पाय मुरगळला जाणे पायाला सूज येणे उपाय | home remedy for swelling of leg in marathi

पायाला सूज येणे उपाय व पाय मुरगळला घरगुती उपाय- बऱ्याचदा जास्त वेळ पायी चालल्याने, ओबडधोबड रस्त्यावर किंवा पहाडी क्षेत्रात चढाई केल्याने पायामध्ये सुजन होणे सामान्य गोष्ट आहे. परंतु जर कोणतेही कठीण काम न करता पायांना सूज येत असेल तर अशा स्थितीत या समस्येकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. पायाला सूज येणे घातक रोगाचे लक्षण असू शकते. आजच्या या लेखात आपण पाय सुजण्याची कारणे, पाय मुरगळल्यावर घरगुती उपाय आणि पायाची सूज कमी करण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत. तर चला सुरू करूया..

पाय सुजण्याची कारणे

पायात सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत-

  • पाय मुरगळला जाणे
  • लांब अंतर पायी चालणे
  • दीर्घकाळापर्यंत पाय जमिनीपासून वर लटकवून बसणे
  • दीर्घकाळापर्यंत उभे राहणे व्यायाम करणे किंवा खेळणे
  • शरीराचे वाढलेले वजन
  • सुधीर संबंधित रोग
  • पायातील संक्रमण
  • वाढते वय
  • पायात रक्त जमा होणे
  • पायाला जखम, इजा अथवा मुक्का मार बसणे
  • रक्तदाब वाढणे ( रक्तदाब नियंत्रणात करण्यासाठी घरगुती उपाय <<येथे वाचा)
  • महिलांमध्ये गर्भावस्थेच्या समस्या

पायाला सूज येणे उपाय

पायाला सूज येणे ही फार मोठी समस्या नाही असे समजून अनेक लोक घरगुती उपाय अवलंबितात. येथे आम्ही आपणास पायाची सूज कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय देत आहोत. परंतु जर हे उपाय करूनही सूज कायम असेल तर डॉक्टरांचा सल्ला व योग्य उपचार घ्यावा.

धने
धने अर्थात कोशिंबीर ची ताजी पाने आणि सुकलेली बी दोन्ही पायाची सूज कमी करण्यासाठी उपयोगी आहेत. पायाला सूज आल्यानंतर तीन मोठे चमचे धने एक कप पाण्यात उकडून घ्यावेत. यानंतर हे पाणी गाळून कोमट झाल्यावर पिऊन घ्यावे.

याशिवाय आपण एक कप पाण्यात रात्रभर धने बुडवून ठेवू शकतात. व या यानंतर ते पाणी गाळून प्यावे आणि गाळलेले धने पेस्ट बनवून सूजन असलेल्या जागी लावावे. पायाला सूज येणे उपाय म्हणून हा उपाय आपण नक्की करून पाहावा

आईस पॅक
जर आपण पायाला सूज येणे उपाय शोधत असाल तर सूज असलेल्या जागी 10 ते 12 मिनिटे बर्फाने शेकणे आपणास सूज कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. शेकण्यासाठी आपण आईस पॅक चा उपयोग करू शकता किंवा एका पिशवी अथवा रुमाल मध्ये बर्फाचे तुकडे बांधून देखील शेकू शकतात. बर्फ शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करते. सूज असलेल्या जागी बऱ्याचदा रक्त जमा झालेले असते. बर्फाच्या शेक मुळे हे रक्त मोकळे होऊन सुरळीत वाहू लागते.

सेंधव मीठ
सेंधव मीठ किंवा शेंदेलोण म्हणून ओळखले जाणारे हे मीठ तुमच्या पायाची सुजन दूर करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. याच्यात मॅग्नेशियम सल्फेट असते जे स्नायूंचे आकुंचन दूर करते.

पायाला सूज येणे उपाय म्हणून सेंधव मीठ चा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी अर्धा कप मीठ एक बादली अथवा टब मधील कोमट पाण्यात टाकायचे आहे. यानंतर मीठ टाकलेल्या या कोमट पाण्यात आपले पाय बुडवून 10-15 मिनिटे बसावे. हा घरगुती उपाय तुम्ही दररोज रात्री झोपण्याआधी करू शकतात.

मालिश
कोणतीही सूजन कमी करण्यासाठी मालिश ही अतिशय जुनी आणि मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत आहे मोहरीच्या तेलाने केलेली मालिश पायाची सूज आणि दुखणे कमी करण्यासाठी उपयोगी सिद्ध होऊ शकते.

यासाठी मोहरीचे तेल हलके गरम करावे व दररोज रात्री झोपण्याआधी पायावर सूजन असलेल्या जागी हे तेल पाच ते दहा मिनिटे मालिश करून लावावे. आपण घरातील इतर कोणत्याही सदस्याला मालिश करण्यासाठी सांगू शकतात. जर सूज जास्त असेल तर दिवसातून दोन वेळा हे तेल लावावे आणि यासोबतच दररोज व्यायाम करावा. मोहरीचे तेल ऑनलाइन खरेदीसाठी येथे क्लिक करा…

तर मित्रांनो आजच्या लेखात आपण पायाला सूज येणे उपाय आणि पायाची सूज कमी करण्यासाठी घरगुती उपाय प्राप्त केलेत. आम्ही आशा करतो की या उपायांना करून आपल्याला दुखण्यात नक्कीच आराम मिळेल. परंतु जर नियमित घरगुती उपाय, व्यायाम आणि निरोगी जीवनशैली अनुसरूनही पायांमधील सुजन ची समस्या एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ कायम राहत असेल. तर या समस्येला गंभीरतेने घेत डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घ्यावा.

अजून वाचा :

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *