अक्रोड खाण्याचे फायदे | walnut meaning & benefits in marathi

walnut in marathi : सुका मेवा मध्ये समाविष्ट असलेले अक्रोड हे एक स्वादिष्ट फळ असण्यासोबतच आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. आहारात नियमित अक्रोड सामील केल्यास आरोग्य चांगले राहते. अक्रोड मध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. याला एनर्जी चे पावर हाऊस म्हणून देखील संबोधले जाते.

आजच्या या लेखात आपण अक्रोड खाण्याचे फायदे काय आहेत, अक्रोड ची किंमतwalnut meaning & benefits in marathi याची माहिती प्राप्त करणार आहोत.

walnut benefits in marathi

अक्रोड काय आहे? – what is walnut meaning in marathi

अक्रोड हे सुका मेवा मधील एक पदार्थ आहे. अक्रोड च्या झाडाचा इतिहास इसवी सन पूर्व 700 चा मानला जातो. चौथ्या शतकात रोम मधील लोकांनी अक्रोड ला युरोपीय देशांमध्ये आणणे सुरू केले व येथूनच या फळाचा विस्तार सुरू झाला. रोमन काळात या फळाला ईश्वराचे अन्न म्हणून ही संबोधले जायचे.

आज चीन, इराण, संयुक्त राज्य अमेरिका, मेक्सिको युक्रेन, चीली इत्यादी देशांमध्ये अक्रोड उगवले जाते. याशिवाय चीन हा विश्वातील सर्वात मोठा अक्रोडचा उत्पादक देश आहे. भारतात जम्मू काश्मीर, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेशाच्या उत्तरी आणि पूर्वोत्तर भागात अक्रोड उगवले जाते.

अक्रोड खाण्याचे फायदे – walnut benefits in marathi

  • हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी
    अक्रोड हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी आहे. यामध्ये अल्फा लीनोलेनिक अॅसिड असते जे ओमेगा 3 फॅटी ऍसिड चे एक रूप आहे. हे रक्ताच्या नसांमध्ये फॅट चे जमाव थांबवते व हृदयाची प्रणाली सुरळीत करते. याशिवाय ज्यांना उच्चरक्तदाबाची समस्या असते त्यांच्यासाठी देखील अक्रोड अत्यंत लाभकारी आहे.

  • मेंदूच्या आरोग्यासाठी अक्रोड चे फायदे
    एका संशोधनातून लक्षात आले आहे की अक्रोड मध्ये प्रचुर प्रमाणत असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड मेंदूच्या कार्य प्रणालीवर प्रभाव टाकते. सोबतच मेमरी पावर म्हणजेच स्मरणशक्ती वाढवते आणि तणाव कमी करते.

  • हाडांची बळकटी
    हाडांना मजबुती प्रदान करण्यासाठी अक्रोड चे सेवन केले जाऊ शकते. अल्फा लीनोलेनिक अॅसिड असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. अक्रोड मध्ये हे ॲसिड भरपूर प्रमाणात असते. म्हणून असेही मानले जाते की अक्रोड खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

  • वजन कमी करण्यासाठी अक्रोड चे फायदे
    अक्रोड वजन कमी करण्यासाठी मदतनीस सिद्ध होते. यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन फॅट्स कॅलरीज असतात. अक्रोड तुमची भूक नियंत्रित करते. एका शास्त्रीय संशोधनातून लक्षात आले आहे की अक्रोड चे सेवन वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून ज्यांना शरीराचे वजन कमी करून योग्य प्रोटीन ची कमतरता भरून काढायची असेल त्यांनी आजच अक्रोड खाणे सुरू करावे.

  • रोग प्रतिरोधक क्षमता वाढविण्यासाठी अक्रोड चे फायदे
    कोणत्याही रोगापासून लढण्याकरिता इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. ही क्षमता वाढविण्यासाठी अक्रोड उपयुक्त सिद्ध होते. अक्रोड मध्ये असलेले प्रोटीन इम्युन सिस्टम मजबूत करतात.

  • पाण्यात भिजून अक्रोड खाण्याचे फायदे
    निरोगी राहण्यासाठी दररोज सकाळी दोन ते तीन पाण्यात भिजवलेले अक्रोड खाण्याचे अनेक लाभ आहेत.

    जर आपण कॅन्सरसारख्या रोगापासून लढत असाल तर रोज सकाळी पाण्यात भिजवून ठेवलेले अक्रोड जे सेवन सुरू करा. याच्या सेवनाने स्तन कॅन्सर आणि पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सर पासून बचाव होतो.

    रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले अक्रोड सकाळी खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. रात्रभर भिजवलेल्या या अक्रोड मध्ये पोषक तत्व वाढून गेलेले असतात, जर आपल्याला डायबिटीस, बद्धकोष्ठता व इतर शारीरिक समस्या असेल तर आपण नियमित अक्रोडचे सेवन करू शकतात.

अक्रोड खाण्याची योग्य पद्धत व अक्रोड चा उपयोग कसा करावा ?

  • दही, केळे आणि 3-4 अक्रोड एकत्रित करून यांचे घट्ट मिश्रण बनवावे व हे मिश्रण दररोज नियमितपणे सेवन करावे.
  • जेवणा सोबत असलेल्या सलाद मध्ये अक्रोड मिक्स करून त्याचे सेवन करावे.
  • चांगल्या आरोग्यासाठी रात्री झोपताना एक ग्लास दुधासोबत 3-4 अक्रोड खाणे सर्वात सोपी पद्धत आहे.
  • संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये अक्रोड भाजून खाल्ले जाऊ शकतात.
अक्रोड किंमत

अक्रोड ची खरेदी कोणत्याही सुका मेवा दुकानावरून केली जाऊ शकते. याशिवाय आपण ऑनलाइन देखील अक्रोड खरेदी करू शकतात. अक्रोड ची किंमत पाहता ती प्रत्येक ब्रॅंड नुसार वेगवेगळी असू शकते. भारतात आपणास एक किलो अक्रोड 700 ते 1200 रुपयांपर्यंत मिळून जाईल. 700 रुपयांच्या किमतीत नटराज कंपनीचे प्रतिष्ठित अक्रोड खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

तर हे होते अक्रोड खाण्याचे फायदे – walnut in marathiwalnut benefits in marathi. आशा आहे आपणास ही माहिती उपयुक्त ठरली असेल. या माहितीला इतरांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीचे ज्ञान मिळेल. आरोग्य, लाइफस्टाईल, लैगिक माहिती, घरगुती उपाय, हेल्थ इत्यादि विषयांवरील मराठी माहिती वाचत राहण्याकरीता माझी काळजी च्या या वेबसाइट ला भेट देत रहा. धन्यवाद..

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *