मांड्या कमी करण्याचे उपाय | how to reduce thigh fat in marathi

मांड्या कमी करण्याचे उपाय : शरीराच्या कोणत्याही भागावर असलेली अनावश्यक चरबी त्रासदायकच असते. पोट आणि कंबर यानंतर सर्वाधिक चरबी जर कोठे जमत असेल तर तो भाग म्हणजे मांड्या होय. आज अनेक लोक मांड्यांची वाढलेली चरबी पासून त्रस्त आहेत व मांड्या कमी करण्याचे घरगुती उपाय (how to reduce thigh fat in marathi) शोधत आहे. काही सोपे उपाय आणि व्यायाम नियमित करून आपण मांड्यांची चरबी कमी करू शकतात. मांड्या कमी करण्यासाठी उपाय कोणते आहेत याबद्दलची माहिती आपण आज मिळवणार आहोत..

मांड्या कमी करण्याचे उपाय – How to reduce thigh in marathi

जाड मांड्या कमी करण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे व्यायाम नियमित करणे आवश्यक आहे. पुढे काही घरगुती उपाय आणि व्यायाम देण्यात आले आहेत. ज्यांना करून आपण मांड्याची चरबी कमी करू शकतात.

रनिंग (पळणे)
मांड्या कमी करण्याचे उपाय म्हणून नियमित वेगाने चालणे आणि पळणे हे उत्तम व्यायाम आहेत. ज्यांच्या मांड्यांचे स्नायू अत्यंत जाड असतात त्यांनी आपल्या मांड्यांना योग्य आकार मिळवा म्हणून दररोज काही अंतर पळायला हवे.

मांड्या कमी करण्यासाठी साईड आणि क्रॉस ओव्हर लंजेस

मांड्या कमी करण्याचे उपाय
  • ही एक्झरसाइज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी सरळ उभे राहावे लागेल.
  • यानंतर दोन्ही पायामध्ये थोडे अंतर घ्यावे.
  • यानंतर आपल्या डाव्या पायाला उचलून उजव्या बाजूला न्यावे.
  • आता आपल्या डाव्या गुडघ्याला वाकून घ्यावे.
  • यानंतर आपल्या उजव्या गुडघ्यावर दोन्ही हात ठेवावेत.
  • यानंतर हीच प्रक्रिया उजव्या पायाने देखील करावी.

वन लेग सर्कल एक्झरसाइज

मांड्या कमी करण्याचे उपाय and how to reduce thigh fat in marathi
  • हा व्यायाम करण्यासाठी सर्वात आधी चटई वर सरळ झोपावे.
  • यानंतर आपल्या दोन्ही पायांना वाकून आपल्या दोन्ही हातांना कमरेवर ठेवावे.
  • यानंतर आपल्या एका पायाला वर उचलावे व हळुवार घड्याळाच्या दिशेने फिरवावे. यानंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पाय फिरवावा.
  • ही व्यायामाची प्रक्रिया दोन्ही पायांनी करावी. या एक्सरसाईज चे चार सेट लावावेत. एका सेट मध्ये पायाला 30 सेकंद पर्यंत फिरवावे.

पायी चालावे
मांड्या कमी करण्याचे उपाय मध्ये महत्वाचा उपाय म्हणजे शक्य होईल तेवढे पायी चालावे. जर आपण जवळपास कुठे जात असाल तर वाहन घेणे टाळावे व जास्तीत जास्त पायी फिरण्याचा प्रयत्न करावा. पायी चालल्याने पायांचा आणि मांड्यांचा चांगला व्यायाम होतो.

उभे राहावे
जर आपण काहीही काम करीत असाल तर प्रयत्न करा की ते काम उभे राहून केले जाईल. जास्तीत जास्त उभे राहण्याचा सराव करावा. जास्त वेळ उभे राहिल्याने कॅलरीज बर्न होतात. ज्यामुळे वाढलेले पायांचे वजन कमी होते. याउलट जर तुम्ही दीर्घकाळ बसून काम करीत असाल तर मांड्यांचे वजन अधिक वाढण्याची शक्यता असते.

सायकल वापरा
ऑफिस व कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी शक्य होईल तर सायकली चा वापर करावा. जर तुम्हाला जलद मांड्या बारीक करायच्या असतील तर नियमितपणे 8 ते 10 किलोमीटर सायकल चालवावी. सायकलिंग सुरू केल्यानंतर आपण आपल्या शरीरात अनेक सकारात्मक बदल पाहणार.

तर मित्रहो हे होते मांड्या कमी करण्याचे घरगुती उपाय आशा आहे की ही माहिती आपणास आवडली असेल. कायम निरोगी राहण्यासाठी उपाय हाच आहे की शरीराचे वजन संतुलनात असावे व शरीराचे वाढलेले वजन मांड्याचे वजन कमी करून देखील नियंत्रणात आणले जाऊ शकते.

अधिक वाचा

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *