This article written on flaxseed meaning in marathi and what is the flax seeds in marathi. flax seeds are also known as alsi seeds, so we will also see the alsi seeds meaning in marathi. make sure you share this article with others.
flax seeds in marathi : अनियमित खान-पान मुळे कळत-नकळत अनेक घातक रोग शरीराला विळखा घालतात. अश्यात घरात असलेले अनेक आयुर्वेदिक पदार्थ उपयोगी ठरू शकतात. सहज उपलब्ध होणारे जवस चे बी हे अनेक जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध असलेले बीज आहे. आज या लेखात आपण जवस ची माहिती (flax seeds in marathi) व जवस खण्याचे फायदे पाहणार आहोत.
जवस काय आहे ? Flax seeds in marathi
जवस ला आळशी देखील म्हटले जाते. हिंदी भाषेत अलसी म्हणून ओळखले जाणारे हे बी एक आयुर्वेदिक जडीबुटी आहे, ज्याचा उपयोग औषधी रूपात केला जातो. जवस समशीतोष्ण प्रदेशात आढळते. जवस चे बी तेल काढण्यासाठी वापरले जातात. इंग्रजीत यांना flax seeds म्हटले जाते. यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात म्हणूनच आयुर्वेदात याला प्रभावी औषध म्हटले गेले आहे.
जवस खाण्याचे फायदे – Flax Seeds Benefits in Marathi
जवस/आळशी मध्ये भरपूर प्रमाणात फायबर, मॅग्नीज, थायामिन आणि मॅग्नेशियम सारखे मिनरल्स असतात, म्हणून जवस आपल्या आरोग्यासाठी विविध पद्धतीने फायदेशीर असते.
- हृदय रोगासाठी जवस चे फायदे
जवस मध्ये हृदय स्वास्थ्यवर्धक पोषक तत्व असतात जे आपल्याला Heart रोगांपासून दूर ठेवतात. यामध्ये असलेले monounsaturated, polyunsaturated आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड हृदय स्वास्थासाठी महत्त्वपूर्ण असतात.
रक्तदाब कमी करणे, वजन कमी करणे आणि हृदयाची धकधक सामान्य ठेवणे इत्यादी गोष्टींमध्ये जवस उपयोगी आहे. यामध्ये आढळणारे lignan हृदय मधील नसांचे कार्य सुरळीत ठेवते. - डोकेदुखीचा समस्येत जवसाचे फायदे
जर आपण आज-काल डोकेदुखीच्या समस्येपासून त्रस्त असाल तर एक सोपा घरगुती उपाय करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता. डोकेदुखी पासून आराम मिळण्यासाठी जवसचा उपयोग पुढीलप्रमाणे केला जाऊ शकतो. यासाठी जवस च्या बियांना थंड पाण्यात कुटून लेप बनवावा व या लेप ला डोके तसेच सूज असलेल्या जागी लावावे. या उपायाने डोकेदुखी दूर होईल. - सर्दी खोकल्यावर जवसचे उपयोग
वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकला होणे सामान्य आहे. या समस्येचा उपाय म्हणून जवस स्वच्छ करून कमी आग व गॅस वर तवाच्या मदतीने भाजून घ्यावे, जेव्हा यातून सुगंध येऊ लागेल तेव्हा तिला बारीक कुटून घ्यावे. आता या मध्ये मिश्री (Sugar Canday) टाकावी. सर्दी खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी आपण 5 ग्रॅम जवस सकाळ संध्याकाळ गरम पाण्यासोबत घेऊ शकतात. - पचन शक्तीत सुधार
जवस मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते जे पचन संबंधित समस्या दूर करून आतड्यांमधील सुजन देखील कमी करते. बद्धकोष्टतेची समस्या असणाऱ्या लोकांना जवसचे अनेक फायदे आहेत. नियमितपणे जवस खाल्ल्याने ऍसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता दूर होते. यासोबतच पचनक्रिया सुधारते आणि शारिरीक स्वास्थ्य निरोगी राहते.
जवस चे नुकसान / दुष्परिणाम
- गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी जवस खाणे टाळावे.
- जर आपण रक्त पातळ करणारे औषध घेत असाल तर जवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खावे.
- मधुमेहाचे औषध घेणाऱ्यांनी देखील जवस चे सेवन डॉक्टरांच्या परवानगीशिवाय करू नये.
- जवस मध्ये उच्च प्रमाणात फायबर असते. म्हणून निरोगी रहण्यासाठी जवसचे सेवन योग्य प्रमाणात करावे, जास्त सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम आतड्या आणि पायांवर होऊ शकतात.
जवस केव्हा खावे
अनेक लोकांच्या मनात प्रश्न असेल की जवस कसे आणि केव्हा खावे ? जवस व्यवस्थित पद्धतीने चावून न खाल्ल्यास ती न पचता शरीरा बाहेर पडते. म्हणून शक्य होईल तेवढे चावून तसेच बारीक कुटलेली जवस खावी. जवस खाण्याचा अजून एक विकल्प हा आहे की आपण आपले अन्न शिजवण्याचे नेहमीचे तेल बदलून जवस चे तेल वापरू शकता. याशिवाय जवस ची पोळी, पराठा, पुरी, पाव, मिठाई, सुप, सलाद इत्यादी पद्धतीने आपण सेवन करू शकतात.
तर मित्रहो या लेखात आपण जवस काय आहे (flaxseed meaning in marathi) व जवस खाण्याचे फायदे (flax seeds in marathi) याबद्दलची माहिती मिळवली. आशा आहे की ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. या माहितीला आपले मित्र व कुटुंबियांसोबत शेअर करून त्यांनाही मदत करा. व आरोग्य आणि विविध रोगांवरील घरगुती उपाय वाचण्यासाठी आमची वेबसाइट माझी काळजी ला भेट देत राहा. धन्यवाद….
जवस कहा मिलेगा