शतावरी कल्प चूर्ण चे फायदे मराठी | shatavari kalpa benefits in marathi

शतावरी कल्प चे फायदे मराठी मध्ये – shatavari kalpa benefits in marathi : निरोगी आरोग्य प्राप्त करण्यासाठी आयुर्वेदात अनेक वेगवेगळ्या जडीबुटी उपयोगात आणल्या जातात. शतावरी ही त्यापैकीच एक आहे. आपल्यामधील अनेक लोकांनी शतावरी चे नाव ऐकले असेल. परंतु शतावरी चे फायदे काय आहेत व शतावरी चूर्ण कसे घ्यावे त्याचा उपयोग कसा केला जातो या विषयीची माहिती आपणास कदाचित नसेल.

आजच्या लेखात आपण शतावरी काय आहे, शतावरी कल्प पावडर चे फायदे – shatavari kalpa benefits in marathi व विविध रोगात शतावरी चा उपयोग कसा करायला हवा याविषयीची माहिती पाहणार आहे.

shatavari kalpa benefits in marathi

शतावरी काय आहे ?

शतावरी एक आयुर्वेदिक जडीबुटी आहे जी आपल्या आयुर्वेदिक गुणधर्मां साठी जगभरात प्रसिद्ध आहे. शतावरी च्या रोपाच्या उपयोग अनेक औषधी बनवण्यासाठी केला जातो. शतावरी तीन रंगांमध्ये आढळते ज्यामध्ये पांढरा हिरवा आणि जांभळा रंग समाविष्ट आहे. शतावरी चा उपयोग अनेक शारीरिक समस्यांसाठी केला जातो. शतावरी कल्प हे चूर्ण च्या रूपात उपलब्ध असते. व हे आपणास कोणत्याही आयुर्वेदिक अथवा ऑनलाइन स्टोर्स मधून मिळून जाईल.

शतावरी चे फायदे | shatavari kalpa benefits in marathi

शतावरी जडीबुटी चा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. पुढे आपल्या शरीरासाठी शतावरी कशा पद्धतीने उपयोगी राहील याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

गर्भवती महिलांसाठी शतावरी चे फायदे

shatavari kalpa benefits in marathi: गर्भावस्थे दरम्यान शतावरी चा उपयोग केला जाऊ शकतो. यामध्ये असलेले फोलेट गर्भवती महिलेच्या शरीरात फोलेट ची पूर्णतः करते. फोलेट हे एक आवश्यक पोषक तत्व असते, जे गर्भवती महिलेसोबतचा तिच्या गर्भात असलेल्या भ्रूण च्या आरोग्यासाठी देखील आवश्यक असते.

गर्भवती महिलेने शतावरी, सौंठ, अश्वगंधा, ज्येष्ठमध व भूंगराज इत्यादींना एकत्रित करून त्यांचे चूर्ण बनवावे व ते चूर्ण 1 ते 2 ग्राम इतक्या प्रमाणात घेऊन बकरीच्या दुधासोबत सेवन करावे. असे केल्याने गर्भावस्थेतील शिशू चे स्वास्थ्य चांगले राहते हे चूर्ण दररोज पाच ग्रॅम पेक्षा जास्त सेवन करू नये व याशिवाय याविषयी एकदा डॉक्टरांशी चर्चा देखील नक्की करावी.

स्तनात दूध वाढवण्यासाठी शतावरी

अनेक महिला आई झाल्यावर त्यांना स्तनात दूध न येण्याची समस्या असते. अश्या स्थितीत महिला 10 ग्राम शतावरी जड चे चूर्ण दुधासोबत सेवन करू शकतात. असे केल्यास त्यांच्या स्तनात दुधाची वृद्धि होऊ लागेल. महिलांसाठी शतावरी चे अनेक फायदे आहेत म्हणून डिलीवरी झाल्यावर त्यांना शतावर सेवनाचा सल्ला दिला जातो.

शारीरिक कमजोरी व लैंगिक शक्ती ची कमतरता

  • ज्या लोकांचे शरीर कमजोर आहे व ज्यांना शारीरिक कमजोरी चा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी शतावरी उपयोगी औषध आहे. या जडीबुटी च्या उपयोगाने लैंगिक क्षमता वाढवता येते. दुधा सोबत दररोज शतावरी चूर्ण सेवन केल्याने किंवा खीर बनवून खाल्ल्याने stamina आणि शारीरिक क्षमता वाढते.
  • ज्या पुरुषांना वीर्य शक्ती ची कमी असेल त्यांनी 5 ते 10 ग्राम शतावरी दररोज तुपा सोबत सेवन करावी असे केल्याने वीर्यात वृद्धी होते.

अनिद्रेच्या समस्येत शतावरी चे फायदे

  • अनिद्रेची समस्या पुरुष व महिला दोन्ही मध्ये पहावयास मिळते. जर आपणही या समस्येपासून त्रस्त असाल तर शतावरी चूर्ण तुम्हाला यामध्ये लाभदायक सिद्ध होऊ शकते.
  • ज्या लोकांना झोप न येण्याची समस्या असेल त्यांनी 2-4 ग्राम शतावरी चूर्ण दुधात गरम करून घ्यावे. यानंतर यामध्ये थोडे तूप टाकून सेवन करावे असे केल्यास झोप न येण्याची समस्या दूर होते.

मूत्र व किडनी रोगात शतावरी चे फायदे

  • शतावरी एक नैसर्गिक मूत्र वर्धक आहे. जे शरीरात असलेले मीठ मिश्रित तरल पदार्थांना बाहेर काढण्याचे कार्य करते. शतावरी किडनी संबंधित रोगांमध्ये देखील कामात येते.
  • मूत्र संबंधित समस्यांमध्ये 10-30 मिली शतावर जड चा काढा बनवून त्यामध्ये मध आणि साखर मिश्रित करून प्यावे.

शतावरी कल्प / शतावरी चूर्ण कसे घ्यावे

शतावरी चूर्ण सेवन करण्यासाठी आपण अश्वगंधा आणि शतावरी चूर्ण चे 100-100 ग्रॅम पॅकेट मिक्स करून, त्यांना दररोज दिवसातून दोन वेळा अर्धा चमचा म्हणजेच 5 ग्राम पर्यंत गरम दुधासोबत पिऊ शकतात. यासोबतच नियमित व्यायाम आणि योग केल्यास शरीर भक्कम बनते.

शतावरी चूर्ण, कल्प आणि पाऊडर खरेदी

तर हे होते शतावरी कल्प चे फायदे – shatavari kalpa benefits in marathi व शतावरी विषयीची काही उपयुक्त माहिती. आशा आहे आपणास ही माहिती आवडली असेल. शतावरी फायदे हा लेख इतरांसोबत नक्की शेअर करा.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *