रक्त हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय | how to increase hemoglobin in marathi

हिमोग्लोबिन व रक्त वाढीसाठी घरगुती उपाय आणि औषध – increase hemoglobin in marathi : हिमोग्लोबिन हा रक्तात असलेला एक आयरन युक्त प्रोटीन असतो. हिमोग्लोबिन ऑक्सिजन घेणे आणि त्याला शरीरातील सर्व भागांमध्ये पोहोचविण्याचे कार्य करते. हिमोग्लोबीन अर्थात शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यास ऍनिमिया होण्याचा धोका असतो. चुकीचे खानपान व लाईफस्टाईल पुढे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते.

आजच्या लेखात आपण रक्त वाढीसाठी औषधहिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय (how to increase hemoglobin in marathi) जाणून घेणार आहोत.

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

शरीरात हिमोग्लोबिन / रक्त किती असावे

 • पुरुषांमध्ये सामान्यपणे हिमोग्लोबिन अर्थात रक्ताचे प्रमाण 13.5 ते 17.8 ग्राम प्रति डेसी लिटर असायला हवे.
 • स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीन रक्ताचे प्रमाण सामान्यपणे 12 ते 15 ग्राम डेसी लिटर असायला हवे

हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे

शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन न मिळाल्याने हिमोग्लोबिनची कमतरता होऊ लागते. महिलांमध्ये गर्भवती झाल्यावर सामान्यपणे हिमोग्लोबिन च्या स्तरात कमी निर्माण होते. याशिवाय इतरही अनेक कारणे आहेत ज्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन अर्थात रक्ताचे प्रमाण कमी होते. रक्त कमी होण्याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

 • कॅन्सर
 • ल्युकेमिया
 • आयरन ची कमतरता
 • एच आय व्ही एड्स
 • जखमेतून अधिक प्रमाणात रक्त निघणे
 • अनुवंशिक समस्या
 • मुळव्याध
 • मासिक पाळीत अधिक रक्त जाणे
 • विटामिन ची कमतरता
 • नेहमी रक्तदान करणे
 • धूम्रपान करणे
 • अत्याधिक प्रमाणात व्यायाम करणे

हिमोग्लोबिन रक्त कमी होण्याची लक्षणे

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास पुढील लक्षणे पहावयास मिळू शकतात

 • डोकेदुखी
 • श्वास घेण्यात समस्या
 • चक्कर येणे
 • बैचेनी व चिडचिडेपणा
 • थकवा वाटणे
 • कमजोरी येणे
 • हात पाय थंड पडणे
 • हृदयाची धडधड वाढणे
 • त्वचेचा रंग हलका दिसू लागणे
 • हात आणि पायाची नखे कमजोर होणे
 • तोंडात छाले
 • मासिक पाळी व्यवस्थित न होणे

रक्त व हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी घरगुती उपाय

शरीरातील रक्त अर्थात हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी आपण पुढील घरगुती उपाय करू शकतात व हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे यासाठी पुढील माहिती वाचा.

 1. बीट
  लाल बीट त्वचा आणि केसांसाठी उपयोगी असते परंतु या सोबतच ते शरीरातील आयरन ची कमतरता देखील भरून काढते. आयरन ची कमतरता झाल्यास बीट खाण्याची सल्ला दिली जाते. बीट शरीरातील लाल रक्त पेशींना वाढवण्याचे कार्य करते यासोबतच मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या समस्या देखील बीट कमी करते.

 2. केळी
  केली आयरन सोबतच अनेक विटामिन आणि खनिजांचा स्त्रोत असतात. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल त्यांनी याच्या उपचार म्हणून नियमित केळी खायला हवी.

 3. मध
  मध अनेक रोगांमध्ये उपयोगी आयुर्वेदिक औषध आहे. मधाचे सेवन केल्याने रक्ताची कमी व एनिमिया सारख्या रोगांना दूर करता येते. यासाठी एक लिंबू रस एक ग्लास पाण्यात टाकावा व यामध्ये एक चमचा मध टाकुन नियमित या पाण्याचे सेवन करावे. असे केल्यास जलद रक्त वाढवण्यात मदत मिळते.

 4. हिरव्या भाज्या
  हिरव्या भाज्यांमध्ये पालक रक्त वाढवण्यासाठी चे औषध म्हणून प्रसिद्ध आहे. पालक मध्ये भरपूर प्रमाणात लोह तत्व आढळते. यासाठी तुम्ही पालकच्या भाजीत लिंबूचा रस टाकून तिचे सेवन करू शकता.

 5. खजूर आणि मनुके
  खारीक-खजूर व मनुके आणि किशमिश सुक्या मेवा मधील रक्त वाढवणारे प्रसिद्ध पदार्थ आहेत. जर आपण शरीरातील रक्ताची कमतरता कमी करू इच्छिता तर नियमित खजूर आणि किशमिश खाने सुरू करा. खजूर आणि मनुके सेवन शरीरामध्ये आयरन व हिमोग्लोबीन चे प्रमाण वाढवते.

 6. गुड आणि शेंगदाणे
  50 ग्राम बारीक केलेल्या गुड मध्ये मध्ये 100 ग्राम शेंगदाणे मिक्स करून दररोज सकाळी काही प्रमाणात याचे सेवन करावे. असे केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण काही प्रमाणात वाढवले जाऊ शकते.

या लेखात आपण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे व रक्त वाढीसाठी औषध (how to increase hemoglobin in marathi) या विषयीची माहिती मिळवली. रक्त वाढीसाठी व रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढवण्यासाठी आपण हे घरगुती उपाय नक्की करून पाहवेत. याशिवाय ही माहिती आपले मित्र व कुटुंबीयांसोबत नक्की शेअर करा.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *