आम्हास कमेन्ट करून नक्की विचारा धन्यवाद..

READ MORE:

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *