चेहऱ्यावर आहे ब्लॅकहेड्स ची समस्या तर करा हे सोपे घरगुती उपाय

व्यवस्थित स्वच्छता न झाल्याने चेहऱ्याच्या काही भागांवर घाण जमा होते. ज्याला ब्लॅकहेड्स म्हणतात. नाक, हनुवटी आणि ओठांभोवती जमा झालेले हे ब्लॅकहेड्स कुरूप दिसतात. तसेच काहींच्या तर संपूर्ण चेहऱ्यावरच ब्लॅकहेड्स जमा होतात. ज्यांना स्वच्छ करण्यासाठी स्क्रबचा वापर करावा लागतो. पण काही लोकांमध्ये हे ब्लॅकहेड्स जास्त प्रमाणात असतात आणि अनेक प्रयत्न करूनही ते पुनः पुनः निर्माण होतात. जर चेहऱ्यावर पुन्हा-पुन्हा येणा-या या ब्लॅकहेड्समुळे तुम्ही हैराण असाल तर या लेखात सांगितलेले सोपे उपाय करून आपण या समसयेपासून मुक्ती मिळवू शकतात.

तसे पाहता ब्लॅकहेड्स काढण्यासाठी बाजारात अनेक स्क्रब आणि टूल्स उपलब्ध आहेत. पण रासायनिक स्क्रब त्वचेला हानी पोहोचवतात. तर दुसरीकडे ब्लॅकहेड्स काढण्याच्या साधनांमुळे त्वचेची छिद्रे मोठी होतात. ज्यामुळे चेहऱ्यावर खड्डे दिसू लागतात आणि पुरळ येण्याची शक्यता असते. जर तुम्हाला हे ब्लॅकहेड्स नैसर्गिकरित्या दूर करायचे असतील तर कच्चे दूध आणि मध चा उपाय आपण करायला हवा.

वाचा> हिवाळ्यात अशा पद्धतीने घ्या कोरड्या आणि मृत त्वचेची काळजी

ब्लॅकहेड्स काढण्यासाठी कच्चे दूध आणि मध

कच्च्या दुधामुळे त्वचा स्वच्छ होते आणि ती चमकते. तसेच दूध त्वचेला आर्द्रता प्रदान करते. ज्यामुळे विशेषतः हिवाळ्यात चेहऱ्यावर ओलावा राहतो. कच्चे दूध चेहऱ्याच्या त्वचेपर्यंत खोलवर पोहोचते आणि ते त्वचेला खोलवर स्वच्छ करते. आणि म्हणूनच आज दुधाचे गुणधर्म असलेले अनेक फेसवॉश बाजारात येऊ लागले आहेत. परंतु facewash वापरण्याऐवजी तुम्ही घरी कच्च्या दुधाने चेहरा स्वच्छ करू शकतात. असे केल्याने त्वचेला खूप फायदा होईल.

कच्च्या दुधात मध मिसळून लावल्याने ब्लॅकहेड्स कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिकरीत्या मॉइश्चरायझेशन मिळते. हे फेसपॅक बनवण्यासाठी अर्धा चमचा कच्चे दूध दोन चमचे मधात मिसळा. नंतर त्यात कापूस भिजवून चेहऱ्याला लावा. मध आणि दुधाच्या या पेस्टने चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स असलेल्या भागाला पूर्णपणे झाकून टाका. सुमारे अर्ध्या तासानंतर, कापसाच्या मदतीने हे सर्व पेस्ट पूर्णपणे पुसून टाका. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

आशा पद्धतीने चेहऱ्यावर पेस्ट लाऊन काही वेळात चेहरा धुतल्याने चेहऱ्याची त्वचा सॉफ्ट म्हणजेच मऊ होते परंतु याशिवाय कालांतराने चेहऱ्यावरील ब्लॅकहेंडस चे प्रमाण नैसर्गिक रित्याच कमी होऊ लागते.

सौन्दर्य आणि ब्युटि टिप्स वाचण्यासाठी पुढील सेक्शन ला भेट द्या> सौन्दर्य टिप्स

तर मित्रहो या लेखात आम्ही आपल्यासाठी चेहऱ्यावरील ब्लॅकहेंडस काढून चेहरा स्वच्छ आणि मऊ करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. आशा आहे आपणास ही माहिती उपयोगी ठरली असेल. हा लेख आपण आपले कुटुंबीय व मित्रमंडळी सोबत शेअर करून त्यांची देखील मदत करू शकतात. आशा आहे आपणास ही माहिती आवडली असेल. माझी काळजी या आमच्या वेबसाइट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

Whatsapp ग्रुप जॉयनिंग साठी येथे क्लिक करा