पॅड कसे वापरतात व कुठे लावतात | How to use sanitary pad in marathi

पॅड कसे वापरतात व कुठे लावतात : वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला प्रतिमाह मासिक पाळी च्या चक्रातून जावे लागते. मासिक पाळीतील वेदना, रक्तस्त्राव इत्यादी गोष्टींना प्रत्येक स्त्री सामोरे जाते. यादरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावमुळे कपड्यांवर रक्ताचे डाग निर्माण होऊ नये यासाठी सेनेटरी नॅपकिन चा वापर केला जातो.

परंतु अनेकांना पॅड कसा घालायचा व पॅड कसे यूज केले जाते या विषयी ज्ञान नसते. म्हणून या लेखात आपण सेनेटरी पॅड काय आहे व पॅड कसे वापरतात याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करुया…

पॅड कसे वापरतात

सेनेटरी पॅड काय आहे ?

सेनेटरी पॅड एक सेनेटरी नॅपकिन असते ज्याला स्त्रियांच्या मासिक पाळी दरम्यान रक्त कपड्यांवर लागू नये यासाठी वापरले जाते. सेनेटरी पॅड अंडरवेअर च्या आत परिधान केले जाते. सेनेटरी नॅपकिन चा वापर करणे अतिशय सोपे आणि सुरक्षित असते.

स्त्रियांनी मासिक पाळी सुरू झाल्यापासूनच सेनेटरी नॅपकिन वापरायची सवय लावून घ्यायला हवी. हे पॅड वेगवेगळ्या जाडी, लांबी आणि रक्त शोषण क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध असतात.

पॅड कसे वापरतात

पॅड कुठे लावतात आणि पॅड कसे वापरतात याविषयी ची माहिती पुढे देण्यात आली आहे –

  1. पॅड वापरण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. म्हणजे कुठलेही संसर्ग होणार नाहीत.
  2. अनेकदा पॅड्स रॅपरमध्ये बांधलेली असतात. एका बाजूनं रॅपर बंद केलेलं असतं. जरासं ओढलं की रॅपर उघडत आणि पॅड बाहेर काढता येतो. हेच रॅपर, वापरून झालेलं पॅड फेकून देण्यासाठीही वापरता येतं. पॅड बदलताना जुनं पॅड या रॅपरमध्ये गुंडाळून मग कचऱ्यात टाकावं.
  3. प्रत्येक पॅडच्या मागच्या बाजूला आणि दोन्ही बाजूंना स्ट्रिप्स असतात. या चिकटपट्ट्या काढून पॅड्स पँटीमध्ये बसवायचा आणि बाजूचे विंग्स वाळवून ज्या त्या बाजूने पॅंटीच्या मागच्या बाजूला बसवायचे. म्हणजे पॅड हालत नाही. आपण कितीही हालचाली केल्या तरी पॅडची जागा बदलत नाही.
  4. पॅड पॅंटीला लावण्यासाठी पाय एकमेकांपासून लांब करून गुढग्यात वाकावं. आणि वर सांगितल्याप्रमाणे स्टिकर्स काढून पॅड पॅंटीला चिकटवावं.
  5. विंग्स बरोबर बसले आहेत ना हे तपासावं. ज्या पॅड्सना विंग्स नसतील ते पॅड्स पॅंटीला घट्ट चिकटवावे. म्हणजे पॅड हलणार नाहीत.
  6. पॅड नीट लावल्यानंतर नेहमी घालतो तशी पॅंटी घालावी.
  7. पाळीचा रक्तस्त्राव या पॅडमध्ये जमा होईल.
  8. पॅड काढताना पहिल्यांदा हलक्या हातानं विंग्स काढावे. त्यानंतर वरच्या बाजूनं पॅडचं टोक पकडावं आणि हलकेच दुसऱ्या बाजूपर्यंत ओढावं आणि काढावं.
  9. वापरलेलं पॅड व्यवस्थित फोल्ड करून कागदात गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यावं.
  10. चुकूनही टॉयलेटमधे पॅड फ्लश करू नये . कारण गटारीत पॅड्स गेले तर त्यामुळे गटार तुंबू शकते आणि त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो.
  11. पॅड बदलल्यानंतरही हात ढोपरापर्यंत स्वच्छ धुवावेत.
  12. मासिक पाळीचा फ्लो कमी/जास्त कसाही असो, दर ४/५ तासांनी पॅड बदललंच पाहिजे.
  13. कुठल्याही परिस्थितीत ८ तासांपेक्षा जास्त काळ पॅड वापरू नये. ओल्या पॅड्समध्ये विषाणू वाढतात. जर तुम्ही जास्त वेळ एकच पॅड वापरलात तर त्यातून जननेंद्रियांचं इन्फेक्शन्स होऊ शकतं.

तर ही होती सॅनिटरी पॅड बद्दल काही माहिती. आम्ही आशा करतो पॅड कसे वापरायचे या बद्दलचे आपले प्रश्न दूर झाले असतील. ज्या मुलींना पॅड कसे वापरतात हे माहीत नसेल त्यांनी याविषयी घरात आई तसेच इतर मोठ्या मंडळींशी बोलायला लाजू नये.

हे पण वाचा

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *