होमिओपॅथी म्हणजे काय ? Homeopathy information in marathi : होमिओपॅथी जर्मनी मध्ये सन 1796 मध्ये डॉ सैमुअल हैनीमैन द्वारे शोधण्यात आलेली एक औषधीय चिकित्सा प्रणाली आहे. संस्कृत भाषेत या तऱ्हेच्या उपचार प्रणाली ला “सम: समं समयति” किंवा “विषस्य विषमौषधम्” म्हटले जाते. याचा अर्थ “विष हेच विष” ला कापते असा होतो.
अनेकांना शंका असते की होमिओपॅथी म्हणजे काय ? व होमिओपॅथी चे फायदे आणि औषध उपचार कसा आहे. म्हणूनच आजचा हा लेख आम्ही homeopathy information in marathi या विषयावर आधारित लिहिलेला आहे.
Table of Contents
होमिओपॅथी म्हणजे काय ?
कुठलाही आजार झाला तर आपला कल हा ऑलोपेथी डॉक्टरकडे असतो, आणि ते स्वाभाविक देखील आहे. उपचार लवकर होतो व व्यक्ती लवकर बरी होते. पण अनेकदा एलॉपथी औषधांचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. म्हणून आजकाल उपचारासाठी वापरण्यात येणारी आयुर्वेदिक उपचार पद्धतीसोबतच सर्वात सोयीस्कर व आरोग्याला चांगली अशी होमिओपॅथी ही एक उपचार पद्धत आहे.
होमिओपॅथी ही आजार समूळ नष्ट करते तसेच या औषधामुळे दुष्परिणाम देखील होत नाहीत. शिवाय औषधी घेणाऱ्याला औषधाची सवय होत नाही. होमिओपॅथी ही उपचार पद्धती मनोरचनेवर काम करते. म्हणून होमिओपॅथीचे औषध देताना रोग्याचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात.
होमिओपॅथी चा इतिहास
होमिओपॅथीचा शोध साधारणपणे 200 वर्षांच्या आधी म्हणजेच सन 1976 मध्ये जर्मनीत लागला.सॅम्युअल हॅनिमेन हे होमिओपॅथीचे जनक होते.भारतात सर्वात आधी होमिओपॅथी ही बंगाल मध्ये आली त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या काळात महाराष्ट्रात होमिओपॅथी दाखल झाली. महाराजांवर होमिओपॅथी चे उपचार केले गेले त्यानंतर महाराष्ट्रात पाहिले होमिओपॅथी रुग्णालय सुरू केले. पण त्याकाळी भारतात होमिओपॅथिक औषधांचा तुटवडा असल्यामुळे होमिओपॅथीचा पाहिजे तसा विकास झाला नाही.
होमिओपॅथी औषध उपचार
होमिओपॅथी मध्ये औषधी दिली जाते ती काहीशी त्या रोगांना आजारांना समान अशी दिली जाते. म्हणजेच आजाराला कारक असा घटक शरीरात टाकून त्याद्वारे आजार बरा केला जातो.