अभयारिष्ट चे फायदे व Abhayarishta uses in marathi अभयारिष्ट ही एक आयुर्वेदिक औषध आहे. शारीरिक आरोग्यासाठी अभयारिष्ट च्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. विशेष करून पोटाच्या रोगांमध्ये अभयारिष्ट अत्यंत उपयोगी आहे.
आजच्या या लेखात आपण अभयारिष्ट काय आहे, Abhayarishta uses in marathi व अभयारिष्ट चे फायदे काय आहेत याविषयीची मराठी माहिती पाहणार आहोत.
Table of Contents
अभयारिष्ट म्हणजे काय ?
अभयारिष्ट सिरप एक आयुर्वेदिक हर्बल टॉनिक आहे. याचा उपयोग तुम्ही अनेक रोगांमध्ये करू शकतात. अभयारिष्ट सिरप चा उपयोग मुख्यतः पोटाशी संबंधित समस्यांमध्ये केला जातो. याच्या सेवनाने गॅस होणे, बद्धकोष्टता, पोट फुगणे, मुळव्याध इत्यादी समस्यांसाठी केला जातो.
अभयारिष्ट हे नाव दोन शब्दापासून बनले आहे. अभय आणि अरिष्ट. अभय हा एक संस्कृत शब्द आहे याचा मराठी अर्थ हिरडा होतो. हिरडा हे एक औषधी फळ आहे. उत्तर भारतात हे औषध मोठ्या प्रमाणात मिळते. यालाच हिंदीत हरड देखील म्हटले जाते. अभयारिष्ट मध्ये हिरडा चे गुणधर्म असतात.
अभयारिष्ट चे फायदे
अभयारिष्ट सिरप चे फायदे पुढीलप्रमाणे आहेत –
- बद्धकोष्ठतेच्या समस्येत
आज-काल पोट साफ न होणे ही समस्या फार जास्त प्रमाणात वाढली आहे. पोट व संडास साफ होण्यासाठी उपाय अनेक लोक शोधत असतात. अनियमित भोजन, असंतुलित जीवन शैली ही यामागील प्रमुख कारणे आहेत.
अभयारिष्ट सिरप बद्धकोष्टतेची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी आहे.याच्या सेवनाने आतड्यांमध्ये असलेला मल हळूहळू शरीराबाहेर निघायला लागतो व आतड्या पूर्णपणे स्वच्छ आणि निरोगी होतात. यासोबतच पचनसंस्था देखील सुधारायला लागते. - मुळव्याध साठी अभयारिष्ट चे फायदे
मुळव्याध होण्याचे प्रमुख कारण व्यवस्थित पचन न होणे असते. पोट साफ न झाल्याने मूळव्याध ची समस्या वाढू लागते. म्हणून मूळव्याध वर आराम मिळवण्यासाठी अभयारिष्ट चा उपयोग केला जाऊ शकतो. - पचन क्षमता वाढवते
अभयारिष्ट सिरप खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित करण्यासाठी उपयोगी आहे. याच्या सेवनाने पोट दुखणे, पोटात गॅस होणे, पोटातील किडे इत्यादी समस्या दूर होतात. व यासोबतच शरीराची पचन करण्याची क्षमता देखील सुधारते.
नियमित अभयारिष्ट घेतल्यास भूक देखील वाढते. भूक वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी डॉक्टर देखील अभयारिष्ट सिरप सेवन करण्याची सल्ला देतात.
Abhayarishta uses in marathi : अभयारिष्ट चा उपयोग
अभयारिष्ट चे सेवन रोगीच्या शारीरिक अवस्थेनुसार वेगवेगळे असू शकते. म्हणून जर आपणास रोगाचा गंभीर त्रास असेल तर औषध घेण्याआधी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.