दात पांढरे करण्याचे उपाय : हास्य व्यक्तीच्या भावना व्यक्त करते. परंतु जर आपले दात पिवळे असतील, डाग पडलेले असतील तर नकळतच आपला आत्मविश्वास देखील कमी होतो. दातांकडे योग्य लक्ष न दिल्याने अनेकांचे दांत पिवळे पडू लागतात. २०२० मध्ये जवळपास ४० दशलक्ष लोकानी दांत स्वच्छ करण्यासाठी Teeth Whitener चा वापर केला. पण ही पद्धत सर्वानाच परवडेल असं नाही.
म्हणून आजच्या या लेखात आपण दात पिवळे होण्याची कारणे आणि दात पांढरे करण्याचे उपाय जाणून घेणार आहोत सोबतच उत्तम आरोग्यासाठी दातांची काळजी कशी घ्यावी याबद्दल देखील जाणून घेऊया. दात पांढरे शुभ्र करण्यासाठी उपाय जाणून घेण्याआधी दात पिवळे होण्याची कारणे पाहूया..
दात पिवळे का होतात ?
दाताच्या सर्वात बाहेरच्या थराला इनॅमल (Enamel) म्हणतात. इनॅमल च्या आतमध्ये एक प्रकारची उती असते, या उतीला डेंटिन (Dentin) म्हणतात. या उतीचा रंग मुळातच पिवळा असतो. इनॅमल म्हणजेच दातांच्या सर्वात बाहेरील थर जेव्हा पातळ आणि कमजोर होत जातो तेव्हा डेंटिन या पिवळ्या उतीमुळे दात पिवळे दिसू लागतात.
आता हे इनॅमल पातळ होण्याची सुद्धा बरीच कारणे असू शकतात. जसे की,
- आनुवंशिक कारणे (Genetics): आपल्याला आनुवंशिकतेमुळे मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टीप्रमाणे इनॅमल चे पातळ किंवा जाड असणे हेसुद्धा आनुवंशिकतेवर अवलंबून असते.
- मद्यपान करणे (Alcohol): मद्यपान केल्याने सुद्धा इनॅमल पातळ होते ज्यामुळे दात लवकर पिवळे होतात.
- धूम्रपान करणे (Smoking): सिगारेट मध्ये असणारे Nicotine आणि Tar यामुळे दातांवर डाग पडतात व दात पिवळे देखील होतात.
- वय (Aging): जसे जसे वय वाढत जाते तसे तसे इनॅमल पातळ होत जाते ज्यामुळे वयानुसार सुद्धा दात पिवळे होतात.
- दातांची स्वच्छता न ठेवणे (Bad Oral Hygiene): नियमित दात न घासल्यामुळे दातांवर बॅक्टीरिया जमा होतात, आणि त्यामुळेही दात पिवळे होतात.
- योग्य आहार न घेणे (Bad Diet): योग्य आहार हा दातांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. योग्य आहार न घेतल्याने दात पिवळे होतात.
दात पांढरे करण्याचे उपाय
आता आपण घरच्याघरीच नैसर्गिकरीत्या दात पांढरे कसे करावे यासाठी दात पांढरे करण्याचे उपाय जाणून घेऊयात.
- आंब्याची पाने : आपल्या सर्वाना आंबा खायला आवडतो. पण आंब्याची पाने सुद्धा आपल्या दातांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. दात पांढरे करण्यासाठी एक ताजे आंब्याचे पान घ्यावे. त्याला पाण्याने स्वच्छ करावे. नंतर ते पान दातांवर घासावे किंवा दातांनी चावावे. व काही मिनिटानंतर थुंकुन द्यावे. आंब्याच्या पानात असलेले Mangiferin दात पांढरे करण्याचे काम करते. आंब्याची पाने दात पांढरे करण्याचा प्रभावी उपाय आहेत.
- मीठ आणि लिंबाचा रस : दात पांढरे करण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी एक चमचा मीठ घ्यावे आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करून एक जाड पेस्ट बनवावी. या पेस्टने दातांना ब्रश करावा. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन तीन वेळ करू शकता.
- कडूनिंब : दात स्वच्छ करण्यासाठी कडूनिंबाच्या फांद्या वापरणे ही भारतातील सर्वात पारंपरिक पद्धत आहे. जर तुम्ही ग्रामीण भारतात गेलात, तर आजही लोक तुम्हाला रोज सकाळी दात घासण्यासाठी कडूनिंबाचा उपयोग करताना दिसतील. कडूनिंबामध्ये अझाडिराक्टिन नावाचे महत्त्वाचे फायटोकेमिकल असते. हे एक अतिशय प्रभावी अँटी-मायक्रोबियल एजंट आहे, जे जंतूंना दूर ठेवते. दातांवरील डाग व पिवळेपण कमी करण्यासाठी कडुनिंब हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
- स्ट्रॉबेरी (Strawberries) : हा सर्वात प्रभावी आणि सोपा उपाय आहे ज्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट लागेल ती म्हणजे स्ट्रॉबेरी. हा उपाय करण्यासाठी फक्त एक स्ट्रॉबेरीची चमच्याने पेस्ट बनवावी व रोज दात घासताना ही पेस्ट थोडीशी Toothpaste सोबतच लावावी आणि नेहमीप्रमाणे ब्रश करावा. हा उपाय नियमितपणे एक आठवडा जरी केला तरी तुमचे दात मोत्याप्रमाणे चमकू शकतात. स्ट्रॉबेरीमध्ये नैसर्गिकरीत्या मॅलिक अॅसिड (Malic Acid) असते ज्यामुळे दात पांढरे होतात.
- केळ्याची साल : केळ्याचे फळ अनेक पोषक पदार्थांनी भरलेले असते. केल्याच्या सालीचा उपयोग देखील दांत स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. यासाठी केळ्याचे एक साल घेऊन त्याच्या पांढऱ्या बाजूने साल दातांवर 2 ते 3 मिनिटे घासावी. यानंतर 15 मिनिटे दात तसेच सोडून द्यावेत. 15 मिनिटानंतर एखाद्या चांगल्या टूथपेस्ट ने दांत स्वच्छ धुवावेत. हा उपाय फक्त 2 ते 3 आठवडे केल्यास दातांवर चांगला प्रभाव दिसू लागेल.
तर हे होते दात पांढरे करण्याचे काही उपाय या उपायांचा अवलंब करा आणि तुमचे दात मजबूत, पांढरे आणि चमकदार बनवा. म्हणजे पुढच्या वेळी सेल्फी काढताना तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण हास्य करू शकाल. आपणास दात पांढरे करण्याचे उपाय कसे वाटले कमेन्ट करून नक्की सांगा, आपले काही प्रश्न असतील तर ते देखील विचारा. दातांची काळजी कशी घ्यावी ही माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद..
Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा