Lavender oil in Marathi : लॅव्हेंडर च्या फुलापासून बनवण्यात येणारे लव्हेंडर तेल शरीराच्या विविध रोगांमध्ये गुणकारी सांगितले जाते. लॅव्हेंडर तेलाचे विशेष फायदे सौंदर्यप्रसाधनात होतात. या तेलाचा सुगंध मन आणि शरीराला आराम देतो. आजच्या या लेखात आपण Lavender oil in Marathi अर्थात लॅव्हेंडर तेल काय आहे ? आणि लव्हेंडर तेलाचे आरोग्यवर्धक फायदे कोणते आहेत याबद्दल माहिती प्राप्त करणार आहोत.
लव्हेंडर तेल काय आहे ? lavender oil meaning in marathi
लव्हेंडर तेल एक अशी जडीबुटी आहे जी चेहऱ्यावर सौंदर्य तर वाढवतेच परंतु केसांचे आरोग्य देखील सुधारते. ही जडीबुटी त्वचेसंबंधित असणाऱ्या सर्व समस्यांना दूर करण्यात सहाय्यक आहे. लॅटिन भाषेत लॅव्हेंडर चा अर्थ होतो धुणे. लव्हेंडरचे फुल जांभळ्या रंगाचे असते. याचा उपयोग आयुर्वेदिक औषधांसाठी केला जातो. लव्हेंडरच्या फुलातून तेल काढण्यासाठी ‘स्टीम डिस्टिलेशन‘ ही प्रक्रिया केली जाते.
या तेलाचे सौंदर्यासाठी अनेक फायदे आहेत म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात या तेलाची एक बाटली ठेवायला हवी. जर आपण अजूनही लव्हेंडर तेल खरेदी केले नसेल तर पुढील लिंकवर ऑनलाइन खरेदी करू शकतात. खरेदीसाठी येथे क्लिक करा
लव्हेंडर तेलाचे फायदे | benefits of lavender oil in marathi
आता आपण विविध समस्यांमध्ये लॅव्हेंडर तेलाचे फायदे पाहूया-
- झोप न येणे
शांत झोपेसाठी लव्हेंडर तेलाचा उपयोग केला जाऊ शकतो. lavender in marathi या तेलाचा सुगंध इतका मनमोहक असतो की मन आणि शरीर पूर्णपणे शांत होते. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ सुधारण्यासाठी अरोमा थेरपी केली जाऊ शकते. - डोकेदुखीच्या समस्येत उपयोगी
जर कोणाला नेहमी तणाव आणि डोकेदुखीची समस्या असेल तर लव्हेंडर तेल नैसर्गिक पद्धतीने डोकेदुखी दूर करण्यात मदत करते. या तेलात दुखणे दूर करून सुजन कमी करणारे गुणधर्म असतात. याशिवाय हे तेल तणावग्रस्त असलेल्या शरीराच्या स्नायूंना आराम देते.
मायग्रेन आणि डोकेदुखी ची समस्या होत असेल तर एका रूमाल मध्ये लव्हेंडर तेलाचे काही थेंब टाकावेत आणि या रूमाल च्या मदतीने तेलाचा सुगंध श्वासाद्वारे आत ओढावा. याशिवाय आणखी दुसरा पर्याय म्हणजे एक चमचा जैतुन च्या तेलात काही थेंब लव्हेंडर तेल टाकावे आणि कपाळावर मालिश करावी. असे केल्याने डोकेदुखी दूर होते. - चेहऱ्यावरील डाग दूर करण्याकरिता
चेहऱ्यावर असलेले काळे डाग व पिंपल दूर करण्यासाठी लॅव्हेंडर तेलाचा उपयोग केला जाऊ शकतो. या समस्येमध्ये चेहऱ्यावर लव्हेंडर तेल लावून मालिश करावी. याशिवाय तुम्ही दररोज सकाळी अंघोळीच्या पाण्यातही लव्हेंडर तेलाचे काही थेंब टाकू शकतात. - भाजण्याचे डाग
बऱ्याचदा शरीरावर आगीमुळे किंवा वाफ लागून जलन चे निशान उमटून जातात. जर तुम्हाला देखील शरीरावर जळण्याच्या खुणा असतील तर तुम्ही लव्हेंडर तेलाचा उपयोग करू शकतात. यासाठी लव्हेंडर तेलाचे काही थेंब जळलेल्या जागी लावावेत. - केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी
आज-काल अनेक लोकांच्या केसांमध्ये दर दोन दिवसांनी कोंडा होतो. जर आपणही या समस्येपासून त्रस्त असाल तर आजच लव्हेंडर तेलाचा उपयोग सुरू करा.
केसातील कोंडा घालवण्यासाठी लव्हेंडर तेलाचे काही थेंब बदाम अथवा नारळ तेलात मिक्स करावेत आणि हे तेल केसांना लावावे. असे केल्याने केसातील कोंडा तर कमी होईलच परंतु तुमचे केस चमकदार आणि सुगंधित राहतील. - परफ्यूम म्हणून उपयोगी
लव्हेंडरच्या मनमोहक सुगंधामुळे त्याला परफ्यूम म्हणूनही वापरले जाते. जर आपण हे तेल परफ्यूम म्हणून वापरत असाल तर हे तुम्हाला नेहमी आनंदी आणि उत्साही ठेवील.
परफ्यूम म्हणून या तेलाचा वापर करण्यासाठी तुम्ही याचे काही थेंब आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. याशिवाय आपण तेलाचे काही थेंब आपल्या मनगट, शर्ट आणि मानेजवळ लावू शकतात.
लव्हेंडर तेलाचे नुकसान
- तसे पाहता लव्हेंडर तेलाला त्वचेवरील उपयोगासाठी सुरक्षित मानले जाते. परंतु तरीही एलर्जि ची संभावना टाळण्यासाठी सुरुवातीला शरीराच्या थोड्या भागावर तेल लाऊन परिक्षण करावे.
- दीर्घ काळापर्यंत लव्हेंडर तेलाचा उपयोग केल्याने हार्मोन असंतुलन होऊ शकते. आणि यामुळे पुरुषांमध्ये gynecomastic समस्या होऊ शकते. या समस्येत पुरुषांच्या छाती चा आकार सामान्य पेक्षा अधिक होऊ लागतो. जे दिसण्यात फार कुरूप असते.
- लव्हेंडर तेल शरीरात एस्ट्रोजन (मादी हार्मोन) चे प्रमाण वाढवते आणि एड्रोजन (पुरुष हार्मोन) कमी करते. म्हणून पुरुषांनी गरजेपेक्षा जास्त लव्हेंडर तेलाचा वापर करू नये.
- काही लोकांना लव्हेंडर तेलाच्या सुगंधा चे दुष्परिणाम होऊ शकतात. जसे मळमळ, उलटी आणि पचन क्रिया संबंधि समस्या.
- गरोदर असलेल्या महिलांना लव्हेंडर तेलाचा उपयोग न करण्याची सल्ला दिली जाते. म्हणून गर्भवती स्त्रियांनी या तेलाचा वापर करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
तर मित्रांनो ह्या लेखात आपण आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या सुगंधित आणि मनमोहक लॅव्हेंडर तेलाची माहिती प्राप्त केली. हा लेख वाचल्यानंतर आपणास lavender oil in marathi बद्दल माहिती मिळाली असेल व आशा आहे की आपण नक्की lavender oil चा उपयोग कराल. जर आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हास कमेन्ट करून विचारू शकतात. तसेच विविध विषयांवरील आरोग्यासबंधी माहिती प्राप्त करीत राहण्यासाठी “माझी काळजी” या वेबसाइट ला भेट देत रहा. धन्यवाद..
अधिक माहिती वाचा :
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा
- एरंडेल तेलाचे उपयोग आणि फायदे मराठी
- गुळवेल खाण्याचे फायदे आणि उपयोग
- कच्चा लसूण खाण्याचे फायदे
- पानफुटी वनस्पतीचे फायदे