पोटाची चरबी कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी व्यायाम योगा – Best weight loss exercise in marathi & vajan kami karnyasathi yoga and vyayam.
वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत : लॉकडाऊन को-रोना आणि चुकीच्या दिनचर्ये मुळे वजन वाढणे आणि अंगावर अनावश्यक चरबी जमा होणे ह्या समस्या निर्माण होत आहेत. वाढलेले हे वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. परंतु अनेक उपाय करूनही जर आपले वजन कमी होत नसेल तर आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी वजन कमी करण्यासाठी व्यायाम घेऊन आलो आहोत. हे व्यायाम आणि योगासन करून आपण आपले वाढलेले वजन नियंत्रणात आणू शकतात. तर चला सुरू करूया…
पोट कमी करण्यासाठी व्यायाम
Table of Contents
वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत
1) चालणे (Walking)
डॉक्टर व अनेक जिम ट्रेनर आणि स्पेशलिस्ट वजन कमी करण्यासाठी चालणे हा व्यायाम सर्वोत्तम मानतात. जर आपणही वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असाल तर आपल्या आजूबाजूच्या परिसरात किंवा घराच्या गच्चीवर 20 ते 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. हळू हळू न चालता जोरात पायांचा आवाज करीत चालावे या मुळे शरीराच्या जास्त कॅलरीज बर्न होतील. एक तास चालून व्यक्ती 371 कॅलरी कमी करू शकतो.
2) सायकलिंग (Cycling)
वजन कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यायाम मध्ये सायकल चालवणे हा एक महत्वपूर्ण व्यायाम आहे. सायकल चालवणार्याला वजन कमी होण्याचा थकवा अथवा इतर कोणताही त्रास होत नाही. एक सामान्य मनुष्य सायकल चालवून 1,150 येवढ्या कॅलरी प्रति तास कमी करू शकतो.
3) स्किपिंग / दोरी उड्या (Skipping Rope)
अभ्यासातून लक्षात आले आहे की 45 मिनिटे दोरी उड्या खेळल्याने 450 कॅलरी बर्न होतात. दोरी उड्यांचा हा व्यायाम खांदे, हात, पाय, कंबर आणि जवळपास संपूर्ण शरीराचे सांधे मजबूत करतो.
4) प्लैंक (Plank)
प्लैंक एक अशी क्रिया आहे ज्यात पूर्ण शरीराला चित्रात दाखवल्या प्रमाणे पुश अप च्या पोझिशन मध्ये ठेवले जाते. या स्थितीत 30 सेकंद ते 1 मिनिट थांबावे. हा व्यायाम शरीराच्या स्नायूंना मजबूत करण्यासोबतच पोट, हात इत्यादी अवयवांवरील अनावश्यक चरबी कमी करतो.
5) पुश अप (Push Ups)
पुश अप्स चा व्यायाम तर प्रसिद्ध व्यायाम आहे आणि प्रत्येकालाच या बद्दल माहिती आहे. पुश अप करण्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे शरीराला जमिनीवर हाताचे पंजे आणि पायाच्या पंज्याच्या सहाय्याने ठेवावे. आता मान आणी डोके सरळ ठेवून शरीराला हळूहळू जमिनी वरून वर उठवावे. यानंतर परत खाली जावे ही प्रक्रिया 10-15 वेळा करावी.
6) स्क्वाट (Squats)
वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या व्यायामामध्ये स्क्वाट देखील समाविष्ट आहे. नियमित व्यायाम केल्याने शरीरातील अनावश्यक कॅलरी जाळल्या जातात आणि शरीराचे वजन नियंत्रणात राहते. हा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर सरळ उभे राहा. यानंतर दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवून गुडघ्यांना वाकून चित्रात दाखवल्या अवस्थेत या. हा व्यायाम 10 ते 15 वेळा करावा.
योग आपली संस्कृती आहे. योग केल्याने अनेक कठीण रोगांना दूर केले जाऊ शकते. आता आपण वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही योगासन पाहणार आहोत.
1) धनुरासान
हे आसन करताना शरीर एखाद्या धनुष्य बाणा प्रमाणे ताणले जाते. म्हणून याला धनुरासन म्हटले जाते. धनुरासन केल्याने पोटाची चरबी कमी होते याशिवाय शरीराच्या आतील अवयव आणि स्नायू बळकट होतात. हे आसन करण्यासाठी पोटावर उलटे झोपा. दोघी पाय एकमेकांना जोडून गुडघ्यातून वरच्या बाजूला वाकवा. आता दोघी हातांनी पायांचे पंजे धरा. या स्थितीत काही काळ थांबावे व पुन्हा आपल्या आधीच्या स्थितीत यावे.
2) पश्चिमोत्तानासन
पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे आसन देखील अत्यंत प्रभावी आहे. हे आसन केल्याने पोट, पाय आणि पाठीचे स्नायू ताणले जातात. हे आसन करण्यासाठी पाय समोर पसरवून बसावे. आता श्वास आत घेत शरीराला कमरेतून वाकून हातांनी पायांचे पंजे धरावे. या अवस्थेत काही काळ थांबावे व पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत यावे.
3) भुजंगासन
पोटाची चरबी कमी करून, कंबर बारीक करण्यासाठी आणि खांदे चौडे करण्याकरिता भुजंगासन अत्यंत उपयुक्त आसन आहे. याला इंग्रजी भाषेत कोब्रा पोझ देखील म्हटले जाते. हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा. आता दोन्ही हातांच्या साहाय्याने शरीराला कमरेपासून वर उचला आणि मानेला वर वळवून आकाशाकडे पहा. शक्य होईल तेवढा ताण देऊन या स्थितीत थांबावे. यानंतर पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत यावे.
4) कपालभाती
कपालभाती प्राणायाम केल्याने पोटाची अनावश्यक चरबी कमी करण्यात मदत मिळते. हे आसन करण्यासाठी ध्यान मुद्रेत बसावे. दोन्ही हातांना ज्ञान मुद्रेत मांडीवर ठेवावे. डोळ्यांना हलके बंद करावे. पोटावर हलका झटका देत नाकाद्वारे श्वास बाहेर सोडावी. यानंतर नाकाद्वारे पुन्हा श्वास घेत झटके देत श्वास बाहेर सोडावी. हा प्राणायाम आपण 25 वेळा करू शकतात.
तर मित्रांनो ही होती पोटाची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत याबद्दल माहिती. जर आपण जास्त व्यायाम करू शकत नासाल तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय येथील उपाय वाचा. ह्या लेखातील माहिती आपले नातेवाईक व मित्र मंडळी सोबतही शेअर करा. धन्यवाद…
वजन कमी करने आणि पोटाची चर्बी कमी करने बॉडी फीट करने