कंबर दुखीवर घरगुती उपाय : कंबर दुखणे फक्त वृद्धावस्थेतील दुखणे नसून हे कोणत्याही वयात होऊ शकते. आज-काल तासन्तास ऑफिसच्या खुर्चीवर बसून राहणे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातील महिला व पुरुषांमध्ये देखील ही समस्या निर्माण होत आहे. कंबर दुखीमागे अनेक कारणे असू शकतात. परंतु जर दुखणे नॉर्मल असेल तर कंबर दुखीवर घरगुती उपाय करून दुखणे कमी केले जाऊ शकते. आजच्या या लेखात आपण कंबर दुखीवर घरगुती आयुर्वेदिक उपाय आणि कंबर दुखी व्यायाम व योगासन ची माहिती प्राप्त करणार आहोत.
कंबर दुखी ची कारणे | kambar dukhi chi karne
सामान्य कंबर दुखी ची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात-
- अधिक जड वस्तू उचलणे.
- अचानक एक झटका लागून उठणे.
- चुकीच्या मुद्रेत मध्ये उभे राहणे किंवा बसणे.
- अधिक तणाव करणे
- एक्सीडेंट मध्ये मार बसणे.
कंबर दुखीवर घरगुती उपाय | kambar dukhi upay in marathi
आता आपण कंबर दुखण्यावर घरगुती उपाय पाहूयात. पुढील उपाय अचानक होणाऱ्या सामान्य कंबरदुखीसाठी आहेत.
1) लव्हेंडर तेल
एन सी बी आय द्वारे करण्यात आलेल्या शोधात हे लक्षात आले आहे की अरोमा थेरेपी करीत असताना लॅव्हेंडर तेलाचे उपयोग कंबर दुखी ची समस्या कमी करण्यात उपयोगी आहे. कंबर दुखी मध्ये लॅव्हेंडर तेलाचे उपयोग करण्यासाठी ज्या ठिकाणी दुखत असेल तेथे लव्हेंडर तेलाचे तीन ते चार थेंब लावुन हलक्या हाताने मालिश करावी. हा प्रयोग आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावा. लॅव्हेंडर तेलाचे फायदे <<येथे वाचा
2) योग्य पोश्चर
तुमच्या बसण्याची योग्य मुद्रा पाठीचे दुखणे कमी करण्यात सहाय्यक ठरू शकते. जेव्हाही खुर्ची वर बसाल तेव्हा पाठीला सपोर्ट असायला हवा. दोन्ही हात ठेवण्यासाठी देखील टेका असावा. प्रत्येक एक तासानंतर खुर्चीवरून उठून शरीराच्या स्थितीत थोडे बदल करावे. स्ट्रेचिंग व हलक्या एक्सरसाईज करून शरीर रिफ्रेश करावे. काम करण्याची तुमची जागा आरामदायी असायला हवी. अचानक वाकण्यापासून वाचावे.
3) झोपण्याची योग्य पद्धत
आपल्या झोपण्याच्या पद्धतीत बदल करावे. शरीराचे संपूर्ण वजन पाठीवर आणि कमरेवर टाकुन न झोपता. एका कानिवर झोपावे.
4) मानसिक तणाव कमी करावा
अत्याधिक तणाव आणि टेन्शन घेतल्याने कंबर आणि पाठीचे दुखणे वाढते. म्हणून ज्या लोकांना ही समस्या असेल त्यांनी कमीत कमी तनाव करायला हवा. योग, ध्यान आणि दीर्घ श्वास घ्यावेत असे केल्याने अनावश्यक तणाव कमी करण्यास मदत मिळेल.