paracetamol tablet uses in marathi : paracetamol ही दुखणे दूर करणारी एक प्रसिद्ध टॅब्लेट स्वरूपातील औषध आहे. ह्या औषधींचा प्रमुख उपयोग दुखणे दूर करणे आणि ताप कमी करण्यासाठी केला जातो. आजच्या या लेखात पॅरासिटामोल चा उपयोग कसा करावा (paracetamol tablet uses in marathi) व या औषधीच्या वापरा बद्दल काही महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे.
Table of Contents
Paracetamol Tablet काय आहे ?
पॅरासिटामोल ही शारीरिक दुखणे दूर करणारी टॅब्लेट स्वरूपातील एक औषधी आहे. या औषधी चा उपयोग प्रामुख्याने ताप आणि शरीरातील दुखणे दूर करण्यासाठी केला जातो. शरीरात काही रसायने असतात ज्यांना प्रोस्टाग्लैंडीन म्हटले जाते हे पदार्थ शरीरात आजार व शारीरिक वेदणेला कारणीभूत असतात. पॅरासिटामोल या पदार्थाचे स्त्रवण आणि उत्पादन नियंत्रणात आणते व ज्यामुळे ताप आणि दुखणे काही काळासाठी कमी होते.
पॅरासिटामॉल चे फायदे व उपयोग – Paracetamol Tablet Uses in Marathi
पुढील समस्यांमध्ये पॅरासिटामॉल उपयोगी ठरते. Paracetamol Tablet Uses in Marathi पुढील रोगांमध्ये उपयुक्त आहे.
- ताप
- दुखणे
- पाठीच्या खालील भागात दुखणे
- डोके दुखणे
- दात दुखणे
- मायग्रेन
- सर्दी-खोकला
- ऑपरेशन नंतर चे दुखणे
पॅरासिटामॉल चा डोस व वापर – paracetamol uses in marathi
- औषध घेण्याआधी पॅकेटमध्ये देण्यात आलेली मॅन्युफॅक्चर ची सूचना जरूर वाचावी. ह्या सूचनेत पॅरासिटामोल कशी घ्यावी व तिचे साईड-इफेक्ट देण्यात आलेले असतात.
- डॉक्टरांनी जेवढ्या प्रमाणात सांगितले आहे तेवढ्याच प्रमाणात पॅरासिटामोल औषध घ्यावी.
- पॅरासिटामॉल औषध जेवणानंतर घेतली जाऊ शकते.
- गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्यावी.
- जर तुम्हाला यकृताची समस्या आणि नियमित मद्यपान करण्याची सवय असेल तर हे औषध घेणे टाळावे.
पॅरासिटामॉल चा डोस विविध वयोगटातील लोकांसाठी पुढील प्रमाणे आहे.
- 16 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांनी 4 ते 6 तासानंतर 500 मिली ग्रॅम ते 1 ग्रॅम एवढा डोस घ्यावा. ह्या वयोगटातील लोकांनी दिवसातून 4 ग्रॅम पेक्षा जास्त डोस घेऊ नये.
- 12 ते 15 वयोगटातील मुलांनी दररोज 4 ते 6 तासानंतर 480 ते 750 मिलीग्राम एवढा डोस घ्यावा. ह्या डोस चे जास्तीत जास्त चार खुराक घ्यावेत.
- 10 ते 15 वयोगटातील लहान मुलांनी दररोज दिवसातून 4 ते 6 तासानंतर 480-500 मिलिग्रमचे जास्तीत जास्त चार खुराक घ्यावेत.
- 8 ते 9 वयोगटातील लहान मुलांनी दररोज 4 ते 6 तासानंतर 360 ते 375 मिलीग्राम एवढा डोस घ्यावा. ह्या डोस चे जास्तीत जास्त चार खुराक घ्यावेत.
- 6 ते 7 वयोगटातील लहान मुलांनी दररोज 4 ते 6 तासानंतर 240 ते 250 मिलीग्राम एवढा डोस घ्यावा. ह्या डोस चे जास्तीत जास्त चार खुराक घ्यावेत.
- 4 ते 5 वयोगटातील लहान मुलांनी दररोज 4 ते 6 तासानंतर 240 मिलीग्राम एवढा डोस घ्यावा. ह्या डोस चे जास्तीत जास्त चार खुराक घ्यावेत.
- 2 ते 3 वयोगटातील लहान मुलांनी दररोज 4 ते 6 तासानंतर 180 मिलीग्राम एवढा डोस घ्यावा. ह्या डोस चे जास्तीत जास्त चार खुराक घ्यावेत.
- 6 महिने ते 1 वर्ष वयोगटातील लहान मुलांनी दररोज 4 ते 6 तासानंतर 120 मिलीग्राम एवढा डोस घ्यावा. ह्या डोस चे जास्तीत जास्त चार खुराक घ्यावेत.
कॉम्बिफ्लेम tablet uses in marathi <<येथे वाचा
पॅरासिटामोल चे साइड इफेक्ट, दुष्परिणाम व नुकसान
काही प्रकरणांमध्ये काही लोकांसाठी पॅरासिटामॉल औषध घेण्याचे पुढील दुष्परिणाम पाहावयास मिळू शकतात. जर आपणास देखील हे साइड एफेक्टस दिसत असतील तर टॅब्लेट घेणे थांबवून लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क करावा.